A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : १८ / ०६ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९८१
जनावरांमधे आढळणार्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
१९५६
रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
१९४६
डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला ‘१८ जून रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे.
१९०८
फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
१९६५
उदय हुसेन – इराकचे हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचा मुलगा
(मृत्यू: २२ जुलै २००३)
१९४२
थाबो म्बेकी – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष.
कार्यकाल: १६ जून १९९९ ते २४ सप्टेंबर २००८
१९४२
पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, ‘बीटल्स’चा सदस्य
१९३१
के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक
(मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२)
२०२१
मिल्खा सिंग – ‘द फ्लाइंग सिख’
(जन्म: १४ एप्रिल २० नोव्हेंबर १९२९)
२००९
उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्मविभूषण (१९६९), मॅकआर्थर फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, नॅशनल हेरिटेज फेलोशिप
(जन्म: १४ एप्रिल १९२२ - शिबपूर, कोमिल्ला, बांगला देश)
२००३
जानकीदास मेहरा ऊर्फ जानकीदास – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते, निर्माते आणि पटकथालेखक, १९३६ मध्ये बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य, ८ विश्वविक्रम मोडणारे निष्णात सायकलपटू
(जन्म: १ जानेवारी १९१०)
१९९९
श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार
(जन्म: ८ जुलै १९२८)
१९७४
सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या लोकसभेतील खासदार (जबलपूर), पद्मभूषण (१९६१)
(जन्म: १६ आक्टोबर १८९६)
(Image Credit: Hindi Jeevan Parichay)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
मोहोर आणि बियाणे
अंबाप्रसाद नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना दोन मुलगे होते. एकाचे नाव होते लक्ष्मिधर आणि दुसऱ्याचे भूपाल. लक्ष्मिधरला नावाप्रमाणेच संपत्तीची हाव होती तर भूपाल हा भूमातेची सेवा करण्यात धन्यता मनात असे. अंबाप्रसाद हे आता वृद्ध झाले होते. त्यांनी आपल्या संपत्तीची वाटणी करायचे ठरविले, राहता वाडा त्यांनी एका शाळेसाठी देवून टाकला. दोन्ही मुलांसाठी त्यांनी दोन पर्याय तयार केले होते. एका बाजूला हंडाभर मोहोरा आणि एका बाजूला माळरान जमीन आणि तीन पोती बियाणे. मग त्यांनी दोन्ही मुलांना बोलावले आणि सांगितले. ह्या दोन गोष्टीपैकी एकाची निवड करण्यास सांगितले, लक्ष्मिधरने विचार केला, माळरान आणि बियाणे घेवून शेती कुठे करत बसणार त्यापेक्षा आपण मोहोरांचा हंडा घेवू आणि त्या पैशाने वाडा विकत घेवून आयुष्यभर सुखात राहू. त्याने तो पर्याय स्वीकारताच भूपालाकडे दुसरा पर्याय नव्हताच. त्याने आनंदाने आपल्या वडिलांची ती देणगी स्वीकारली. अंबाप्रसादांचे काही दिवसातच निधन झाले. त्यांच्यानंतर ठरल्याप्रमाणे वाटण्या झाल्या. लक्ष्मिधरने नवीन घर घेतलं. तो चैनीत राहू लागला. भूपाल मात्र माळरान जमीन कसण्यासाठी तयार झाला. त्याने ती जमीन नांगरली, खूप कष्ट घेतले, मशागत केली, वडिलांकडून मिळालेलं बियाणे पेरले. जमीन चांगली होतीच पण कसलेली नसल्याने माळरान झाली होती. जमीन पिकाने बहरली, शेतं डोलू लागली, सुगी झाली आणि भूपालचे घर म्हणजे धान्याचे कोठार झाले, लक्ष्मिधर मात्र संपत्ती उधळत होताआणि मोहोरा संपवून दरिद्री होत होता. भूपाल मात्र सुखाने राहू लागला. वडिलांची देणगी त्याला समजली होती.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.