मला बी मेळाव्याला येऊ द्या की रं ।। धृ ।।
गाणी गोष्टी बी मिळून म्हणू
फेर धरून गोलात फिरू ।
मला गाण्याच्या तालावर नाचू दया....
मला गाण्याच्या तालावर नाचू दया की रं ।।१।।
मला येतात रंगांची नावं ।
आकार वार बी मला हाय ठावं ।
मला वर्षांचं महिनं बी शिकू दया......
मला वर्षांचं महिनं बी शिकू दया की रं ||२||
अक्षरांची गाडी चाले पटपट ।
अंकांशी बी करतो मी झटपट ।
अंक अक्षरांचं खेळ मला येऊ दया....
अंक अक्षरांचं खेळ मला येऊ दया की रं || ३ ||
कमी की जास्त फरक सांगा
मी लहान की मोठा याचा दंगा
मला आईला बी समजून सांगू दया....
मला आईला बी समजून सांगू दया की रं ।। ४ ।।
(काठी न घोंगडं घेवू दया - या गाण्याची चाल)
गीत- सुवर्णा फडतरे
Tags
शाळापूर्व तयारी