A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : ३० / ०४ / २०२३
G दिनविशेष
दिनविशेष
२००९
ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. (स्थापना: १९२५)
१९९६
थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्घाटन झाले.
१९९५
ऊत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१९७७
९ राज्यांमधील विधानभा बरखास्त. जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना कांग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी ‘जनता पक्ष‘ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
१९३६
वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
१९८७
रोहित शर्मा – क्रिकेटपटू
१९२६
श्रीनिवास विनायक खळे तथा ‘खळे काका’ – संगीतकार, पद्मभूषण (२०१०)
(मृत्यू: २ सप्टेंबर २०११)
(Image Credit: Wikipedia)
१९१०
श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ‘श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार
(मृत्यू: १५ जून १९८३)
१९०९
माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ – ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना ‘राष्ट्रसंत’ असे संबोधले जाते. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: ११ आक्टोबर १९६८)
(Image Credit: Wikipedia)
२०२१
सोली जहांगीर सोराबजी – ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया (७ एप्रिल १९९८ ते ४ जून २००४), सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया (१९७७ ते १९८०), पद्मविभूषण (२००२), ‘ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ चे अध्यक्ष [Covid-19]
(जन्म: ९ मार्च १९३० - मुंबई)
(Image Credit: Live Mint)
२०२०
ऋषी कपूर – अभिनेता, दिग्दर्शक व चित्रपट निर्माता
(जन्म: ४ सप्टेंबर १९५२)
(Image Credit: scroll.in)
२००३
वसंत पोतदार – मराठी साहित्यिक
(जन्म: २० नोव्हेंबर १९३९ - आष्टी, उस्मानाबाद)
H पंचांग
पंचांग
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : ३० / ०४ / २०२३
तिथी : शु.दशमी
नक्षत्र : मघा
योग : वृद्धि
करण : तैतील
चंद्रराशी : सिंह
सूर्योदय : सकाळी ०६ वाजून १४ मिनिटांनी झाला.
सूर्यास्त : सायंकाळी ०६ वाजून ५८ मिनिटांनी होईल.
I बोधकथा
बोधकथा
स्वामी अखिलानंद
स्वामी अखिलानंद हरिद्वारमध्ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत. एकेदिवशी ते शिष्यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्हा त्यांना आश्रमाच्या शेजारी असलेल्या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्यांना विचारल्यावर शिष्य म्हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्याचे सांगितले. त्यांचे फाटलेले कपडे पाहून स्वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्या आशेने येत असतील दोघे दुसरे काय? त्यांनी त्या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्याने भांबावले, त्यामुळे ते दोघेही एक शब्द स्वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्वामीजी रागवत म्हणाले, तुम्हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्यावर या तुम्हाला प्रसाद द्यायची व्यवस्था मी करतो.'' दोघेही बिचारे मान-अपमानाची पर्वा न करता स्वामीजींना नमस्कार करून निघून गेले. दुसरे दिवशी मात्र स्वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्वामींच्या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले. रामायण कथन करण्यासाठी स्वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्यात स्वामीजींचे लक्ष समोरच्या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्यांच्या रोजच्या जागेवर झाडावर भिजलेल्या अवस्थेत रामायण ऐकण्यासाठी येऊन बसलेले दिसले. स्वामीजींना राहवले नाही व त्यांनी त्या दोघांच्या समोर लोटांगण घातले व त्यांच्या रामभक्तीला नमस्कार केला.
तात्पर्य -कुणालाही कमी समजू नये. कोण कुठल्या अधिकाराचा असेल ते सांगता येत नाही.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.