A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : १० / ०६ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९९
उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त ‘नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती’ साठी निवड
१९७७
अॅपल कॉम्प्युटर्सने आपला ‘Apple-II’ हा संगणक विकण्यास सुरूवात केली.
१९४०
दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४०
दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३५
अॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ व बिल विल्सन यांनी ‘अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस’ (AA) या संस्थेची स्थापना केली.
१९५५
प्रकाश पदुकोण – ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू, अर्जुन पारितोषिक (१९७२), पद्मश्री (१९८२)
(Image Credit: SportsStar - The Hindu)
१९३८
राहूल बजाज – उद्योगपती व राज्यसभा खासदार
१९०८
जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण
(मृत्यू: ६ एप्रिल १९८३)
१२१३
फख्रुद्दीन ‘इराकी’ – पर्शियन तत्त्वज्ञ
(मृत्यू: ? ? १२८९)
२००६
गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
(मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ - पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)
(Image Credit: Wikipedia)
२०१९
गिरीश कर्नाड – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक
(जन्म: १९ मे १९३८)
२००१
फुलवंताबाई झोडगे – सामाजिक कार्यकर्त्या, सावित्रीबाई फुले यांचा वारसा विसाव्या शतकातुन एकविसाव्या शतकापर्यंत नेण्याचे कार्य झोडगेअक्कांनी केले.
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
निर्णय
एक राजा होता. तो वेगवेगळे वेश परिधान करून राज्यात फेरफटका मारत असे. त्या निमित्ताने त्याचा जनतेशी होत असे. जनतेचे दुःख, वेदना, गरजा यांची तो माहिती करून घेत असे. एके दिवशी अचानक त्याच्या मनात विचार आला कि आपण सर्व देशात फिरून जनतेचे दुःख, गरजा यांची माहिती करून घ्यावी व त्यावर उपाय करावे. त्याच्या प्रवासाला त्याने सुरुवात केली आणि पूर्ण देशात फिरून तो परत आला. परत आल्यावर तो महालातून बाहेरच पडेन. शेवटी सगळे मंत्रीगण त्याच्या भेटीला महालात गेले तेंव्हा राजाने त्यांना त्याची कहाणी ऐकवली व मंत्र्यांकडे त्याने त्याचे पाय खूप दुखत असल्याची तक्रार केली. राजाचे असे म्हणणे होते कि रस्त्यात जे दगड धोंडे, गोटे पडले आहेत त्यामुले त्याचे पाय खूप दुखत आहेत. यावर काही उपाय लवकरात लवकर केला पाहिजे. मंत्रीगण विचार करू लागले कि काय उपाय करावा? पण राजाच तत्काळ म्हणाला कि या देशात कुणाला सुद्धा दगडगोटे टोचू नयेत यासाठी सर्व रस्त्यांवर एक चामडे अंथरले जावे व त्याने संपूर्ण रस्ता आच्छादित करावा.
राजाचे हे बोलणे ऐकून सगळे मंत्रीगण आता मात्र कोड्यात पडले कि या मूर्खपणाच्या निर्णयावर बोलावे तरी कसे आणि काय? कारण जो उलट बोलेल त्याला राजा शिक्षा करेल. म्हणून कोणीच काही बोलले नाही. शेवटी मध्ये बराच वेळ गेला कोणीच काही बोलेन तेंव्हा एक बुद्धिमान मंत्री उठला व राजाला म्हणाला कि महाराज मी एक उपाय सुचवितो ज्याने चामडे अंथरण्यासाठी लागणारा अतिरिक्त पैसा वाचेल आणि तुम्हालाही दगडगोटे टोचणार नाहीत. राजा म्हणाला सांग कि लवकर! मंत्री म्हणाला,"सगळ्या देशातील रस्त्यांवर चामडे अंथरण्यापेक्षा महाराज तुम्हीच चांगल्या प्रतीचे जोडे का बनवून घेत नाहीत? यातून खर्च हि कमी होईल आणि तुम्हाला पण कष्ट होणार नाहीत." राजा आश्चर्य चकित होवून मंत्र्याकडे पाहत राहिला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने जोडे बनविण्यासाठी कारागिराला बोलावणे धाडले.
तात्पर्य- कायम अशा उत्तराबद्दल विचार केला पाहिजे कि ज्यामुळे आपले कमीत कमी नुकसान होइल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कधीकधी चुकूही शकतात. दुसऱ्यांबरोबर चर्चा करूनही कधी कधी उत्तर मिळते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.