A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : ०६ / ०६ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९३
मंगोलियात प्रथमच राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट निवडणूका घेण्यात आल्या.
१९८२
इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.
१९७४
स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
१९७०
इंग्लंडमधे सी. हेन्केल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा अपमार्जक साबण (Detergent Soap) विक्रीस उपलब्ध केला.
१९६९
वि. स. पागे समितीने केलेल्या शिफारशीवरुन रोजगार योजनेस सुरुवात झाली. १९७२ च्या भीषण दुष्काळात तिचे ‘रोजगार हमी योजना’ असे नामकरण करण्यात आले. जानेवारी १९७३ पासून या योजनेतील मजुरांना देण्यात येणारा पौष्टिक आहार ‘सुकडी’ या नावाने प्रसिद्ध झाला.
१९३०
गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना
१९५६
बियॉन बोर्ग – स्वीडीश लॉनटेनिस खेळाडू
(Image Credit: woodtennis.com)
१९२९
सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री
(मृत्यू: २५ मे २००५)
१९१९
राजेन्द्र कृष्ण – गीतकार, कवी व पटकथालेखक
(मृत्यू: २३ सप्टेंबर १९८७)
१९०९
गणेश रंगो भिडे – मराठी ज्ञानकोशकार, लेखक आणि पत्रकार. भिडे यांनी ‘व्यावहारिक ज्ञानकोश’ (५ खंड), ‘अभिनव ज्ञानकोश’, ‘बालकोश’ अशा कोशांचे संपादन केले. ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर’, ‘फोटो कसे घ्यावेत’, ‘सावरकर सूत्रे’ आदी पुस्तकेही त्यांनी लिहिली. ‘सिनेमासृष्टी’ हे मराठीतील चित्रपट-नाट्य विषयक पहिले नियतकालिक १९३२ च्या सुमारास त्यांनी सुरू केले.
(मृत्यू: ८ जून १९८१)
२००२
शांता शेळके – शब्दांवर मनापासून प्रेम करणार्या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले. कालिदासाचे ‘मेघदूत’ आणि अनेक जपानी हायकूंचा त्यांनी अनुवाद केला. ‘वडीलधारी माणसे’ हे व्यक्तिचित्रण ‘गोंदण’, ‘वर्षा’, ‘रुपसी’ इ. काव्यसंग्रह, ‘रंगरेषा’, ‘आनंदाचे झाड’ इ. ललित लेखसंग्रह, ‘धूळपाटी’ हे आत्मचरित्र इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांनी ७० ते ७५ चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत.
(जन्म: १२ आक्टोबर १९२२)
१९७६
जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist)
(जन्म: १५ डिसेंबर १८९२)
१९६१
कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ
(जन्म: २६ जुलै १८७५)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
सिंह व बुद्धिमान माणूस
एका जंगलात एके दिवशी एक पारधी शिकारीसाठी आला.
त्याला पाहून जंगलातील प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले. एका सिंहाने ते पाहिले, तो पळणाऱ्या
प्राण्यांना म्हणाला, "अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमचा राजा
असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही."सिंह असे बोलतो न
बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व सिंहाच्या पंजात घुसला. सिंह तसाच विव्हळला.
तीन पायावर पळत सुटला, एका कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, "वनराज आताच तर आपण
शौर्याच्या, शक्तीच्या गप्पा मारत होता, मग आता का घाबरून
पळता आहात.' यावर सिंह कोल्ह्याला म्हणाला, अरे बाबा, मी शक्तीने सर्व
प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने सामर्थ्यशाली आहे त्याची
बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.'
तात्पर्य : बुध्दीच्या सामर्थ्यापुढे शारीरिक सामर्थ्य कमी पडते.J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.