A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : ०१ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.
१९९७
शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.
१९९१
सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला ‘वॉर्सा करार’ संपुष्टात आला. परस्पर संरक्षणाचा हा करार ‘नाटो करारा’ला प्रतिशह देण्यासाठी १४ मे १९५५ रोजी करण्यात आला होता.
१९६४
न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
१९६२
सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.
१९६१
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू झाले.
१९६०
रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
१९५५
‘स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली. याआधी ही बँक इंपिरिअल बँक या नावाने ओळखली जात होती.
१९४९
त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ‘थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.
१९४८
बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या ‘पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना
१९४८
‘कायदेआझम’ मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्घाटन झाले.
१९४७
फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
१९६६
उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक
१९६१
कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर
(मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)
१९४९
वेंकय्या नायडू – भारताचे १३ वे उपराष्ट्रपती, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष
१९३८
पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक, पद्मविभूषण
१९१३
वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे चौथे (आणि आतापर्यंत सर्वाधिक कार्यकाळ असलेले) मुख्यमंत्री (५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५), ६ व्या लोकसभेतील खासदार (वाशीम मतदारसंघ), मध्यप्रदेशमधील विधानपरिषदेचे सदस्य (१९५२ - १९५७)
(मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)
१९९४
राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक
(जन्म: ? ? ????)
१९८९
प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ, ‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ‘देवा तुझे किती, सुंदर आकाश’, ‘डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत.
(जन्म: ? ? ????)
१९६९
मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार
(जन्म: ? ? ????)
१९६२
डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य
(जन्म: १ जुलै १८८२ - पाटणा, बिहार)
१९६२
पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष
(जन्म: १ ऑगस्ट १८८२)
१९४१
सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री
(जन्म: १० एप्रिल १८८० - विजयनगरम, आंध्र प्रदेश)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
संकटसमयीचे धैर्य
अरब देशात पूर्वी एक बादशहा होऊन गेला. तो अत्यंत थाटात राहायचा. एकदा शेजारच्या देशाने त्याला युद्धाचे आव्हान दिले. बादशहा आपले सैन्य घेऊन सीमेवर निघाला. दुर्दैवाने त्याला शत्रूकडून हार पत्करावी लागली. त्याला बंदी बनवून आणण्यात आले. त्याला त्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे स्वयंपाक्यांनाही ठेवण्यात आले होते. त्याने आपल्या स्वयंपाक्यास जेवण बनवण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्याकडे एकच मांसाचा तुकडा उरला होता. त्यांनी तोच तुकडा उकळण्यासाठी ठेवला. तेवढयात एक कुत्रा तेथे आला. मांसाच्या तुकड्याचा वास आल्याने त्याने भांड्यात तोंड घातले. पण त्याचे तोंड त्या भांडयात अडकले. आपले तोंड भांड्यातून सोडवू न शकलेले ते कुत्रे पळून गेले. ते पाहून बादशहाला हसू आवरले नाही व तो हसू लागला. बादशहा हसतो आहे हे पाहून पहा-यावरील सैनिकाने त्याला विचारले, तुम्ही इतक्या अडचणीत असूनसुद्धा हसता कसे? दुसरा कोणी असता तर शरमेने मान खाली घालून बसला असता. तेव्हा बादशहा म्हणाला,’’ तोंड लपवून कोणती समस्या सुटते काय? वेळ फिरली की काय काय करावे लागते हे आता कुत्र्यापासून पहायला मिळाले याचे मला हसू आले आणि शिकायलाही. खरा माणूस दु:खही हसून पचवतो. संकटसमयी आशावादी राहून संकटाशी मुकाबला करणारे धैर्यशील म्हणवले जातात.’’
तात्पर्य :- संकटाशी सामना करणे हेच पुरुषार्थाचे
लक्षण आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.