A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : २४ / ०४ / २०२३
G दिनविशेष
दिनविशेष
२०२१
न्यायमूर्ती नुथलापती वेंकट तथा एन. व्ही. रमणा यांनी भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
(Image Credit: Bar and Bench)
१९९३
इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली.
१९९०
डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.
(Image Credit: SETI Institute)
१९७०
गाम्बिया प्रजासत्ताक बनले.
(Image Credit: Britannica)
१९६८
मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.
१९६७
वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मृत्युमुखी पडलेला पहिला अंतराळवीर ठरला.
१८१५
भारतीय सैन्य दलातील सर्वात बलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरखा रेजिमेंटची स्थापना.
१९७३
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री
(Image Credit: Times of India)
१९७०
डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
(Image Credit: dnaindia.com)
१९४२
बार्बरा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका
१९३८
मोहन माकिजानी ऊर्फ ‘मॅक मोहन’ – मोहन माकिजानी ऊर्फ मॅक मोहन हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने खलनायकाच्या किंवा खलनायकाच्या टोळक्यातील भूमिका साकारणारे अभिनेते. चेतन आनंद यांचा सहाय्यक म्हणून त्यांनी प्रथम दिग्दर्शनास सुरुवात केली. परंतु शौकत कैफ़ी यांच्या सल्ल्यामुळे ते नंतर ते अभिनयाकडे वळले. हक़ीक़त (१९६४) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. आपल्या ४६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी डॉन, कर्ज़, सत्ते पे सत्ता, ज़ंजीर, रफ़ू चक्कर, खून पसीना इ. २०० हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. परंतु शोले या चित्रपटातील ‘सांभा’ या भूमिकेने त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ते क्रिकेटही उत्तम खेळत असत.
(मृत्यू: १० मे २०१० - मुंबई, महाराष्ट्र, भारत )
१९२९
वसंतराव पटवर्धन – 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ, लेखक, कवी, संस्कृतचे गाढे अभ्यासक
२०११
सत्यनारायण राजू ऊर्फ ‘सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू
(जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)
१९९९
सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक. सुजाता (१९५९), मधुमती (१९५९), बंदिनी (१९६३), मेरे मेहबूब (१९६४), सगीना (१९७५), आप की खातिर (१९७७), स्वीकार, कर्ज (१९८०), सिलसिला (१९८१), कर्मा (१९८६), चांदनी (१९८९), लम्हे (१९९१) इ. चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले. मधुमती, मेरे मेहबूब आणि सगीना चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उपहार (१९७१) आणि सौदागर (१९७३) हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांना फॉरेन फिल्म या गटात त्या त्या वर्षीचे ऑस्कर नामांकन मिळाले होते.
(जन्म: ? ? १९२१ - पाबना, पश्चिम बंगाल)
(Image Credit: विकिपीडिया)
१९९४
शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ. त्यांचे ‘Cactus and Roses’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
(जन्म: २८ मे १९०३)
(Image Credit: विकिपीडिया)
१९७४
रामधारी सिंह ‘दिनकर‘ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक
(जन्म: २३ सप्टेंबर १९०८)
(Image Credit: timesnext.com)
H पंचांग
पंचांग
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : २४ / ०४ / २०२३
तिथी : शु.चतुर्थी
नक्षत्र : मृग
योग : शोभन
करण : बव
चंद्रराशी : मिथुन
सूर्योदय : सकाळी ०६ वाजून १८ मिनिटांनी झाला.
सूर्यास्त : सायंकाळी ०६ वाजून ५७ मिनिटांनी होईल.
I बोधकथा
बोधकथा
अपमान आणि उपकार
एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेहीजण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला,मनाला,भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होवून जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.
तात्पर्य- "माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.