Draupadi Murmu Information In Marathi
1. शुभ नाव – द्रोपदी मुर्मू
2. नागरिकता – भारतीय
3. वडिलांच नावं- श्री. बिरांची नारायण टुडू
4. जन्म तारीख- 20 जून, 1958
5. जन्म स्थळ – मयूरभंज, उड़ीसा
6. शैक्षणिक पात्रता -पदवीधर
7. महाविद्यालय- रामा देवी महिला कॉलेज-भुवनेश्वर
8. व्यवसाय -नोकरी राजनीतिज्ञ -राजनीतिक पार्टी भारतीय जनता पार्टी
9. वैवाहिक जीवन- विवाहित
10. पतीच नाव -श्याम चरण मुर्मू
11. जाति -अनुसूचित जनजाति
12. धर्म – हिंदू
13. मुलीचे नाव – इतिश्री मुर्मू
14. पुरस्कार – नीलंकठ पुरस्कार सर्वेश्रेष्ठ विघायक ( 2007 )
द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. राष्ट्रपती विराजमान होणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. २५ जुलैला राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. यूपीएच्या यशवंत सिन्हांचा पराभव केला.
आदिवासी राजकीय नेत्या, माजी राज्यपाल व राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे संपूर्ण जीवन चरित्र आणि त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेणार आहोत.
द्रौपदी मुर्मू यांची अखेर राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत. त्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्या अधिकृतपणे भारताच्या राष्ट्रपती बनतील.
Draupadi Murmu Biography in Marathi
द्रौपदी मुर्मू - यांचे विशेष
द्रौपदी मुर्मू २५ जुलै रोजी भारत देशाच्या –
15 व्या राष्ट्रपती असतील.
सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती असतील.
दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील.
पहिल्या आदिवासी राष्ट्रपती असतील.
ओडिशा राज्यातून येणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती असतील.
द्रौपदी मुर्मू यांची संपूर्ण माहिती – Information about Draupadi Murmu
64 वर्षीय द्रौपदी श्यामचरण मुर्मू (जन्म 20 जून 1958) ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) अधिकृत उमेदवार आहेत.
त्यांनी यापूर्वी 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. त्या ओडिशा राज्यातील आहेत. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल ठरल्या आहेत.
त्या भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. याआधी कधीही भारताच्या राष्ट्रपतीपदी अनुसूचित जमातीची (ST) स्त्री किंवा पुरुष कार्यरत झालेला नाही.
मात्र यापूर्वी दलित अर्थात अनुसूचित जातीचे (SC) दोन राष्ट्रपती झालेले आहेत — के.आर. नारायणन व रामनाथ कोविंद.
द्रौपदी मुर्मू यांचे वैयक्तिक जीवन
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावातील एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही गावचे सरपंच होते.
द्रौपदी मुर्मू यांनी श्यामचरण मुर्मूशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे (दोघेही मरण पावले) आणि एक मुलगी झाली. त्यांच्या पतींचे देखील निधन झाले आहे. आता त्यांच्या कुटुंबात मुलगी, नातू आणि जावई आहेत.
द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण
द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून बीए केले.
राजकीय कारकीर्द
राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू ह्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. नगरसेविका, आमदार, राज्य सरकारमधील मंत्री, व राज्यपाल अशा बऱ्याच राजकीय पदांवर त्यांनी काम केले आहे.
त्या 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले.
द्रौपदी मुर्मू ओडिशाच्या माजी मंत्री असून 2000-2004 आणि 2004-2009 मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार राहिल्या आहेत.
ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात, त्या 6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री आणि 6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004 या कालावधीत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या.
त्यांना 2007 मध्ये ओडिशा विधानसभेने ‘सर्वोत्कृष्ट आमदार‘ म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित देखील केले आहे.
द्रौपदी मुर्मू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, आणि त्यांचा कार्यकाळ 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 पर्यंत होता. एखाद्या भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या देखील होत्या.
भूषवलेली महत्त्वाची पदे
* झारखंडच्या 9वे राज्यपाल : 18 मे 2015 ते 12 जुलै 2021
* ओडिशा सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 मार्च 2000 ते 6 ऑगस्ट 2004)
* ओडिशा सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) : (6 ऑगस्ट 2002 ते 16 मे 2004)
* ओडिशा विधानसभेच्या सदस्या – आमदार : (2000 ते 2009)
* अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा
* नगरसेविका
कारकुन, शिक्षिका ते देशाच्या प्रथम नागरिक-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राजकीय प्रवास
द्रौपदी मुर्मू यांनी 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून आपलं बीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी ओडिशा सरकारसाठी कारकून म्हणून काम केलं. पुढे पाठबंधारे आणि ऊर्जा खात्यात त्यांची कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली.
