भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग भाषण/निबंध | Babasaheb Aambedkar yanchya jivnaatil prasang
संस्कृत भाषेचं ज्ञानडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र भारताची नवीन राज्यघटना तयार करण्याबाबत घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्त केले गेले.
अनुसूचित भाषांची यादी तयार करण्याची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनाही त्यातील सर्व भाषांची माता संस्कृत असे द्यायची फार इच्छा होती पण काही सदस्यांच्या विरोधामुळे हे शक्य झाले नाही. पण त्या काळात श्री लाल बहादूर शास्त्री आणि आंबेडकर ह्यांच्यात संस्कृत भाषे संदर्भात चर्चा झाली. त्या वेळी विरोधकांच्या लक्षात आले की दोन महान व्यक्ती संस्कृतभाषेत संभाषण करीत आहेत.
शास्त्रीजींना संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अपेक्षित होते, परंतु अशिक्षित दलित कुटुंबात जन्मलेल्या बाबासाहेबांचा संस्कृत भाषेवर प्रभुत्व असेल हे कोणालाही अपेक्षित नव्हते. ह्या मुळे ही माहिती लवकरच पसरली. त्या दिवसापासून सर्व आंबेडकरांच्या ज्ञानावर विश्वास ठेवू लागले.
अस्पृश्य मानल्या जाणार्या महार जातीचे बाबासाहेब होते. हेच कारण होते की त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांसह बसणे शक्य नव्हते आणि त्यांना वर्गाच्या बाहेरच बसून अभ्यास करावा लागायचा.
या शिवाय त्यांना त्या शाळेच्या नळालाही स्पर्श करण्याची परवानगी नव्हती, पण इतर विद्यार्थ्यांना असे कुठलेही बंधन नव्हते. ते पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकत होते.
त्यांना पाणी तेव्हाच मिळू शकते ज्या वेळी तिथला शिपाई त्यांना नळ सुरु करून देत असत. तो नसल्यावर अजून कोणते ही इतर विध्यार्थी त्यांना नळ सुरु करून देत नव्हते. या परिस्थितीचा सारांश त्यांने आपल्या एका लेखात पण नमूद केला आहे.
" शिपाई नाही पाणी नाही।"
बाबासाहेब आणि ग्रंथपाल
डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. ते दररोज १४ ते १८ तास अभ्यास सहजच करत असे. बडोद्याचे शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. शिक्षण आणि कठोर परिश्रमाच्या त्यांच्या आग्रहाखातर.
बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. असे आख्यादित आहे की त्यांची वैयक्तिक लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती आणि त्यात पुस्तकांची संख्या ५० हजारांपेक्षा देखील अधिक होती.
लंडन येथे वास्तव्याच्या वेळी ते दररोज एका लायब्ररीत जात असे आणि तासंतास अभ्यास करत असे. एकदा ते दुपारच्या जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून भाकरी खात होते तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बघितले आणि त्यांना चिडवले आणि टोमणा दिला की कॅफेटेरिया जाण्याऐवजी ते येथे लपून- छपून भोजन करत आहे. ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्याचे सदस्यत्व संपविण्याची धमकी दिली. ते ऐकून बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या संघर्ष आणि इंग्लंडमध्ये येण्याचे कारण सांगितले. तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरिया जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही त्याने दिली. हे ऐकल्यावर ग्रंथपाल म्हणाला-
" आजपासून आपण दुपारच्या जेवण्याच्या वेळी येथे न बसता माझ्यासोबतच कॅफेटेरियात येणार आणि मी माझे भोजन तुमच्याबरोबर वाटून खाणार.
ग्रंथपाल एक ज्यू (यहुदी) होता आणि त्याचा या वागणुकीमुळे बाबासाहेबांच्या मनात यहुदींसाठी एक विशेष स्थान होते.
चवदार तळे आंदोलन
महाड सत्याग्रहाचे नेतृत्व करत चवदार तळ्याचे पाणी प्राशन करतांना आंबेडकरांचे कांस्य धातुचे शिल्पचित्रण
डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला. रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०३] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही. अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.
२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. बाबासाहेबांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०६] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.
शिवजयंती व गणेशोत्सवात सहभाग
३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारत च्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.
दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७ च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."