शाळेला जायचंय मोठं ही व्हायचंय
वाचाय-लिहायला, गणित शिकायचंय ।
आमची मुलं हो तयार... आमची मुलं हो तयार... ॥धृ॥
नाव-गाव सांगतात
रंग ओळखतात
वस्तूही मोजतात
ओळखतात सगळे आकार... आमची... ।।१।।
अंक ओळखतात
अक्षर ओळखतात
गोष्टीही सांगतात
समजतात सगळे विचार... आमची... ।।२।।
गाणी पण म्हणतात
नाचून दाखवतात
स्वच्छ ही राहतात
आत्मविश्वास यांचा फार... आमची... ।।३।।
ताई पण म्हणतात
बाई पण म्हणतात
गावातले बोलतात
शहरातले बोलतात
शाळेला जायला तयार होतात...आमची
आमची मुलं हो तयार...
आमची मुलं हो तयार... ।।४।।
स्मितीन ब्रीद
(जवा नवीन पोपट हा - या गाण्याची चाल)
गीत- सुवर्णा फडतरे
Tags
शाळापूर्व तयारी