A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : २३ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९९
केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ‘चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
१९८६
जैवअभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ‘हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.
१९८३
एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. याचा वचपा म्हणून श्रीलंकेच्या सरकारने तमिळवंशीय नागरिकांवर हल्ला केला. जुलै महिन्यात १,००० नागरिक ठार झाले, तर १,००,००० नागरिकांनी भारत, युरोप आणि कॅनडात पलायन केले. येथूनच श्रीलंकेच्या नागरी युद्धाला सुरुवात झाली.
१९८३
माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ - २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले. (या घटनेची चित्रफित पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
१९७६
ज्यूडीथ पोल्गार – हंगेरीची बुद्धीबळपटू
१९४७
डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ
१९२७
गानयोगीनी धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका
(मृत्यू: १ जून २०१४)
१९१७
लक्ष्मीबाई यशवंत तथा ‘माई’ भिडे – नाट्य-चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: ? ? ????)
१९०६
चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक
(मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१
१८८६
वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ४ मार्च १९७६)
२०१२
लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन
(जन्म: २४ आक्टोबर १९१४)
२००४
महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता
(जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
१९९९
दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते
(जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ - अकोले, अहमदनगर)
१९९७
वसुंधरा पंडित – गायिका
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
दानातून मिळाला धडा
कानपूरमध्य़े गंगेच्या काठी बसून एक भिकारी भीक मागत होता. भिकेत त्याला जे मिळेल ते त्यातून तो आपला उदरनिर्वाह चालवित होता. त्याच्या हातात एक कटोरा असायचा. त्याला तो जाणा-या येणा-याच्या पुढे करायचा. ज्याला त्यात काही टाकायाचे असेल ते टाकत होता. परंतु तो भिकारी तोंडाने काही मागायचा नाही. अन्य भिका-याप्रमाणे तो दीनवाणा होत नसे. एके दिवशी तिकडून एक श्रीमंत माणूस जात होता. भिका-याने पाहिले, श्रीमंताच्या- अंगावर अत्यंत भारी कपडे होते, गळ्यात आणि अंगावर सोन्याचे दागिने चमकत होते. उंची राहणी ही त्याच्या वर्तनातून दिसून येत होती. श्रीमंत वाटतो म्हणून भिका-याने त्याच्याकडे कटोरा पुढे केला, ते पाहून त्या श्रीमंताच्या चेह-यावर तिरस्कार उमटला. त्याने खिशातून एक रूपायाचे नाणे काढले व त्या भिका-याकडे फेकले व हसला. तो पुढे निघणार इतक्यात भिकारी जागेवरून उठला. त्याने त्या श्रीमंताचे उद्धट वर्तन व गरीबांसाठी असलेले तिरस्करणीय भाव पाहून ते रूपायाचे नाणे श्रीमंताकडे परत फेकले व म्हणाला,’’ घे सांभाळ तुझी दौलत, मला तुझ्यासारख्या गरीबाचा पैसा नको, ज्या दानामध्ये तिरस्काराचा भाव आहे असे दान स्वीकार करू नये असे मला सांगण्यात आले आहे. दान करतानासुद्धा शुद्ध मनाने, चांगल्या भावाने दान करावे जेणे करून घेणा-याला व देणा-याला समाधान लाभते.परमेश्वघराने माणूस बनविताना जर काही फरक केला नाही तर तू तिरस्कार करून परमेश्वराचा अपमान करतो आहेस हे लक्षात ठेव. ’’ हे ऐकताच श्रीमंताला आपली चूक लक्षात आली. त्याने तात्काळ भिका-याची क्षमा मागितली.
तात्पर्य :- दान , संपत्ती , प्रेमपूर्वक व नि:स्वार्थ भावनेने केल्यास त्याचे समाधान मिळते./ जगात सर्वजण समान आहेत. श्रीमंती आज आहे तर उद्या श्रीमंती नसेल याची जाणीव ठेवून वागले पाहिजे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.