A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : १२ / ०६ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील ‘वूमन ग्रॅंडमास्टर’ बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.
(Image Credit: Koneru Hampi)
१९९६
एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.
१९९३
पृथ्वी क्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी
१९७५
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातल ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधींनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लादली. या निर्णयाचे देशाच्या राजकीय पटलावर दूरगामी परिणाम झाले.
(Image Credit: Indian History Pics)
१९५७
जावेद मियाँदाद – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक
१९२९
अॅन फ्रँक – ‘द डायरी ऑफ अॅन फ्रॅंक’ या पुस्तकामुळे प्रसिद्ध झालेली जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी
(मृत्यू: ?? मार्च १९४५)
१९१७
भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार
(मृत्यू: २१ जून २०१२)
२००३
ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता
(जन्म: ५ एप्रिल १९१६)
२०००
पु. ल. देशपांडे तथा ‘पु. ल.’ – आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते
(जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
१९८३
नॉर्मा शिअरर – कॅनेडियन-अमेरिकन अभिनेत्री
(जन्म: १० ऑगस्ट १९०२)
१९८१
प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश
(जन्म: १६ मार्च १९०१)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
जीवनाचे रहस्य
एक माणूस जीवनाला कंटाळला होता. त्याला असे वाटत होते की, इतक्या मोठया जगात आपण एकाकी आहोत. त्याला कोणी जवळ करत नाही, तो कोणाच्या प्रेमास पात्र नाही, असा विचार करून दु:खी राहायचा. वसंत ऋतु आला आणि चहूकडे सुगंधी फुले उमलल्याने सुवासाचा दरवळ पसरला होता. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना त्या व्यक्तिने स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. अचानक एक छोटी मुलगी दरवाजा उघडून घरात आली व म्हणाली,'' तुम्ही उदास आहात असे दिसते. याचे कारण काय?'' तो म्हणाला,'' माझ्यावर कोणी प्रेम करत नाही.'' ती मुलगी म्हणाली,'' तुम्ही कोणावर प्रेम करता?'' त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा ती मुलगी त्याला म्हणाली,'' बाहेर येऊन पहा! तुमच्या दारासमोरच प्रेमाचा किती दरवळ आहे.'' तिने त्याचा हात धरून बाहेर पसरलेल्या फुलांच्या ताटव्यात उभे केले. तुम्ही ज्या फुलांवर जितके प्रेम कराल तितके करा! ते तितकेच प्रेम तुम्हाला देतील.'' त्या मुलीच्या बोलण्याने त्याचा भ्रम दूर झाला आणि त्याचे जीवन आनंदी झाले.
तात्पर्य:- जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला की जीवन आनंदी होण्यास मदत होते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.