A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : ३० / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९७९
सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटांएवढी ऊर्जा निर्माण करुन ‘हॉवर्ड-कुमेन-मायकेल्स’ हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठबागावर आदळला. बरेचसे धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळण्यापूर्वीच वितळून जातात. सूर्याच्या पृष्ठभागावर धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
१९४५
दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातुन सुटका केली.
१८३५
अमेरिकेतील ह्युस्टन शहराची स्थापना झाली.
(Image Credit: Good Free Photos)
१८३५
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
(Image Credit: unsplash.com)
१९३४
बाळकृष्ण पंढरीनाथ तथा बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज
(मृत्यू: ५ जुलै २००५)
(Image Credit: Cricket Country)
१९३०
दशरथ पुजारी – संगीतकार
(मृत्यू: १३ एप्रिल २००८ - डोंबिवली, मुंबई)
(Image Credit: आठवणीतली गाणी)
१९३०
वॉरन बफे – अमेरिकन उद्योगपती आणि दानशूर, शेअरबाजारातील अत्यन्त यशस्वी गुंतवणूकदार
(Image Credit: Encyclopedia Britannica)
१९२३
शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’ – गीतकार
(मृत्यू: १४ डिसेंबर १९६६ - मुंबई, महाराष्ट्र)
(Image Credit: Wikipedia)
२००३
चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता
(जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
(Image Credit: IMDb)
१९९८
नरहर वामन तथा ‘नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते
(जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)
१९९४
शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख
(जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)
१९८१
जयंत पांडुरंग तथा ‘जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव
(जन्म: ५ सप्टेंबर १९०७)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
प्रामाणिकपणा
सौदी अरबमध्ये बुखारी नामक एक विद्वान राहत होते. ते आपल्या प्रामाणिकपणासाठी खूप प्रसिद्ध होते. एकदा त्यांनी दूरचा समुद्रप्रवास करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे ते प्रवासाला निघाले. त्यांनी प्रवासात आपल्या सोबत खर्चासाठी म्हणून एक हजार दिनार एका थैलीत बांधून घेतले होते. प्रवासाला सुरुवात झाली, या प्रवासाला निघालेल्या अन्य काही जणांबरोबर बुखारी यांची ओळख यानिमित्ताने झाली. बुखारी त्यांनी जीवनदर्शनाबद्दल सांगत असत. एक प्रवासी मात्र बुखारीजींच्या जास्त सहवासात राहिल्याने तो त्यांचा जवळचा माणूस बनला. बुखारीजी जिकडे जात, खात, हिंडतफिरत तिथे तो माणूस त्यांच्याासोबत असे. असेच एकदा बुखारीजींनी स्वत:जवळची दिनारांची थैली उघडली व त्यातील रक्कम काढून ते मोजू लागले. त्या वेळीही तो माणूस तिथेच होता. त्याने ती पैशांची थैली पाहिली व त्याला त्या पैशांचा मोह झाला. त्याने ती थैली चोरायचा कट मनातल्या मनात शिजवला. एकेदिवशी सकाळी तो जोरजोराने ओरडू लागला,’’ या अल्लाए, या खुदा, मी पुरता लुटलो गेलो, माझे एक हजार दिनार चोरीला गेले. चांगले थैलीत बांधून आणलेले माझे पैसे कुणी हरामखोराने पळविले कुणास ठाऊक मला या संकटात कसे काय अडकवले आहे’’ जहाजावर असणा-या कर्मचा-यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला, त्याला समजावले की बाबा तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत या लोकांपैकी जर कुणी घेतले असतील तर आपण त्यांना ते परत देण्यास सांगू या. जहाजाच्या कर्मचा-यांनी सर्वाची झडती घेण्यास सुरुवात केली. सर्वात शेवटी नंबर आला तो बुखारीजींचा. त्यांच्यापाशी जाताच कर्मचारी म्हणाले,’’ अरे तुमची कशी बरे आम्ही झडती घ्यावी. तुमची झडती घेणे म्हणजे सुद्धा देवाचा गुन्हा ठरेल. इतक्या प्रामाणिक आणि सच्या माणसाला आम्ही कसे तपासू.’’ हे ऐकून बुखारी म्हणाले,’’ नाही, ज्याचे पैसे चोरीला गेले आहेत त्याच्या मनात माझ्याबद्दल शंका राहिल, संशय बळावेल तेव्हा तुम्ही माझी व माझ्या सर्व सामानाची झडती घ्या’’ बुखारींची झडती झाली त्यात त्यांच्याकडे एक दमडासुद्धा मिळाला नाही. हा प्रसंग इथेच संपला. मात्र दोन दिवसांनी न राहवून तो चोरीची बोंब ठोकणारा प्रवासी बुखारींकडे आला व म्हणाला,’’ महाराज, तुमच्याकडे तर एक हजार दिनार होते हे मला माहित आहे. मी स्वत: ते पाहिले आहेत मग ते कुठे गेले’’ बुखारी हसून म्हणाले,’’ मित्रा, मी आयुष्यात कधीच धनाची चिंता केली नाही. मी फक्त प्रामाणिकपणा जपला. माझ्यावर ज्यावेळी झडतीची वेळ आली त्याच्याआधीच काही क्षण मी ते पैसे समुद्रात फेकून दिले होते. जर माझेच पैसे माझ्याजवळ सापडले असते तर कुठेतरी संशयाची सुई माझ्याभोवती फिरली असती म्हुणून मी स्वत:च्या हाताने धन समुद्रात टाकले. तुला खरे वाटणार नाही पण ही गोष्ट जहाजावरील ब-याचजणांना माहिती आहे त्यामुळे तेच माझा आता खर्च करत आहेत. मी या हाताने धन जरी टाकले असले तरी माझ्या प्रामाणिकपणामुळे मला अनेक हातांनी मदत केली आहे. लोकांचा कायमच प्रामाणिक माणसांवर विश्वामस बसतो.’’
तात्पर्य:- जगात प्रामाणिकपणासारखा चांगला गुण नाही. प्रामाणिक माणसेच जगाला पुढे नेत आहेत हे ही शाश्वत सत्य आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.