A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : १३ / ०६ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०००
स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुध्द खेळतांना ग्रॅडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला, तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढती तीन तास सुरु होत्या.
१९९७
दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्यूमुखी पडले तर सुमारे १०० जण जखमी झाले.
(Image Credit: Cinemaazi)
१९८३
पायोनिअर-१० हे मानवविरहित अंतराळयान नेपच्यूनची कक्षा ओलांडून आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे जाणारे पहिले यान ठरले.
१९७८
इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
१९२३
प्रेम धवन – धरती के लाल (१९४६) या चित्रपटापासून त्यांनी आपल्या गीतलेखन कारकिर्दीला सुरुवात केली. ज़िद्दी (१९४६) या चित्रपटातील ‘चंदा रे जा रे’ या गाण्याने ते प्रकाशझोतात आले. नंतर आरजू (१९५०), तराना (१९५१), बडी बहू (१९५१), हमदर्द (१९५३), जागते रहो (१९५६), एक साल (१९५७), गेस्ट हाऊस (१९५९), हम हिंदुस्तानी (१९६०), काबूलीवाला (१९६१), शहीद (१९६५), एक फूल दो माली (१९६९), पवित्र पापी (१९७०) इ. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. अनिल बिस्वास, सलील चौधरी आणि चित्रगुप्त या संगीतकारांबरोबर त्यांची विशेष जोडी जमली. १९७० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(मृत्यू: ७ मे २००१ - मुंबई)
(Image Credit: Cinemaazi)
१९०९
इ. एम. एस. नंबूद्रीपाद – केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(मृत्यू: १९ मार्च १९९८)
१९०५
कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ‘दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते.
(मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ - मुंबई)
२०१२
‘गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक
(जन्म: १८ जुलै १९२७)
१९६९
प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते
(जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
१९६७
विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार, १९२८ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री (१९६२)
(जन्म: २ आक्टोबर १८९१)
अलिबागजवळ सासवणे येथे त्यांच्या कलाकृतींचे शिल्पालय आहे.
(Image Credit: Alchetron)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
महत्त्व मानवसेवेचे
एक प्रसिद्ध संत होते. त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी दूरदूरवरून शिष्यगण येत असत. त्यांच्या शिष्य परिवारातील दोन शिष्य त्यांना खूप प्रिय होते. कारण ते दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. दोघेही पहाटे लवकर उठून स्नान करून पूजापाठ करण्यात मग्न होते. चार तासांच्या पूजेनंतर ते दोघे थेट गुरुजवळ जात व आश्रमात येणा-या रूग्णांची सेवा करण्यास ते गुरुला मदत करत. त्या संतमहात्म्याने तर मानव सेवेचे व्रतच घेतले होते त्यामुळे स्वत: पुढाकार घेऊन पीडित,दीनदुबळ्यांची सेवा करत असत. गरीब मुलांना नि:शुल्क शिक्षण देत असत. गरीब कुटुंबाला ते अन्न,वस्त्र, निवारा उपलब्ध करून देत.
असहाय, अनाथ व आजारी नागरिकांना आश्रय देऊन त्यांच्या उपचारांची व्यवस्था करत असत. एकेदिवशी त्यांचे दोन्ही शिष्य त्यांच्या दीर्घपूजेत व्यग्र होते. त्याचवेळी गुरुजींचे बोलावणे आले. कारण त्यादिवशी आश्रमात रुग्णांची संख्या जास्त होती. परंतु दोन्ही शिष्य पूजा अर्धवट सोडून गेले नाहीत. गुरुजींनी थोडा वेळ वाट पाहून पुन्हा निरोप धाडला. त्यावर त्या दोघांनी नाराजी व्यक्त केली व तेथे येऊन ते गुरुजींशी वाद घलू लागले. तेव्हा गुरुजींनी त्यांना पुढील शब्दात मार्गदर्शन केले,''वत्सांनो, मी तर व्यक्तिपूजेसाठी बोलावणे धाडले होते. पूजा, प्रार्थना तर देवतादेखील करतात. परंतु सेवा ही केवळ मनुष्यच करतो. सेवा ही प्रार्थनेच्या बरोबरीची असते. कारण ती नि:स्वार्थी आणि परोपकारी असते.'' यानंतर त्या दोन्ही शिष्यांचे डोळे उघडले.
तात्पर्य :- ईश्वराची जिवंत कलाकृती म्हणजे माणूस त्याची सेवा म्हणजे साक्षात ईश्वराची पूजा असते व त्या सेवेपेक्षा अन्य कोणतीही पूजा ही मोठी नाही.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.