A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : १९ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९६
अमेरिकेतील अटलांटा, जॉर्जिया येथे २६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९९३
ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
१९९२
ऊर्दू शायर मजरुह सुलतानपुरी यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर
१९८०
सोविएत युनियनमधील मॉस्को येथे २२ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७६
नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.
१९५५
रॉजर बिन्नी – क्रिकेटपटू
१९४६
इलि नास्तासे – रोमानियन टेनिसपटू
१९३८
डॉ. जयंत विष्णू नारळीकर – खगोलशास्त्रज्ञ, १९६४ मधे केम्ब्रिज विद्यापीठात डॉ. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर संशोधन करुन गुरुत्वाकर्षणासंदर्भातील एक नवा सिद्धांत मांडला. पद्मभूषण (१९६५), पद्मविभूषण (२००४), फाय फौंडेशनचा राष्ट्रभुषण पुरस्कार (१९८१), महाराष्ट्र भूषण (२०१०), फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे प्रिक्स ज्यूल जान्सेन पारितोषिक, इन्फोसिस पारितोषिक (२००९), भटनागर पारितोषिक, एम. पी. बिर्ला पारितोषिक, साहित्य अकादमी अवॉर्ड (२०१४) इत्यादि पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नाशिक येथे २०२१ मध्ये झालेल्या ९४ व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१९०२
यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक
(मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)
१८९६
ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक
(मृत्यू: ६ जानेवारी १९८१)
२०१७
भिलारे गुरुजी – १९४४ मध्ये नथुराम गोडसे याने पाचगणी येथे गांधीजींवर जंबियाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्या हल्ल्यातून भिलारे गुरुजींनी गांधीजींना वाचवले.
१९६८
प्रतापसिंह गायकवाड – बडोद्याचे महाराज
(जन्म: २९ जून १९०८)
१९६५
सिंगमन र्ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २६ मार्च १८७५)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
खरी आई की खोटी आई
एका आठ वर्षाच्या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्याग संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून वडील दुसरे लग्न करून त्या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते? तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे?म्हणून पुन्हा त्या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हा तान्हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्वत:च्या, मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्हाला? गेल्या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणत आहे.''
तात्पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात
मोठी देणगी आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.