A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : २४ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००५
लान्स आर्मस्ट्राँगने ‘टूर-डी-फ्रान्स’ ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.
२००१
जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.
२०००
विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखल्यामुळे? तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.
१९९८
परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय
१९९७
माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान
१९९७
ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
१९६९
जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका
१९४७
जहीर अब्बास – पाकिस्तानी फलंदाज
१९४५
अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ‘विप्रो’ (WIPRO)चे चेअरमन
१९२८
केशुभाई पटेल – गुजरातचे १० वे मुख्यमंत्री (१४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९५), ६ व्या लोकसभेतील खासदार (जुनागढ) आणि राज्यसभा सदस्य (१० एप्रिल २००२ ते ९ एप्रिल २००८), पद्मभूषण (२०२१ - मरणोत्तर)
(मृत्यू: २९ ऑक्टोबर २०२०)
(Image Credit: OpIndia!)
१९८०
अरुण कुमार चटर्जी तथा ‘उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते
(जन्म: ३ सप्टेंबर १९२७)
(Image Credit: @Bollywoodirect)
१९८०
पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक
(जन्म: ८ सप्टेंबर १९२५)
(Image Credit: Wikipedia)
१९७४
सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक
(जन्म: २० आक्टोबर १८९१ - बॉलिंग्टन, चेशायर, इंग्लंड)
(Image Credit: Wikipedia)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
परिश्रमाचा राजहंस
एक जमीनदार होता. त्याला त्याच्या वाडवडीलांपासून
खूप संपत्ती मिळालेली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता. त्याचा दिवस
हा टवाळक्या करणे व हुक्का ओढत बाजेवर पडून राहणे यातच जात असे. त्याच्या या
आळशीपणाचा फायदा त्याचे नोकरचाकर इमानेइतबारे घेत असत. त्याचे नातेवाईकही या आळशी
स्वभावाला ओळखून होते व तेही त्याच्या संपत्तीचा गैरफायदा घेत असत, त्याची संपत्ती
हळूहळू का होईना साफ करण्यात ते मश्गुल होते. एकदा परगावाहून जमिनदाराचा एक मित्र त्याला
भेटण्यासाठी आला होता. त्याने हे सर्व नोकरचाकरांचे, नातेवाईकांचे वर्तन
पाहिले व मित्राला कसे लुटले जात आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने हे
जमिनदाराच्या कानावर घातले पण तो इतका आळशी होता की त्याने मित्राच्या बोलण्यांकडे
लक्षच दिले नाही. शेवटी त्याने एक हुकुमी एक्का वापरला. तो जमिनदाराला म्ह्णाला,’’ मित्रा, मला असे एक
संतमहात्मा माहित आहेत की जे तुझी संपत्ती दुप्पट करून देऊ
शकतील. फक्त तू त्याच्या दर्शनाला चल व ते जसे सांगतील तसे तू वाग. तुझी संपत्ती
अजून वाढेल.’’ जमिनदाराला पैशाची हाव सुटली व तो संतांकडे जाण्यास तयार झाला.
संतांकडे जाऊन दर्शन घेतले व संतांना मार्गदर्शन करण्यास सांगितल्यावर ते म्हणाले,’’ तुझ्या शेतामध्ये एक
राजहंस रोज पहाटे सूर्योदयापूर्वी येत असतो त्याचे दर्शन तू घेतल्याास तुझ्या
संपत्तीत प्रचंड वाढ होईल. मात्र इतर कोणीही त्या राजहंसाला पाहण्यापूर्वी तू
पाहणे गरजेचे आहे.’’ दुस-याच दिवशी जमिनदार लोभाने का होईना पहाटे उठला व शेतात गेला.
त्याला तेथे एक आश्चर्यकारक दृश्य दिसले. त्याचा एक नातेवाईक पाठीवर धान्याचे
भरलेले एक पोते शेतातून चोरून घेऊन चाललेला दिसला. नातेवाईकाला जमिनदाराने विचारले
असता तो नातेवाईक खजील झाला व माफी मागू लागला.
जमिनदार लवकर उठला असल्याने तो दूध पिण्यासाठी गोठ्यामध्ये गेला तर तेथे अजून एक चकित करणारे दृश्य त्याला दिसले. त्याचे नोकर हे दूधामध्ये पाणी मिसळून दूध वाढवित होते व वाढविलेले दूध हे बाजूला ठेवून त्याचे पैसे मिळविण्यासंबंधी चर्चा करत होते. जमिनदाराने हे ऐकले व नोकरांना कामावरून काढण्याची धमकी देताच ते गयावया करू लागले व काम प्रामाणिकपणे करू असे त्यांनी सांगितले. जमिनदार आता रोजच लवकर उठू लागला व राजहंसाचे दर्शन घेण्यासाठी शेतात जाऊ लागला. यामुळे सगळे नोकरचाकर, नातेवाईक, धान्यचोर यांना मालक शेतात हजर असतो याची जरब बसली व ते चोरी करेनासे झाले. लवकर उठून शेतात फेरफटका मारल्याने जमिनादाराची तब्येत पण सुधारू लागली. चोरी कमी झाल्याने दूधदुभते, धान्ये, पीक, भाजीपाला यातून जमिनदाराचे धन अजूनच वाढू लागले. पण राजहंस कसा दिसत नाही हा प्रश्न घेऊन तो संतांकडे गेला असता महात्मा म्हणाले,’’ अरे तुला तर तो राजहंस दिसला पण तू त्याला ओळखू शकला नाही. परिश्रम नावाचा एक राजहंस तुझ्या आयुष्यात आला आणि त्याने तुझ्यातल्या आळशीपणाला दूर करून तुझ्या धनाची वाढ करून दिली.’’
तात्पर्य :- परिश्रमरूपी परिस ज्यांच्या ज्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो त्यांच्या जीवनाचे सोने बनते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.