A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : ०८ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०११
रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी प्रथमच चलनात आली.
२००६
मुख्य निवडणूक आयुक्त असताना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
१९९७
बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
१९५८
बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
१९३०
किंग जॉर्ज (पाचवा) यांच्या हस्ते लंडनमधे ‘इंडिया हाऊस’चे उद्घाटन
१९१०
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.
१९७२
सौरव गांगुली – भारताचे क्रिकेट कर्णधार, बी. सी. सी. आय. (BCCI)चे अध्यक्ष
१९४९
वाय. एस. राजशेखर रेड्डी – (अविभाजित) आंध्रप्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री
(मृत्यू: २ सप्टेंबर २००९)
१९२८
श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार
(मृत्यू: १८ जून १९९९)
१९२२
अहिल्या रांगणेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या, ६ व्या लोकसभेतील खासदार (उत्तर मध्य मुंबई). समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न व स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बलात्कारविरोधी कायदा बदलून घेतला; परंतु त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही याची त्यांना खंत वाटे. स्त्रियांना 33 टक्के आरक्षण मिळावे यासाठी त्या आग्रही व प्रयत्नशील होत्या.
(मृत्यू: १९ एप्रिल २००९)
२००६
प्रा. राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ‘न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८).
(जन्म: ५ नोव्हेंबर १९०८)
२००३
प्रा. हरी श्रीधर शेणोलीकर – मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचे व संतसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक अभ्यासक. त्यांचे नामदेव गाथा (संपादित), नाम्याची अमृतवाणी, प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप, मराठी संतवाणीचे मंत्राक्षरत्व, मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञाकोश इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत.
(जन्म: २२ जानेवारी १९२० - जमखंडी, कर्नाटक)
२००१
तबला विभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे कोल्हापूर येथे निधन
(जन्म: ? ? ????)
१९९४
डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व ‘गोवा पुराभिलेख’चे संचालक
(जन्म: ? ? ????)
१९९४
किम सुंग (दुसरे) – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १५ एप्रिल १९१२)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
अदृश्य पेरु
एका सात वर्षाच्या मुलीला एक शिक्षक गणित शिकवित होते. त्यांनी तिला प्रश्न विचारला,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलीने काही काळ विचार केला आणि बोटे मोजत उत्तर दिले,'' चार पेरू'' शिक्षक आश्चर्यचकित झाले, त्यांना वाटले की मुलीने नीट ऐकले नसावे म्हणून त्यांनी प्रश्न पुन्हा विचारला,'' बाळा प्रश्ना नीट ऐक,'' समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्हा एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मुलगी शिक्षकांच्या आश्चर्यचकित चेह-याकडे पाहत विचार करू लागली. मगाशी मी चार उत्तर दिले तर शिक्षक आश्चर्यात पडले आता असे काय उत्तर द्यावे जेणेकरून ते खुश होतील. तिच्या डोक्यात असा विचार जरा सुद्धा स्पर्शून गेला नाही की खरे उत्तर द्यावे तिला फक्त असे वाटत होते आपल्या उत्तराने शिक्षक खुश झाले पाहिजेत. ती पुन्हा बोटे मोजू लागली व तिने उत्तर दिले, '' सर चार पेरू माझ्याकडे असतील.'' आता शिक्षक निराश झाले व विचार करू लागले की या मुलीला बहुधा पेरू आवडत नसावेत म्हणून ती चुकीचे उत्तर देत आहे म्हेणून त्यांनी प्रश्नच बदलून विचारायचे ठरवले,'' बाळा समजा मी तुला एक चिकू दिला, मग एक चिकू दिला आणि मग पुन्हा एक चिकू दिला तर तुझ्यापाशी किती चिकू होतील?'' मुलीने परत बोटे मोजली व उत्तर दिले,'' सर तीन चिकू असतील माझ्याकडे'' शिक्षकांना याची मोठी गंमत वाटली कि तीन वेळेला चुकीचे उत्तर देणारी मुलगी चौथ्या वेळेला कशी काय बरोबर उत्तर देते, त्यांना वाटले की आता या मुलीला गणिताची गंमत कळाली,म्हणून त्यांनी परत आपला पहिलाच प्रश्न रिपीट केला,''समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्हा् एक पेरू दिला तर तुझ्यापाशी किती पेरू होतील?'' मागच्या वेळचे उत्तर बरोबर आल्याने मुलीचा आत्मविश्वास आता वाढला होता. तिने फारसा वेळ न दवडता उत्तर दिले,'' सर माझ्याकडे चार पेरू असतील'' हे चुकीचे उत्तर ऐकून शिक्षक संतापले व तिच्या दिशेने जात जोरात ओरडले,'' तुला काही डोक्याचा भाग वगैरे आहे की नाही, जरा मला पण सांग की चार पेरू कसे काय होतील तुझ्याकडे'' सरांना असे रागावलेले पाहून ती छोटीसी मुलगी रडू लागली, डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहत असतानाच ती मुलगी दप्तर शोधू लागली, दप्तरात हात घालून तीने दप्तरातील एक पेरू काढून शिक्षकांना म्हणाली,'' सर तुम्ही मला तीन पेरू देणार आहात आणि माझ्याकडचा एक पेरू मी त्यात मिसळत गेले त्या्मुळे सर मी चार पेरू हे उत्तर देत होते.''
तात्पर्य – मित्रांनो, आपले ही असेच होते ना ब-याचदा, समोरच्या–कडून जर अनुकुल प्रतिसाद आला नाही तर आपण आपला संयम गमावून बसतो पण त्यााची बाजू काय आहे हे आपण कधीच समजून घेत नाही. त्याचा त्यापाठीमागील तर्क, त्यातवेळची परिस्थिती, तो ज्या संस्कृतीमध्ये वाढला आहे त्याचे संस्कार याचा आपण कधीच विचार करत नाही ना. तेव्हा जर इथून पुढे कधी जर आपल्या मनासारखा प्रतिसाद समोरच्याकडून आला नाही तर त्याची कृपया बाजू समजून घ्या. काय सांगावे त्याच्याजवळ असणारा तो छुपा पेरू आपल्याला दिसतही नसेल कदाचित.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.