A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : २९ / ०४ / २०२३
G दिनविशेष
दिनविशेष
१९९१
बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.
१९४५
दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
१९३३
‘प्रभात’चा ‘सिंहगड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९७०
आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू
१९६६
फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज
१९३६
झुबिन मेहता – भारतीय संगीतकार
१९०१
मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट
(मृत्यू: ७ जानेवारी १९८९)
२०२०
इरफान खान – भारतीय, ब्रिटिश तसेच अमेरिकन चित्रपटांत भूमिका साकारलेले अभिनेते, पद्मश्री (२०११) पुरस्काराने सन्मानित
(जन्म: ७ जानेवारी १९६७)
(Image Credit: विकिपीडिया)
२००६
जॉन केनेथ तथा जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी, भारतातील अमेरिकेचे ७ वे राजदूत
(जन्म: १५ आक्टोबर १९०८)
(Image Credit: Wikipedia)
१९८०
श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक
(जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)
१९८०
सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक
(जन्म: १३ ऑगस्ट १८९९)
H पंचांग
पंचांग
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : २९ / ०४ / २०२३
तिथी : शु.नवमी
नक्षत्र : आश्लेषा
योग : गंड
करण : तैतील
चंद्रराशी : सिंह
सूर्योदय : सकाळी ०६ वाजून १४ मिनिटांनी झाला.
सूर्यास्त : सायंकाळी ०६ वाजून ५८ मिनिटांनी होईल.
I बोधकथा
बोधकथा
पद्माने फेडले कर्ज
पद्माचा जन्म सामान्य राजपूत घरात झाला होता, जेव्हा ती अडीच वर्षाची होती तेव्हा तिच्या आईवडीलांचा मृत्यू झाला होता. मात्र पद्माचा भाऊ जोरावरसिंह सोळा वर्षाचा होता. वडीलांना कमाविलेल्या धनातून पद्माचे पालनपोषण करत असे. त्याने पद्माला घोड्यावर बसणे, तलवार चालविणे, बाण चालविणे याचे प्रशिक्षण दिले होते. पद्मा नेहमीच सैनिकांचे कपडे घालत असे. जोरावरसिंह याच्याजवळील वडीलांनी मिळविलेले धन संपले तेव्हा त्याने काम शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला काम मिळाले नाही. खर्च चालविण्यासाठी त्याने सावकाराकडून पैसे उसने घेतले व वायदा केला की काम मिळताच पैसे परत करीन पण त्याला काम मिळत नाही हे पाहून सावकाराने जोरावरसिंहाला कैद केले. अशा परिस्थितीत पद्मा एकटी पडली.
पण तिने न डगमगता धाडसाने राजपूत सैनिकीरूपात आपले युद्धकौशल्य ग्वाल्हेरच्या तत्कालिन महाराजांसमोर प्रदर्शित केले. प्रभावित होऊन राजांनी तिला सैनिकाची नोकरी दिली. पद्माने युद्धात इतकी वीरता सिद्ध केली की तिला हवालदार हे पद मिळाले ती आपल्या वेतनातून सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी थोडे थोडे पैसे जमा करू लागली. परंतु एके दिवशी सेनापतीने तिचे हे रहस्य जाणून घेतले आणि महाराजांना सांगितले. महाराजांनी कारण विचारल्यानंतर तिने आपली कथा सांगितली हे ऐकून महाराजांनी जोरावरसिंह याची सावकाराच्या कैदेतून सुटका केली व त्याला आपल्या सैन्यात भरती केले व पद्माचा विवाह सैन्यातील एका वरिष्ठ अधिका-याशी करून दिला.
तात्पर्य-विपरीत परिस्थितीतसुद्धा आपल्याला पूर्ण ताकदीने संघर्ष करता आला पाहिजे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.