देशाच्या प्रथम नागरिक म्हणून अखेर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केलाय. एक सर्वसामान्य आदिवासी महिला (Tribal women) ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतचा मुर्मू यांचा प्रवास नक्कीच साधा सोपा आणि सरळ नव्हता. मुर्मू यांनी 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून आपलं बीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी ओडिशा सरकारसाठी कारकून म्हणून काम केलं. पुढे पाठबंधारे आणि ऊर्जा खात्यात त्यांची कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. पुढे काही काळ त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केलं आहे. मुर्मू यांनी अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर या संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी केली.
1997 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात
द्रौपदी मुर्मू यांनी खऱ्या अर्थाने 1997 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला एक वार्ड काऊन्सलर म्हणून सुरुवात केली. त्यानंतर रायरंगपूर नगर परिषदेत त्या नगरसेविका झाल्या, त्यांनी काही काळ नगर परिषदेचं उपाध्यक्षपदही भूषवलं. पुढे भाजपच्या तिकीटावर रायरंगपूर विधानसभा मतदाससंघातून त्या 2000 आणि 2009 साली आमदार म्हणून निवडून आल्या. आमदारकीच्या पहिल्याच टप्प्यात (2000 ते 2004 ) त्यांनी नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कामही सांभाळलं.दुसऱ्यांदा आमदार झाल्या तेव्हा स्वत:ची गाडीही नव्हती.
पुढे 2009 मध्ये मुर्मू दुसऱ्यांदा आमदार झाल्या. त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:ची गाडीही नव्हती. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ही केवळ 9 लाख रुपये होते. त्यांच्या पतीकडे एक बजाज चेतक स्कूटर आणि एक स्कॉर्पिओ गाडी होती. महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी त्या चार वर्षे मंत्री राहिल्या होत्या. तसंच त्यांच्यावर 4 लाखाचं कर्ज देखील होतं. मुर्मू झारखंडमधील लोकप्रिय राज्यपाल ठरल्या
2015 मध्ये मुर्मू भाजपच्या मयूरभंज जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या. त्यावेळी त्यांना पहिल्यांदा राज्यपाल बनवण्यात आलं. 18 मे 2015 रोजी मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या महिला, तसंच पहिल्या आदिवासी राज्यपाल म्हणून कार्यभार हाती घेतला. जवळपास सहा वर्षापेक्षा अधिक काळ त्या राज्यपाल पदावर होत्या. मुर्मू या झारखंडमधील लोकप्रिय राज्यपाल होत्या. म्हणूनच कदाचित त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही पदावरुन हटवण्यात आलं नव्हतं.
वैयक्तिक आयुष्य मात्र शोकांतिकेनं भरलेलं..
विशेष म्हणजे द्रौपदी मुर्मू यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र शोकांतिकेनं भरलेलं आहे. मुर्मू यांच्या पतीचं निधन झालेलं आहे. एवढच नाही तर त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झालाय. सध्या त्यांच्या कुटूंबात त्यांची एकुलती एक मुलगी आहे.
द्रोपदी मुर्मू यांच्याविषयी माहीती – प्रश्नोत्तरे
द्रोपदी मुर्मू कोण आहेत?
द्रोपदी मुर्मू ह्या एक संथाल आदीवासी जमातीमधील महिला आहेत.
द्रोपदी मुर्मू यांचा जन्म कधी अणि कोठे झाला होता?
द्रोपदी मुर्मू यांचा जन्म हा 1958 मध्ये ओरिसातील मयुरभंज ह्या जिल्हयामधील बडीपोसी नामक गावात झाला होता.
द्रोपदी मुर्मू यांची एकुण कारकीर्द –
सुरूवातीला त्या शिक्षिका होत्या नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला.2000-20009 मध्ये त्यांनी भाजपचे तिकिट प्राप्त करुन त्यावर आमदारकीचे पद देखील प्राप्त केले होते.
त्याच्या आधी त्या 1997 मध्ये रायनगरपुर नावाच्या नगर पंचायती मधुन नगरसेवक म्हणून निवडुन आल्या होत्या.
