A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : ०१ / ०८ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. ३ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.
१९९६
कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते व निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
१९९४
भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. जगातील अशा तर्हेची ही पहिलीच योजना आहे.
१९६०
इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.
१९४४
पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.
१९१४
पहिले महायुद्ध – जर्मनीने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९६९
ग्रॅहॅम थॉर्प – इंग्लिश क्रिकेटपटू
१९५५
अरुणलाल – क्रिकेटपटू व समालोचक
१९५२
यजुर्वेंद्र सिंग – क्रिकेटपटू
१९३२
महजबीन बानो ऊर्फ ‘मीनाकुमारी‘ – अभिनेत्री
(मृत्यू: ३१ मार्च १९७२)
१९२४
सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
(मृत्यू: १३ मार्च १९६७)
१९२०
‘लोकशाहीर’ अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी व समाजसुधारक
(मृत्यू: १८ जुलै १९६९)
१९१५
श्री. ज. जोशी – कथाकार व कादंबरीकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष
(मृत्यू: ? ? ????)
१९१३
भगवान आबाजी पालव ऊर्फ ‘मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
(मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)
१८९९
कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी
(मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)
२००८
हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य
(जन्म: २३ मार्च १९१६)
२००८
अशोक मांकड – क्रिकेटपटू
(जन्म: १२ आक्टोबर १९४६)
२००५
फहाद – सौदी अरेबियाचा राजा
(जन्म: १६ मार्च १९२१)
१९९९
निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ‘अॅन आटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या.
(जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ - किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
दृढनिश्चय
श्रीपूर येथील राजा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्यपदी बसविण्यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्यासमुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्याची माता त्याला हिंमत देत असे व योग्य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्या राज्यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. आतापर्यत दिलीपसिंह याने कमी प्रमाणात सैनिक असूनसुद्धा भीमसेनविरोधात केवळ धाडसी व कल्पकक वृत्तीने युद्धे जिंकली होती. परंतु राजवीरसिंह यात आपले सातत्य ठेवू शकले नाहीत. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्याला हार पत्कारावी लागली हे ऐकले तेव्हा राजमातेने मनातल्या मनात काही ठरवले. राजवीर झोपण्याआधी राजमातेचे दर्शन घेण्यासाठी आला तेव्हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्या मोठ्या तुकड्याला तोडण्याचा प्रयत्न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्हणाली,’’खरं बोललास, संख्येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्हा. शत्रूची कितीही संख्या तुम्हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्यात आहे ती जागृत करा. तुमच्या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला.
तात्पर्य: दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही काही वेळेला दृढनिश्चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित ठरते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.