{getToc} $title={इथे क्लिक करा}
हर घर झंडा उपक्रम
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार "हर घर झंडा" हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाने “हर घर झंडा” या विषयावरील दि.१२.०४.२०२२ व दि. २०.०५.२०२२ च्या दोन स्वतंत्र सादरीकरणांद्वारे या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने विविध निर्देश दिलेले आहेत. त्यामध्ये,
(१) या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय/ निमशासकीय/ खाजगी आस्थापना /सहकारी संस्था/ शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतींवर व नागरिकांनी स्वत:च्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी सकारात्मक प्रभावी प्रसिद्धी मोहिम राबविण्यात यावी.
(२) याबाबत सुक्ष्म नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येऊन उपरोक्त कालावधीत सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात यावा.
(३) या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय/ निमशासकीय यंत्रणांनी प्रसार माध्यमातून जाणीव-जागृतीची मोहिम प्रभावीपणे राबवावी.
(४) स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन सदर कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचनांचा समावेश आहे.
केंद्र शासनाच्या “हर घर झंडा” उपक्रम राबविण्याबाबतच्या दि. १२.०४.२०२२ च्या सादरीकरणांची प्रत सर्व मंत्रालयीन विभाग तसेच जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली आहे. तसेच, दि.२०.०५.२०२२ च्या सादरीकरणाची प्रत सर्व मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिपद, आयुक्त, महानगरपालिका यांना यापूर्वीच पाठविण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व विभागांच्या पुनश्च: निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
$ads={1}
शासन परिपत्रक काय आहे?
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दिनांक १२ मार्च, २०२१ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाने कळविले आहे. त्यानुसार राज्यात सदर कालावधीमध्ये “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याबाबत शासन निर्णय/शासन पत्राद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते दिनांक १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये देशभरात "हर घर झंडा" हा उपक्रम रावविण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना एकत्रितरित्या खालीलप्रमाणे पुन्हा उद्धृत करण्यात येत आहेत :-
१) सर्व शासकीय / निमशासकीय यंत्रणांनी प्रसार माध्यमातून देशाभिमान व जाणीव-जागृतीची मोहिम प्रभावीपणे राबवावी.
२) दिनांक ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रत्येक शासकीय/निमशासकीय व खाजगी आस्थापनांवर तसेच, प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारणेसाठी नागरीकांना प्रोत्साहीत करावे.
३3) नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत: विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरीत करावे.
४) सदर राष्ट्रध्वज उभारणीसाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा.
५) केंद्रिय गृह विभाग यांच्या दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या अधिसूचनेन्वये भारतीय ध्वज संहिता २००२ भाग-१ मधील परिच्छेद १.२ मधील राष्ट्रध्वज हे “हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर/सुत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल”, या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख केला आहे. या बदललेल्या तरतूदीनुसार तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर या प्रयोजनासाठी करता येईल.
६) संगीतातूनही राष्ट्रध्वजाबाबत वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करता येईल.
७) "हर घर झंडा" या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी.
८) या उपक्रमामध्ये राज्य / देशातील / परदेशातील सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्यावी.
९) राष्ट्रध्वज मुबलक उपलब्ध होणेबाबत खात्री संबंधित यंत्रणांनी करावी.
१० ऑनलाईन व ऑफलाईन राष्ट्रध्वज विक्री केंद्र राज्याने उपलब्ध करुन द्यावे.
११) भारतीय ध्वज संहितेचे पालन व्हावे व जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव-जागृती करावी.
१२)“हर घर झंडा” या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाची छायाचित्रे, चित्रफिती, ध्वनीमुद्रण इ. केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाच्या http://www.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळावर करावे.
१३) नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत रुची निर्माण करण्यासाठी वेबसाईट, ई-कॉमर्स तसेच राष्ट्रध्वज भेट देणे अशा माध्यमांचा आधार घेण्यात यावा.
१४) स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त भाव धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरीकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात यावा. याबाबतचा मार्गदर्शक कृती आराखडा सोबत परिशिष्ट “अ” मध्ये दर्शविण्यात आला आहे.
$ads={2}