A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : ०८ / ०६ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००४
आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.
१९६९
भारताचे लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करुन बांगलादेश मुक्त केला. त्यानंतर त्यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्च लष्करी पद देण्यात आले.
१९५३
कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९४९
जॉर्ज ऑर्वेलची ‘1984’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली
१९४८
‘एअर इंडिया’ची मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली. कैरो आणि जिनीव्हा येथे विराम घेऊन, १० जून १९४८ रोजी हे विमान लंडनला पोहोचले. पहिल्या फेरीत ४२ प्रवासी होते. त्यातले बरेचसे महाराजे आणि नबाब होते.
(Image Credit: Indian Airmails)
१९५७
डिंपल कपाडिया – अभिनेत्री
(Image Credit: Filmfare)
१९३२
रे इलिंगवर्थ – इंग्लिश क्रिकेटपटू
(Image Credit: ESPN cricinfo)
१९३१
राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते
(मृत्यू: १३ फेब्रुवारी २००८)
१९२१
सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २७ जानेवारी २००८)
१९९५
राम नगरकर – विनोदी नट, ‘रामनगरी’ या त्यांच्या एकपात्री प्रयोगाचे ७०० हुन अधिक प्रयोग झाले.
(जन्म: ? ? ????)
१९८१
गणेश रंगो भिडे – मराठी ज्ञानकोशकार, लेखक आणि पत्रकार. भिडे यांनी ‘व्यावहारिक ज्ञानकोश’ (५ खंड), ‘अभिनव ज्ञानकोश’, ‘बालकोश’ अशा कोशांचे संपादन केले. ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर’, ‘फोटो कसे घ्यावेत’, ‘सावरकर सूत्रे’ आदी पुस्तकेही त्यांनी लिहिली. ‘सिनेमासृष्टी’ हे मराठीतील चित्रपट-नाट्य विषयक पहिले नियतकालिक १९३२ च्या सुमारास त्यांनी सुरू केले.
(जन्म: ६ जून १९०९)
१८४५
अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १५ मार्च १७६७)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
ओळखा पाहू
एक फकीर रस्त्याने चालले होते. रस्त्यात त्यांना एक व्यापारी गाठ पडला, व्यापा-याबरोबर पाच गाढवे होती आणि पाचही गाढवांवर पाच मोठमोठी गाठोडी लादलेली होती. गाढवे त्या गाठोड्यांच्या ओझ्याने अगदी दबून गेली होती. फकीराने व्यापा-याला विचारले,'' या गाठोड्यात असे तुम्ही काय नेत आहात की ज्याच्या वजनाने तुमची गाढवे अगदी दमून, दबून गेलेली दिसत आहेत'' व्यापा-याने उत्तर दिले,'' यात माणसाच्या वापराच्या अनमोल गोष्टी आहेत. मी त्या गोष्टी बाजारात विकण्यास निघालो आहे.'' फकीराने विचारले,'' अच्छा, अशा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही विकता ते तरी सांगा'' व्यापारी म्हणाला, '' पहिल्या गाढवाकडे जाऊ, त्याच्या पाठीवर ठेवलेल्या गाठोडयात अत्याचार भरलेले आहेत. ज्यांची खरेदी ही राजा-सत्ताधारी लोक, वरीष्ठ लोक करतात. खूप मोठ्या भावाने हे विकले जातात.'' मग व्यापारी दुस-या गाठोड्याकडे वळाला आणि सांगू लागला,'' या गाठोड्यात अहंकार भरला आहे. याची खरेदी ही उच्चशिक्षित, उच्चभ्रु, विद्वान माणसे करतात.'' तिस-या गाठोड्याला हात लावून व्यापारी म्हणाला,'' यात ईर्षा भरली आहे. याचे ग्राहक आहेत ते म्हणजे धनवान लोक जे दुस-याची प्रगती कधीच पाहू शकत नाहीत. याच्या खरेदीसाठी अक्षरश: लोकांच्या उड्या पडतात.'' फकीर म्हणाला,'' चौथ्या गाठोडयात काय आहे'' व्यापारी म्हणाला,'' यात बेईमानी भरून आणली आहे आणि याचे गि-हाईक म्हणजे धंदेवाईक लोक, उद्योगपती लोक जे आपल्या फायद्यासाठी ग्राहकांच्या जीवाशी खेळतात आणि भेसळ करून लहानमोठ्यांना प्राण गमाविण्यास भाग पाडतात. यालासुद्धा बाजारात प्रचंड मागणी आहे.'' फकीर अचंबित होऊन पाहत असतानाच व्यापारी शेवटच्या गाढवाकडे जाऊन म्हणाला,'' या शेवटच्या गाढवावर मी कट-कारस्थान भरून आणले आहे. आजकाल सर्वच जण कटकारस्थान करून दुस-याला कसा त्रास देता येईल याचा विचार करत असतो म्हणून यालाही मागणी भरपूर आहे.'' एवढे बोलून व्यापारी काही अंतर निघून पुढे गेला व फकीर त्याच्या जाणा-या आकृतीकडे पाहतच राहिला.
तात्पर्य- कथेचे आता वेगळे तात्पर्य काय सांगावे, तुम्ही ते जाणले असालच. तुमचे मत कृपया कॉमेंट मध्ये नोंदवा.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.