A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : १५ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९७
पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड
१९६२
शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ
१९५५
पंडित जवाहरलाल नेहरू यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
१९५५
आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.
१९२७
समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९२६
मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.
१९४९
माधव कोंडविलकर – दलित साहित्यिक
१९३२
नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक
(मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
१९२७
प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
(मृत्यू: २९ जून २०१०)
१९०५
चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान
(मृत्यू: २ डिसेंबर १९८०)
१९०४
गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)
२००४
डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
(जन्म: २२ ऑगस्ट १९१८)
१९९९
इंदुताई टिळक – सामाजिक कार्यकर्त्या
(जन्म: ? ? ????)
१९९९
जगदीश गोडबोले – पर्यावरणवादी लेखक व सामाजिक कार्यकर्ते
(जन्म: ? ? ????)
१९९८
ताराचंद परमार – गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक
(जन्म: ? ? ????)
१९९१
जगन्नाथराव जोशी – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते
(जन्म: ? ? १९२०)
१९६७
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ ‘बालगंधर्व’ – गायक व अभिनेते
जशा जन्मती तेज घेऊन तारा
जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई कंठात घेऊन गाणे
असा बालगंधर्व आता न होणे ।
रतीचे तया रूप लावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे
सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे।
अशा काव्यमय शब्दांत महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी बालगंधर्व यांचे समर्पक वर्णन केले आहे.
(जन्म: २६ जून १८८८)
(Image Credit: Vision of Life)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
उपाय
आचार्य विनोबा भावे यांना भेटायला एक महिला आली. ती म्हणाली,'' मी दु:खी आहे. माझा पती दारुडा आहे. रोज दारू पिऊन मला अपशब्द बोलत असतो आणि कधी-कधी मारहाणही करतो. माझे जीवन त्याने नरकासमान बनवले आहे.'' विनोबांनी तिला विचारले,''तो जेव्हा दारू पितो तेव्हा तू काय करत असतेस?'' ती म्हणाली,'तेव्हा मला त्याचा खूप राग येतो. पहिल्यांदा मी त्याला फार वाईट बोलायची, परंतु त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही हे पाहून मी आता उपवास करणे सुरु केल आहे.'' विनोबांनी प्रश्न केला,''उपवासात खाणे-पिणे सर्व सोडून देतेस का?'' महिला म्हणाली,''नाही, फळे खात असते.'' तेव्हा विनोबांनी म्हटले,'' मग तर तुझा पती आणखीनच नाराज होत असेल, कारण की तुझ्या फळे खाण्यामुळे घरखर्चात वाढ होत असेल.'' हे ऐकताच महिला रडू लागली तेव्हा विनोबा म्होणाले,'' रागाने किंवा जेवण सोडून दिल्याने कुणालाही चुकीच्या मार्गावरून हटवले जाऊ शकत नाही. प्रेम तेच असते, जे आपल्यात निर्माण होते. मनात दुर्भावना असेल आणि प्रेमाचा देखावा केला तर त्याचा प्रभाव उलट होतो.'' महिला म्हाणाली,''मी काय करु?त्याला दारुच्या नशेत पाहून माझा माझ्यावर ताबा राहत नाही.'' विनोबांनी समजावले,'' हेच तर चुकीचे आहे, तू आपल्या पतीला वाईट मार्गापासून तेव्हाच रोखू शकशील, जेव्हा तू वाईट गोष्टींना समजून घेशील. त्याचा पहिल्यांदा प्रयत्न कर.'' महिलेच्या लक्षात आपली चूक आली की, क्रोधाने क्रोधाला जिंकले जाऊ शकत नाही. त्यावर प्रेमानेच विजय मिळविता येऊ शकतो हाच मार्ग मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला.
तात्पर्य:- वाईट व्यक्तीची घृणा करत बसण्यापेक्षा वाईट वृत्ती कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि हे कार्य दृढ इच्छाशक्तीनेच शक्य आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.