यानंतर त्या आदीवासी जमातीमधील राष्टीय उपाध्यक्ष देखील बनल्या होत्या.त्यानंतर द्रोपदी मुर्मू यांनी मत्स्य विभागाचे मंत्रीपद देखील भुषविले होते.
द्रोपदी मुर्मू ह्या 2015 साली झारखंड ह्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल देखील होत्या.द्रोपदी मुर्मू यांनी भाजप मध्ये देखील यापुर्वी कार्य केले आहे.
द्रोपदी मुर्मू यांचे शिक्षण किती झाले आहे?
● द्रोपदी मुर्मू यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या राहत्या घराजवळीलच एका शाळेत त्यांनी पुर्ण केले.पुढे त्यांचे ग्ँज्युएशन पुर्ण करायला त्यांनी भुवनेश्वर येथील रमादेवी नावाच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.
● आपले ग्रँज्युएशनपर्यतचे शिक्षण पुर्ण करून झाल्यानंतर त्यांनी सचिवालयात काम करण्यास आरंभ केला.तसेच यासोबत त्यांनी एकेकाळी शिक्षक म्हणून देखील नोकरी केली.
द्रोपदी मुर्मू यांना मिळालेले पुरस्कार –
द्रोपदी मुर्मू यांना 2007 साली नीलकंठ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार त्यांना सर्वश्रेष्ठ विधायक म्हणुन बहाल करण्यात करण्यात आला होता.
द्रोपदी मुर्मू यांच्या वडिलांचे नाव काय आहे?
द्रोपदी मुर्मू यांच्या पित्याचे नाव बिरची नारायण तुडु असे आहे.
द्रोपदी मुर्मू यांच्या पतीचे नाव काय आहे?
द्रोपदी मुर्मू यांच्या पतीचे नाव श्यामचरण मुर्मू असे आहे.
द्रोपदी मुर्मू यांना किती अपत्ये आहेत?
द्रोपदी मुर्मू यांना एकुण तीन अपत्य आहेत.
द्रोपदी मुर्मू ह्या व्यवसायाने कोण आहेत?
द्रोपदी मुर्मू ह्या भाजप पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्या आहेत.
द्रोपदी मुर्मू यांचे वय किती आहे?
द्रोपदी मुर्मू यांचे वय 65 आहे.
द्रोपदी मुर्मू यांचे वजन किती आहे?
द्रोपदी मुर्मू यांचे वजन 75 आहे.
द्रोपदी मुर्मू यांची एकुण उंची किती आहे?
द्रोपदी मुर्मू यांची उंची एकुण पाच फुट पाच इंच इतकी आहे.
द्रोपदी मुर्मू यांची जात तसेच धर्म कोणता आहे?
द्रोपदी मुर्मू ह्या संथाल नामक आदीवासी जमातीमधील महिला आहेत.त्यांचा धर्म हिंदु आहे.
द्रोपदी मुर्मू कोणत्या राज्याच्या प्रथम महिला राज्यपाल होत्या?
द्रोपदी मुर्मू ह्या झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल देखील होत्या.
द्रोपदी मुर्मू देशाच्या राष्टपती झाल्यानंतर काय होईल?
जर द्रोपदी मुर्मू यांची राष्टपती पदावर निवड झाली तर आपल्या भारत देशाच्या राजकारणामध्ये आदीवासी जमात जी एक वंचित शोषित जमात म्हणुन ओळखली जाते तिला आपल्या देशाच्या राजकारणात पहिल्यांदा एवढे मोठे आणि महत्वाचे स्थान प्राप्त होणार आहे. द्रोपदी मुर्मू ह्या एनडीए उमेदवार असतील.
विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव राष्टपतीपदासाठी पुढे करण्यात आले आहे?
विरोधी पक्षाने आपल्याकडुन यशवंत सिन्हा यांचे नाव राष्टपती पदासाठी पुढे केले गेले आहे.दिल्ली येथे विरोधी पक्षाची जी बैठक घेण्यात आली होती तिथे हे नाव निवडण्यात आले आहे.
विरोधी पक्षाकडुन बैठक घेण्यात आली त्यानंतर त्यांचे नेते जयराम यांनी ही महत्वाची घोषणा केली होती.
भाजपने राष्टपती पदासाठी उमेदवार म्हणुन कोणाची निवड केली आहे?
नुकतीच भाजप पक्षाने आपली राष्टपतीपदाची उमेदवारी घोषित केली आहे.ज्यात द्रोपदी मुर्मू यांची निवड भाजपकडुन करण्यात आली आहे.
Tags
Breaking News