A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : १४ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०१३
डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.
१९७६
कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
१९६९
अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
१९६०
चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. पुढील ४५ वर्षे त्यांनी चिंपांझींमधील कौटुंबिक व सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी संशोधन केले.
१८६७
आल्फ्रेड नोबेल यांनी ‘डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
१९६७
हशन तिलकरत्ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व राजकारणी
१९४७
नवीन रामगुलाम – मॉरिशसचे ३ रे व ६ वे पंतप्रधान
१९२०
शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
(मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)
१९१७
रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन’ – संगीतकार
(मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)
२००८
यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश
(जन्म: १२ जुलै १९२०)
२००३
प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ‘रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक
(जन्म: २९ जानेवारी १९२२)
२००३
लीला (नगरकर) चिटणीस
(जन्म: ९ सप्टेंबर १९०९ - धारवाड, कर्नाटक)
(Image Credit: IMDb)
१९९३
श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार
(जन्म: ? ? ????)
१९७५
मदनमोहन – संगीतकार
(जन्म: २५ जून १९२४)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
एम.विश्वेश्वरैया
खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. माणसांनी खच्चून भरलेली एक रेल्वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त भरणा हा इंग्रजांचा होता. एका डब्यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा हा मनुष्य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्यांच्या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्याततील बहुतांश इंग्रज त्याची चेष्टाकमस्करी करत होते. त्याला खेडूत, अडाणी समजून त्याच्या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्यांच्या त्या चेष्टामस्करीकडे, टिंगल करण्याकडे त्या भारतीयाचे लक्ष नव्हते. तो त्यांच्या नादात मग्न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्यातने रेल्वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्याला काहीही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्वे थांबविली’’ त्या, सावऴया रंगाच्या व्यक्तिने उत्तर दिले,’’ मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्वे’’ गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्यक्ति उत्तरली,’’ माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्वे पट्ट्या खराब झाल्या आहेत.’’ गार्डने विचारले,’’ हे तुला कसे कळले’’ ती व्यक्ति म्हाणाली,’’ माझ्या अनुभवानुसार रेल्वेच्या गतीमध्ये काही फरक पडला आहे आणि त्यामुळे रेल्वेचा जो विशिष्ट आवाज येतो तो न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे.
असा आवाज फक्त रेल्वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.’’ गार्डने याची खातरजमा करून बघण्यासाठी त्या व्याक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असताना रेल्वेत त्या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्चर्यचकित झाले. केवळ त्या माणसाच्या ज्ञानामुळे आज त्यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्या माणसाची प्रशंसा व स्तुती करू लागले. गार्डने त्यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय’’ त्या माणसाने शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव डॉ.एम. विश्र्वेश्वरैय्या असून मी व्यावसायाने इंजिनियर आहे.’’ त्यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्तब्ध झाले. कारण त्याकाळात विश्र्वेश्वारैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्हणून ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्यांची क्षमा मागितली.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.