A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : ३१ / ०७ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्या व्यक्तींना देण्यात येणारा ’राजर्षी शाहूमहाराज समता पुरस्कार’ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर
२०००
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे (CAT) डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार जाहीर
१९९२
सतारवादक पं. रविशंकर यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
१९९२
जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९७१
अपोलो-१५ मोहिमेतून चंद्रावर गेलेला अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट हा चंद्रावर मोटारगाडी चालवणारा पहिला मानव बनला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो सातवा मानव आहे.
(Image Credit: Wikipedia)
१९६५
जे. के. रोलिंग – हॅरी पॉटर मुळे प्रसिद्ध झालेल्या इंग्लिश लेखिका
१९४७
मुमताज – अभिनेत्री
१९४१
अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री
(मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)
१९१८
डॉ. श्रीधर भास्कर तथा ‘दादासाहेब’ वर्णेकर – संस्कृत पंडित
(मृत्यू: १० एप्रिल २०००)
१९१२
मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
(मृत्यू: १६ नोव्हेंबर २००६)
१९०७
दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार
(मृत्यू: २९ जून १९६६)
१९८०
मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री
(जन्म: २४ डिसेंबर १९२४ - कोटला सुलतान सिंग, पंजाब)
(Image Credit: Wikipedia)
१९६८
शतायुषी पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर – चित्रकार, संस्कृतपंडित, वेदांचे अभ्यासक-संशोधक विद्वान व लेखक. चारही वेदांच्या शुद्ध संहिता, समग्र सार्थ महाभारत, सार्थ अथर्ववेद इ. ग्रंथ त्यांनी लिहिले. ते हिन्दी, मराठी, गुजराती भाषांत प्रसिद्ध झाले. यांपैकी काही ग्रंथांचे अनुवाद ऊर्दू, कानडी, सिंधी, तेलगू व इंग्रजीमध्येही झाले.
(जन्म: १९ सप्टेंबर १८६७)
१८७५
अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २९ डिसेंबर १८०८)
१८६५
जगन्नाथ ऊर्फ ‘नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ
(जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
१७५०
जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा
(जन्म: २२ आक्टोबर १६८९)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
जीवनाचे रहस्य
एकदा एका कसायाकडे त्याचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी गेला होता. तिथे त्याने असे पाहिले की, एका मोठ्या पिंज-यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्ती, करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्याने असे पाहिले की त्याच पिंज-यातून एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्याचे मांस विकत आहे. कसायाच्या मित्राला ही गोष्ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्त झाला कारण ज्यावेळी प्रत्येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंज-यातल्या प्रत्येक बोकडाला दिसत होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे राहत होते याचे त्या मित्राला राहून राहून आश्चर्य वाटत होते. ते बोकड आपल्याच मस्तीत खेळत, बागडत, आनंदात त्या पिंज-यात राहतात कसे याचे त्या मित्राला कोडे पडले होते. शेवटी न राहवून त्याने त्या कसाई मित्राला याचे कारण विचारले असता कसाई म्हणाला,’’ अरे मित्रा, फार सोपे कारण आहे. मी त्या प्रत्येक बोकडाच्या कानात असे सांगितले आहे की, सगळे बोकड मेले तरी हरकत नाही पण मी तुला काही कापणार नाही. त्यामुळे तू आनंदात राहा. तू एकमेव बोकड असा असशील की जो शेवटपर्यंत जिवंत राहशील. त्यामुळे ते प्रत्येक बोकड हे आपण जिवंत राहणार या आनंदात आहे आणि हे त्याचमागचे रहस्य आहे.
तात्पर्य :- या पिंज-यातल्या बोकडासारखीच माणसाची अवस्था आहे. प्रत्येकाला असे वाटत राहते की, मी शेवटपर्यंत जिवंत राहणार आहे पण कधी ना कधी आपला नंबर हा येणारच आहे. जीवन जगताना आपण याची निश्चितच जाणीव ठेवली पाहिजे की आपणही कधीतरी मरणार आहोत
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.