A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : १८ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९६
उद्योगपती गोदरेज यांना जपान सरकारतर्फे ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९६
‘तामिळ टायगर्स’नी श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेऊन सुमारे १२०० जवानांना ठार केले.
१९८०
भारताने ‘एस. एल. व्ही. - ३’ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. या यशामुळे भारत हा उपग्रह सोडण्याची क्षमता असलेला जगातील सहावा देश बनला.
१९७६
मॉन्ट्रिअल ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
१९८२
प्रियांका चोप्रा – मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि ‘मिस वर्ल्ड २०००’ विजेती
१९७२
सौंदर्या – कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिन्दी चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: १७ एप्रिल २००४)
१९३५
जयेन्द्र सरस्वती – ६९ वे शंकराचार्य
१९२७
‘गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक
(मृत्यू: १३ जून २०१२)
१९१८
नेल्सन मंडेला तथा ‘मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ६ डिसेंबर २०१३)
२०१२
राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि लोकसभा सदस्य
(जन्म: २९ डिसेंबर १९४२)
२००१
पद्मिनीराजे माधवराव पटवर्धन – सांगलीच्या राजमाता
(जन्म: ? ? १९२१)
२००१
रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू
(जन्म: २८ जून १९३४)
१९९४
डॉ. मुनीस रझा – ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
(जन्म: ? ? ????)
१९८९
डॉ. गोविन्द केशव भट – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत व इंग्रजी लेखक
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
शोध
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती. तिने आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्हाणजे काहीतरी खाण्यासची गोष्ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले. मौल्यवान अशा कंठ्यामध्ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्याने ते खाण्याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्या लक्षात एक गोष्ट आली की आपला मौल्यलवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्ही' त्याचा शोध घेण्याकचे आदेश द्या.'' राजा म्ह्णाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्या हाराचा शोध घ्या . जो कोणी तो हार आणून देईल त्याला आपण अर्धे राज्य बक्षीस म्हणून देऊ अशी घोषणाही त्याने त्यावेळी केली. अर्धे राज्य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्याच्या नाल्या मध्ये त्याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्या पाण्यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्या बक्षीसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्याा मनातही लोभ निर्माण झाला. त्यानेही अर्धे राज्य मिळविण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली. पण हार पुन्हा गायब झाला. त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्या आशेने त्या घाण पाण्याात उड्या मारू लागले पण हार कुणाच्याच हातात येत नव्हता.
सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्य प्रधानजी यांनाही अर्ध्या राज्याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्हा कोणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्य त्या पाण्याच्या वास सहन न झाल्याने पटकन पाण्यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्या साठी प्रयत्न केले हे राजाच्या कानावर गेले व त्याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्य गमवावे लागेल. त्यासाठी राजाही तेथे आला व त्याने आपली राजवस्त्रे उतरवली आणि त्यानेही त्या नाल्याात उडी मारली. त्याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्या, घाणेरड्या पाण्यात का उडी मारतो आहे?लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्याात पडला आहे म्हणून सर्वजण पाण्यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्याना विचारले काय झाले? संत त्यावर म्हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्ही ज्या हाराकडे पाहून पाण्यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्यात दिसत आहे ते त्याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्याात शोधत आहात.'' लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर लोक शरमिंदा झाले.
कथासार :- मानवी जीवनाची पण आज त्या लोकांप्रमाणेच अवस्था झाली आहे. जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती हे शोधण्यापेक्षा आपण त्याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्यापेक्षा आपण कितीतरी गोष्टीत गमावित आहोत. खरंय ना
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.
Very nice 👍
ReplyDelete