A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : २१ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००२
जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्या ‘वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
१९८३
अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
१९७६
आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या
१९६०
सिरीमावो बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.
१९४७
चेतन चौहान – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य
१९३४
चंदू बोर्डे – क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष
१९३०
डॉ. रा. चिं. ढेरे – ज्येष्ठ साहित्यिक व प्रख्यात इतिहास संशोधक
(मृत्यू: १ जुलै २०१६)
१९१०
वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक
(मृत्यू: १६ मार्च १९९०)
२००९
गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(जन्म: ५ मार्च १९१३)
२००१
विझुपुरम चिन्नया मनरायार तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते
(जन्म: १ आक्टोबर १९२८)
(Image Credit: Wikipedia)
१९९५
सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक
(जन्म: १५ जून १९१७ - सीतामहू, मंदसौर, मध्य प्रदेश)
१९९७
राजा राजवाडे – साहित्यिक
(जन्म: १ जानेवारी १९३६)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
राक्षसी प्रवृत्ती
एक राक्षस होता. त्याला आपल्या सर्व कामासाठी एका माणसाची गरज होती. त्याने शोधाशोध करून एका माणसाची नियुक्ती केली. तो माणूस खूप सज्जन होता. राक्षस सांगेल ते कोणतेही काम तो पूर्ण करत असे. तो अविरत काम करत असे. मात्र राक्षस आपली वाईट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच. तो त्याला सतत धमकावत असे. कामात त्याला विलंब झालेला चालत नसे. माणसाने जरा जरी कामात विलंब केला तरी मी तुला मारून टाकीन असे धमकीवजा राक्षस बोलत असे. माणूस राक्षसाच्या भीतीने घाबरून आणखी वेगाने काम करत असे. माणूस विचार करायचा की आपण जर काम नीट केले नाही तर आपल्याला हा राक्षस मारून तर टाकायचा नाही ना. एकेदिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो सतत काम करत होता. तो इतका थकला होता की त्यांला सुस्ती येऊ लागली. त्याला एक पाऊलही टाकवेना. थोड्या वेळाने राक्षस आला. माणसाला बसलेला पाहून राक्षस ओरडला,’’ तुझी अशी रिकामे बसून राहण्याची हिंमत झालीच कशी, चल उठ कामाला लाग नाही तर मी तुला खाऊन टाकीन.’’ राक्षसाच्या धमकीने माणूस घाबरला. त्याच्या मनात विचार आला की तू माणूस आहे व तो राक्षस आहे. धमकाविणे हे त्याचे काम आहे. तू जोपर्यंत याला घाबरशील तोपर्यंत हा तुला घाबरवत राहणार. एकदा का होईना याला प्रत्युत्तर दिलेच पाहिजे. शेवटी माणसाने मनाची तयारी केली. आता जे होईल ते होईल पण याला उत्तर हे द्यायलाच हवे हा पुरुषार्थ त्याच्या मनात जागृत झाला व तो राक्षसाला म्हणाला,’’ सारखे सारखे खाऊन टाकण्याची भाषा कशाला करतोस, खायचे असेल तर मला खाऊन टाक म्हणजे मी पण एकदाचा सुटलो.’’ त्याची ही हिंमत पाहून राक्षसाने आपले वागणे बदलले.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.