A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : १२ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ‘टिळक पुरस्कार’ जाहीर
१९९९
‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान करण्यात आला.
१९९८
१६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.
१९९५
अभिनेते दिलीपकुमार यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर
१९८५
पी. एन. भगवती यांनी भारताचे १७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९८२
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना
१९७९
किरिबातीला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९६५
संजय मांजरेकर – क्रिकेटपटू
१९२०
यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश
(मृत्यू: १४ जुलै २००८)
१९१३
मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक
(मृत्यू: १४ जून २०१०)
१९०९
बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक
(मृत्यू: ८ जानेवारी १९६६)
१८६४
वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य
(मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)
१८६४
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ
(मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
१८५४
जॉर्ज इस्टमन – अमेरिकन संशोधक व इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक
(मृत्यू: १४ मार्च १९३२)
२०१८
जशन पहलाजराय वासवानी तथा दादा जे. पी. वासवानी – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य
(जन्म: २ ऑगस्ट १९१८)
२०१३
प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ‘प्राण’ – चित्रपट अभिनेता
(जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)
२०१२
दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता
(जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)
१९९९
राजेंद्रकुमार – हिन्दी चित्रपट अभिनेता
(जन्म: २० जुलै १९२९)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
मानवता
जगाच्या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्या कुटीत ईश्वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्यांच्यांकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्यांच्यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्यूनंतर ते जेव्हा स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना सोन्याचा मुकुट घालण्यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्यांच्या डोक्यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्वात कोणत्याच दृष्टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्याचा मुकुट व त्या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का?असा भेदभाव स्वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्यांचे बोलून झाल्यावर देवदूत म्हणाला,’’ तुम्ही पृथ्वीवर हिरे माणके दिलेली नव्ह्ती तेव्हा तुम्हााला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्हणजे अश्रू होते. जे त्यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल त्यांना वाईट वाटले व त्याबद्दल त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्वरभक्ती आणि स्नेह यातच खूप आनंदी होतो म्हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्ह्णाला,’’ तुम्हाला ईश्वराचा स्नेह मिळाला म्हणूनच तुम्हाला ईश्वराचा सोन्याचा मुकुट देण्यात आला आहे.’’ संताना स्वत:ची चुक समजली. ते स्वतःमध्येच मशगुल राहिले. त्यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही.
तात्पर्य:-ईश्वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.