माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावावर राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
ओतीव बांधा रंग गव्हाला कोर चंद्राची
उदात्त गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची
हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी
सतेज कांती घडीव पुतली सोन्याची
नव्या नवतीची काडी दवन्याची
रेखीव भुवया कमान जणू इन्द्रधनुची
हिरकणी हिरयाची काठी आंधल्याची
तशी ती माझी गरीबाची
मैना रत्नाची खाण
मैना रत्नाची खाण, माझा जिव की प्राण
नसे सुखाला वाण
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
आहो या गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची
आहो या गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची
झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची
वेळ होती ती भल्या पहाटेची
बांधाबांध झाली भाकर तुकड्याची
घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची
गावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची
शिकस्त केलि मी तिला हसवण्याची
खैरात केली पत्रांची वचनांची
दागिन्यांन मडवुन काडयाची
बोली केली शिंदेशाही तोड्याची
आनो साज कोल्हापुरी वज्रटिक गल्यात माळ पुतल्याची
कानात गोखरे पायात मासोल्या
कानात गोखरे पायात मासोल्या
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची
परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची
आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली होती मी मुम्बैची
मैना खचली मनात
मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात
नाही हसली गालात
हात उन्चावुनी उभी राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
आहो या मुम्बई गर्दी बेकरांची
त्यात भर झाली माझी एकाची
मढ़ेवर पडावी मुठभर माती
तशी गत झाली आमची
ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची
हडसनच्या गाडीची, नायलोनच्या, जोर्जेटच्या, तलम साडीची
बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची
माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथे भलतीच चोरांची
एतखाऊची, शिर्जोरांची, हरामखोरांची, भांडवलदाराची
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची
पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची
पाण्यान भरल खीस माझ
वान माला एका छात्रिची
त्याच दरम्यान उठली चलवल संयुक्त महाराष्ट्राची
बेलगांव, कारवार, निपानी, गोव्यासह एकभाषिक राज्याची
चकाकली संगीन अन्यायाची फ़ौज उठली बिनिवारची
कामगारांची, शेतकरीयांची, मध्यमवर्गियांची
उठला मराठी देश
उठला मराठी देश आला मैदानी त्वेष
वैरी करण्या नामशेष
गोळी डमडमची छातीवर सहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
म्हणे अन्नाभाऊ साठे घर बुडाली गर्वाची
मी-तू पणाची, जुल्माची, जबरिची, तस्कराची
निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची
चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे लंका जलाली त्याची
तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि सका पाटलाची
अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची
परलच्या प्रल्याची, लालबागच्या लढायची, फौंटनच्या चढ़ाइची
झाल फौंटनला जंग
झाल फौंटनला जंग तिथे बांधुनी चंग
आला मर्दानी रंग
धार रक्ताची मर्दानी वाहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची
महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची
दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची
पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची
गावाकडे मैना माझी भेट नाही तिची
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
बेलगांव, कारवार, डांग, उम्बरगावावर मालकी दुजांची
धोंड खंडनीची, कमाल दंडलीची, चिड बेकिची, गरज एकीची
म्हणून विनवणी आहे या शिवशाक्तिला शाहिराची
आता वलु नका
आता वलु नका, रणी पलु नका, कुणी चलू नका
बिनी मारायची अजुन राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
(माझी मैना गावाकडं राहिली)
(माझ्या जिवाची होतिया काहिली)
DISCLAIMER: Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.