A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : ०६ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००६
चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ‘नाथू ला’ ही खिंड (ला म्हणजेच खिंड) ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
(Image Credit:
१९८२
पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
१९४७
रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरूवात झाली.
१९१०
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना
१८९२
ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.
१९५२
रेखा शिवकुमार बैजल – साहित्यिका
१९४६
जॉर्ज डब्ल्यू. बुश – अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्ष
१९३०
डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)
(मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१६)
१९२७
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी
(मृत्यू: २८ ऑगस्ट २००१)
१९२०
डॉ. विनायक महादेव तथा ‘वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर अर्थविषयक तज्ज्ञ सल्लागार, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक बरेच गाजले.
(मृत्यू: ३० जुलै १९९५)
१९०५
लक्ष्मीबाई केळकर – राष्ट्रसेविका समितीच्या अंस्थापिका
(मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७८)
२००२
धीरुभाई अंबानी – उद्योगपती, रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक
(जन्म: २८ डिसेंबर १९३२)
१९९९
एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज
(जन्म: ३ मार्च १९३९)
१९९७
चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
(जन्म: ३ जानेवारी १९२१)
१९८६
‘बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान
(जन्म: ५ एप्रिल १९०८)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
अडचण
एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याने त्याच्या गरिबीमुळे त्याने एका सावकाराकडून काही पैसे उसने घेतले होते. ब्राह्मणाची परिस्थिती इतकी बिघडली की तो काही पैसे परत करू शकत नव्हता. त्यातच सावकाराने त्याला पैसे परत करण्याूचा तगादा लावला. ब्राह्मण आपले पैसे परत करत नाही हे पाहिल्यावर सावकाराने त्याची तक्रार देशाच्या बादशहाकडे केली. बादशहाने ब्राह्मणाला बोलावणे पाठवले. ब्राह्मणही मग दरबारात हजर झाला. ब्राह्मण दरबाराच्या दारात येताक्षणी सावकाराने बादशहाला मोठया सुरात सांगण्यास सुरुवात केली,''महाराज, हाच तो अधम मनुष्य ज्याने माझ्याकडून ५०० रूपये घेतले आणि आता ते परत करण्यांचे हा नाव सुद्धा काढत नाही. महाराज,तुम्हीच याला माझे पैसे परत करण्याचे आदेश द्यावे ही माझी तुमच्याकडे विनंती आहे.''
बादशहाने ब्राह्मणाकडे सूचक नजरेने पाहिले व ब्राह्मण बोलू लागला,'' महाराज मी याचे पैसे देणे लागतो ही गोष्ट मला मान्य् आहे पण महाराज माझी गाय आणि घोडा मी विक्रीस काढली आहे, ती दोन्ही जनावरे विकली गेली की मी या सावकाराचे पैसे व्याजासहीत परत करीन हा माझा शब्द आहे.'' असे ब्राह्मणाने बोलताच सावकाराचा संताप झाला व तो ब्राह्मणाकडे धावून जात मोठमोठ्याने ओरडू लागला व म्हणाला,'' महाराज हा खोटारडा इसम, किती खोटे बोलत आहे ते पहा, अहो महाराज, याच्या घरात याला खायला अन्नाचा कणही नाही आणि हा गायघोडा पाळण्याची भाषा करतो. याच्यााकडे फुटकीकवडीसुद्धा नाही की जी विकून हा माझे पैसे परत करेल. महाराज याला शिक्षा करा'' सावकाराचे बोलणे संपताच ब्राह्मण हात जोडून सावकाराला व बादशहाला नम्रपणे म्हणाला,'' महाराज मी खोटे बोललोही असेन पण बघा सावकाराला माझी सर्व आर्थिक परिस्थिती माहिती आहे तरीही ते मला पैशाचा तगादा लावत आहेत. महाराज सर्व दिवस सारखे नसतात आज माझ्याकडे पैसा नाही पण माझ्याकडे पैसे आल्या वर मी सावकाराचे ऋण फेडून टाकीन एवढे खरे.'' बादशहाने ब्राह्मणाच्या बोलण्यातील तळमळ ओळखून स्वत:कडील पैसे सावकाराला दिले व ब्राह्मणाला सन्मानपूर्वक घरी पाठविले.
तात्पर्य :- अडचणीत असणाराला नेहमीच मदत करावी. तसेच मदत करताना तो खरेच अडचणीत आहे की नाही याचीही शहानिशा करणे गरजेचे आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.