A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : रविवार
आजची दिनांक : २८ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
१९९९
भारतीय धवलक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांची प्रतिष्ठेच्या पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी निवड
१९९८
सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमुर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन
१९८४
अमेरिकेतील लॉसएंजल्स येथे २३ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९७९
भारताचे ५ वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरणसिंग यांनी सूत्रे हाती घेतली.
१९५४
ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ५ मार्च २०१३)
१९३६
सर गारफिल्ड तथा ‘गॅरी’ सोबर्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेट कर्णधार, फलंदाज, डावखुरे लेगब्रेक गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
१९०९
शाहीर पिराजीराव सरनाईक – साधी, सोपी पण अंतःकरणाला भिडणारी कवने, नादयुक्त शब्दकळा, श्रोत्यांना चेतविणारा आवेश व त्याला अनुरूप अशी देहबोली ही त्यांच्या शाहिरीची काही ठळक वैशिष्टये होत. व्यासपीठावर येताच ते ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी आरोळी देऊन श्रोत्यांच्या भावना उत्तेजित करीत. शूरवीरांचे पोवाडे रचून व आपल्या पहाडी आवाजात गाऊन त्यांनी श्रोत्यांमध्ये स्फुरण निर्माण केले. त्यांच्या गायकीला डफाच्या कडकडाटाची व तुणतुण्याच्या नादाची पार्श्वभूमी दाखल असलेली साथ वातावरणात अधिकच चैतन्य व जोश निर्माण करीत असे. त्यांची कवने जशी स्फूर्तिदायक तशीच समाज प्रबोधनपर होती. स्वातंत्र्यलढयात अनेक शाहिरांनी आपली स्फूर्तिदायक कवने गाऊन ह्या संगामाला फार मोठे बळ मिळवून दिले, अशा शाहिरांत पिराजीरावांचाही सहभाग होता. पुढे विख्यात कवी ग. दि. माडगूळकर यांच्या सहवासात ते आले. त्यातून त्यांचे कवित्व आणि सादरीकरण अधिकच प्रगल्भ होत गेले.
(मृत्यू: ३० डिसेंबर १९९२)
१९०७
अर्ल टपर – ‘टपरवेअर’चा संशोधक
(मृत्यू: ५ आक्टोबर १९८३)
१९८८
राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनौ येथील के. डी. सिंगबाबू स्टेडियम जवळ हत्या
(जन्म: ? ? १९६२)
१९८१
बाबूराव गोखले – नाटककार व भावगीतकार
(जन्म: १९ सप्टेंबर १९२५)
१९७७
गोविंद परशुराम तथा ‘पंडितराव’ नगरकर – गायक व अभिनेते, ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील होनाजी बाळा यांची ‘घनश्याम सुंदरा’ ही भूपाळी गाऊन अजरामर झालेले गायक
(जन्म: ? ? ????)
१९७५
राजाराम दत्तात्रय तथा ‘राजा’ ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी)
(जन्म: २६ नोव्हेंबर १९२३ - फोंडा, गोवा)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
निरुत्तर
अरब देशात हातिमताई हा त्याच्या उदारपणासाठी प्रसिद्ध होता. हातिमताई मोकळ्या हाताने दान करायचा. त्याच्या दरवाजातून कोणीही विन्मु्ख होऊन परतत नसे. तो कोणाही गरजूला आपली मौल्यवान वस्तू देण्यास मागे हटत नसे. लोक त्याच्याकडे बिनधास्तपणे येत असत. ते जे काही मागत ते हातिमताई देत होता. एकदा हातिमताईच्या मनात विचार आला, आपण मोठी दावत आयोजित करावी. ज्यात सर्वच स्तरातील व्यक्तिंना येण्याची मुभा असेल. यासाठी हातिमताईने खुले निमंत्रण दिले.
दावतच्या दिवशी लोकांचे येणेजाणे सुरु झाले. हातिमताई प्रत्येकाचे स्नेहपूर्वक स्वागत करत होता. जेवल्यावर लोक त्याला आशिर्वाद देत होते. काही वेळाने हातिमताईने विचार केला. दावतीचे ठिकाण दूर राहणा-या लोकांसाठी अडचणींचे ठरत आहे, त्यांना सवारीतून घेऊन यावे. आपल्या काही साथीदारांना घेऊन तो दूर राहणा-या लोकांना भेटण्यास गेला. वाटेत त्याला एक लाकूडतोड्या दिसला. त्याच्या चेह-यावर थकावट स्पष्टयपणे दिसत होती. हातिमताई म्हाणाला,’’ मित्रा, जेव्हा हातिमताईने दावतचे खुले आमंत्रण दिले तेव्हा तू इतकी मेहनत कशासाठी करत आहेस. हे काम सोड, आणि माझ्या दावतमध्ये सामील हो. आरामात जेवण कर.’’ हे ऐकून लाकूडतोड्याने उत्तर दिले,’’ जे आपली भाकरी कष्टाने कमवितात त्यांना हातिमताईच्या जेवणाची गरज नाही. हातिमताई उदार असेल पण आमची कष्टाने मिळवलेली भाकरी ही त्यााच्या दावतच्या जेवणापेक्षा कित्येक पटीने गोड आहे. हवे असेल तर तूच ती भाकरी खाऊन बघ’’ हे ऐकून हातिमताई निरूत्तर झाला.
तात्पर्य:- आपल्या कष्टाने जे लोक आपले जीवन जगतात त्यांच्या गरीबीची किंमत ही सुद्धा श्रीमंतच्या धनापेक्षा कित्येक पटीने जास्त असते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.