A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : ०३ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००६
एक्स.पी.१४ हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळुन (साधारण चंद्राइतक्या अंतरावरुन) गेला. अगदी अलीकडेच म्हणजे १० डिसेंबर २००४ रोजी या लघुग्रहाचा शोध लागला होता.
(Image Credit: Wikipedia)
२००१
सुधीर फडके यांना राज्य सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
२०००
आय. एन. एस. विक्रांत (R11) या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रुपांतर करण्यास नौदल, राज्यसरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छिमार प्रतिनिधींनी? मान्यता दिली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटनने १९४७ साली सेवेतून काढून टाकलेली ही युद्धनौका भारताने १९५७ मध्ये खरेदी केली आणि ४ मार्च १९६१ रोजी ती भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली. ३१ जानेवारी १९९७ पर्यंत ती नौदलाच्या सेवेत होती.
(Image Credit: Wikipedia)
१९९८
‘ए मेरे वतन के लोगो ...’ या प्रसिद्ध गाण्याचे कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
१९३८
‘मॅलार्ड’ हे वाफेचे इंजिन ताशी १२६ मैल (२०२ कि. मी.) वेगाने न्यू कॅसलहून लंडनला पोहोचले. वाफेच्या इंजिनाचा हा वेगाचा विक्रम अजूनही अबाधित आहे. सद्ध्या वाफेची इंजिने बनवत नाहीत हे ही त्यामागचे एक कारण असावे.
(Image Credit: Popular Mechanics)
१८९०
आयडाहो हे अमेरिकेचे ४३ वे राज्य बनले.
१९८०
हरभजनसिंग – भारतीय क्रिकेटपटू
(Image Credit: espncricinfo.com)
१९७६
हेन्री ओलोंगा – झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू
१९५१
सर रिचर्ड हॅडली – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९२६
सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक, पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी
(मृत्यू: ७ नोव्हेंबर २००९)
१९२४
सेलप्पन रामनाथन – सिंगापूरचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
१९१४
दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार
(मृत्यू: ५ जानेवारी १९९२)
१९९६
कुलभूषण पंडित तथा ‘राजकुमार’ ऊर्फ ‘जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता
(जन्म: ८ आक्टोबर १९२६)
(Image Credit: Cinestaan)
१९६९
ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स’चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक
(जन्म: २८ फेब्रुवारी १९४२)
१३५०
संत नामदेव यांनी समाधी घेतली.
(जन्म: २९ आक्टोबर १२७०)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
खुनी सेनापती
कुशलगडचा राजा वीरभद्रला एके दिवशी सेनापतीने सूचना दिली,''महाराज, काल रात्री आपल्या महालात आपल्याच सैनिकाची हत्या झाली आणि त्याच्या् मृतदेहाजवळ हे पत्र मिळाले आहे'' राजाने ते पत्र वाचले, त्यात राजाला धमकी देण्यात आली होती की,'लवकरच कुशलगडचे सिंहासन खाली केल नाही तर रोज एक सैनिक मारला जाईल' राजाने खुन्याचा शोध घेण्यारचा आदेश दिला, या दरम्यान वीरभद्रचा मुलगा बलभद्र हा शिक्षण पूर्ण करून राज्यात परत आला होता. राजकुमार बलभद्रने महालाच्या सुरक्षेच्यात कारभार स्वत:कडे घेतला होता. त्याने सैनिकांना आज्ञा केली. चार-चार सैनिकांची तुकडी बनवून पहारा द्या.
योगायोगाने त्या रात्री कोणत्यााही सैनिकाची हत्या झाली नाही. तेव्हा राजकुमाराने सेनापतीला म्हटले,'' असे वाटते की हत्या करणारा घाबरला आहे. आता ही सुरक्षा व्यवस्था भंग करा.'' सेनापतीने विरोध केला. परंतु राजकुमाराने आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी राजमहालाच्या पाठीमागील बुरुजावर एक सैनिक तैनात करण्यास सांगितले. खुनी त्याला मारण्यासाठी गेला. त्याने सैनिकावर वार केला. परंतु लपुन बसलेल्या राजकुमाराने त्याला पकडले. तो खुनी सेनापती निघाला. त्याने कबुल केले की शेजारील राज्याच्या राजाने त्याला कुशलगडला जिंकल्यावर अर्ध्या राजाचा राजा बनविण्याचे आमिष दाखविले होते. राजाने सेनापतीला कैद करून देहदंडाची शिक्षा दिली.
तात्पर्य :- कधी कधी बाहेरच्या लोकांपेक्षा आपल्या जवळचे लोकच आपल्याला दगा देत असतात. तेव्हा बाहेरच्या दगाफटका तपासताना जवळच्याय लोकांनाही तपासले पाहिजे. अति लोभापायी विश्वासपात्र लोकही दगा देतात.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.