A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : २९ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९७
कलकत्त्याच्या वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या साहित्यिक हरनाम घोष स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.
१९८७
भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या.
१९८५
मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार
१९५७
‘इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सी(IAEA)’ची स्थापना झाली.
१९४८
दुसऱ्या महायुद्धामुळे पडलेल्या १२ वर्षांच्या खंडानंतर लंडन येथे १४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९८१
फर्नांडो अलोन्सो – स्पॅनिश रेस कार ड्रायव्हर
१९५९
संजय दत्त – अभिनेता व गुन्हेगार
१९५३
अनुप जलोटा – भजनगायक
१९२५
शि. द. फडणीस – व्यंगचित्रकार
१९२२
बळवंत मोरेश्वर तथा ब. मो. पुरंदरे – इतिहासकार आणि लेखक, शिवशाहीर
१९०४
जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ‘जे. आर. डी.’ टाटा – भारतरत्न, उद्योगपती व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक
(मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)
२००९
महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या राजमाता
(जन्म: २३ मे १९१९)
२००६
डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान
>(जन्म: १६ नोव्हेंबर १९२८)
२००३
बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर’ – विनोदी अभिनेता
(जन्म: ११ नोव्हेंबर १९२६)
२००२
सुधीर फडके ऊर्फ ‘बाबूजी’ – गायक व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९१९)
१९९६
अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
(जन्म: १६ जुलै १९०९)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
क्रोधाला तिलांजली
एकदा भगवान महावीरांचे दर्शन घेण्यासाठी राजा श्रेणीक आणि राणी चेलना दोघेही गेले होते. त्यांना भेटून दोघेही फारच प्रभावित झाले. परतत असताना वाटेत राणीला एक मुनी तपश्चर्येत मग्न दिसले. त्यांच्या अंगावर एकच वस्त्र होते. कडाक्याच्या थंडीतसुद्धा ते मुनी कठोर तपश्चंर्या करत होते. राणीने प्रभावित होऊन मुनींना नमस्कार केला. महालात आल्यानंतर राणी शयनकक्षात निद्रिस्त झाली. रात्रभर तिचा एक हात पलंगाखाली लटकत राहिल्याने आखडला व सकाळी तो हात ठणकू लागला. दासींनी तिचा हात शेकून देण्यास सुरुवात केली तेव्हा राणीला अचानक जंगलातील त्या मुनींची आठवण झाली. त्याने तर भर थंडीतसुद्धा एका वस्त्रात स्वत:चे शरीर लपेटले होते. राणीला ह्याची आठवण होऊन तिच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले,’’अगं बाई गं, त्या बिचा-याचे कसे हाल झाले असतील’’ तेवढ्यात राजाचे तेथे आगमन झाले व हे वाक्य ऐकून राजाचा असा समज झाला की राणीचे दुस-या कोणावर तरी प्रेम आहे. राजाला हे ऐकून खूप राग आला. रागाच्या भरात त्याने मंत्र्याला बोलावून आपल्या अंत:पुराला आग लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर तो भगवान महावीरांकडे गेला. त्यांना सगळी हकिकत सांगितली. महावीर म्हाणाले,’’राजा श्रेणिका, राणी चेलना पतिव्रता आहे. त्यांनी दिव्यदृष्टीच्या सहाय्याने मुनींबाबतचा तो प्रसंग आहे हे स्पष्ट केले.’’ श्रेणिकाचा राग शांत झाला. तो महालात आला. मंत्र्याला विचारले की तू अंत:पुराला आग लावलीस का? मंत्र्याने होकारार्थी मान डोलावली. राजाला खूप दु:ख झाले. हे पाहून मंत्री म्हणाला, राजन मी जाणून होतो, तुम्ही रागात आदेश दिले आहेत त्यामुळे मी हत्तीशाळा जाळली, अंत:पूर जाळले नाही. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने राग सोडून देण्याचा संकल्प केला.
तात्पर्य:-क्रोध व अविचार एकत्र राहतात. अविचाराने केलेली कोणतीही कृती नाशास कारणीभूत ठरते. क्षणिक येणारा राग माणसाला आयुष्यभराचे नुकसान भोगायला लावतो. राग माणसाचा शत्रू आहे असेच सर्व संतांनी सांगितले आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.