A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : २३ / ०६ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९८
दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ‘यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
१९९६
अवामी लीगच्या शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या बांगलादेशच्या दुसर्या महिला पंतप्रधान होत.
१९७९
क्रिकेट – इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
१८९४
पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.
१९७२
झिनेदिन झिदान – फ्रेन्च फूटबॉलपटू
१९४२
डॉ. जब्बार पटेल मराठी चित्रपटसृष्टी व रंगभूमीवरील प्रथितयश दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते. घाशीराम कोतवाल आणि तीन पैशांचा तमाशा या तुफान प्रसिद्धी मिळालेल्या नाटकांचे दिग्दर्शक. साखरसम्राटांच्या राजकारणावर आधारित सामना (१९७५) चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर सिंहासन (१९७७), जैत रे जैत (१९७७), उंबरठा (१९८२), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९१) असे एकापेक्षा एक उत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
१९१६
सर लिओनार्ड तथा ‘लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू
(मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)
(Image Credit: Wikipedia)
१९९६
रेमंड रसेल तथा रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, उजव्या हाताने गोलंदाजी करणारे जलदगती गोलंदाज
(जन्म: ३ आक्टोबर १९२१)
१९९४
वसंत शांताराम देसाई – नाटककार, साहित्यिक, साक्षेपी समीक्षक आणि बालगंधर्वांचे चरित्रकार. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या ‘प्रेमसंन्यास’ या नाटकासाठी पदे लिहिली आहेत. विधिलिखित, अमृतसिद्धी (नाटके), मखमलीचा पडदा, नट-नाटक आणि नाटककार, किर्लोस्कर आणि देवल, खाडिलकरांची नाट्यसृष्टी, विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा), बालगंधर्व-व्यक्ती व कला, महात्मा जोतीराव फुले (चरित्र), रागरंग, विश्रब्ध शारदा- २ खंड इ. त्यांची साहित्यसंपदा आहे.
(जन्म: २७ डिसेंबर १९०४)
१९९०
हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ‘साहिब, बिबी और गुलाम’, ‘बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत.
(जन्म: २ एप्रिल १८९८ - हैदराबाद, आंध्र प्रदेश)
१९८२
बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे निधन
(जन्म: ? ? ????)
१९८०
व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री
(जन्म: १० ऑगस्ट १८९४)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
भविष्य
एका गावात एक ज्योतिषी राहत असे. हुशार पण गरीब होता. त्याचा ज्योतिषाचा अभ्यास इतका दांडगा होता कि त्याच्या गणिताप्रमाणेच जणू नियती घडवलेली असावी. पण नशिब कोणाला कुठे घेवून जाईल त्याचा नेम नाही. एके दिवशी त्याच्या बायकोबरोबर त्याचे जोरात भांडण झाले. बायकोने त्याला सांगितले कि आज तरी खायला घेवून या नाहीतर घरी येवू नका. हा बिचारा कोठे जावे कोणाला मागावे या विचारात होता. तितक्यात त्याला सुचले कि या देशाच्या राजाकडे जावे आणि त्याला भविष्य सांगावे तो खुश झाला तर आपले दिवस चांगले येतील. किमान काही दक्षिणा तरी पदरी पडेल. या आशेने तो दरबारात गेला. राजाने सगळी विचारपूस केली आणि त्याला भविष्य सांगायला सांगितले. ज्योतिषाने गणित मांडले आणि त्याचा चेहरा एकदम पडला. राजा अचंबित झाला आता हसतमुखाने भविष्याविषयी बोलणारा हा माणूस एकदम का उदास झाला. त्याने आदेश दिला कि जे आहे ते खरे सांग. त्याने सांगितले कि राजा येत्या काही दिवसात तू मरणार आहेस.
हे ऐकून राजाची बोबडी वळली आणि त्याने त्या ज्योतिषाला अंधार कोठडीत टाकायला सांगितले. मदत राहिली बाजूला पण नशिबी अंधार कोठडी आली. याला काही दिवस उलटले आणि एका सरदाराला यात ज्योतिषाची काही चूक नाही हे जाणवले आणि तो त्याची मदत करायला गेला. सरदाराने सांगितले कि तू राजाला आता असे भविष्य सांग कि तो खुश होईल. ज्योतिषी राजाच्या परवानगीने पुन्हा दरबारात गेला आणि त्याने गणित मांडले. त्याने राजाला सांगितले कि राजा मला तुझा आणि तुझ्या राज्याचा उज्ज्वल भविष्य काळ दिसत आहे. येणारा नवीन राजा हा खूप दयाळू , पराक्रमी आणि प्रजेचे हित साधणारा आहे. आणि लवकरच तुझा मुलगा हा नवीन राजा होणार आहे. हे आपल्या मुलाचे कौतुक ऐकून राजा खुश झाला आणि त्याने त्या ज्योतिषाचा सन्मान करून त्याला भरपूर दक्षिणा दिली. पण प्रत्यक्षात आपला मृत्यू होणार हे त्याने लक्षात घेतले नाही.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.