A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : ०२ / ०८ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००१
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारासाठी निवड.
१९९६
अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.
१९९०
इराकने कुवेतवर आक्रमण केले. सुमारे ७ महिन्यांनंतर पराभव अटळ दिसू लागल्यावर युद्धातून माघार घेताना इराकचा सत्ताधीश सद्दाम हुसेन याने कुवेतमधील सुमारे ६०० तेलविहिरींना आगी लावल्या. या आगींमुळे वातावरणात भयानक काळा धूर पसरला. या धुरामुळे काही काळाने काश्मीरमधे काळ्या रंगाचे बर्फ पडले! सुमारे १०,००० लोक या आगी विझवण्याच्या कामात होते. अखेर या आगी पूर्णपणे विझवायला १० महिने लागले!
(Image Credit: Wikipedia)
१९७९
नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व डॉ. मेबल आरोळे यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
१९५४
दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.
१९५८
अर्शद अयुब – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक
१९४१
ज्यूल्स हॉफमन – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ
१९१८
जशन पहलाजराय वासवानी तथा दादा जे. पी. वासवानी – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य
(मृत्यू: १२ जुलै २०१८)
१९१०
पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक
(मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८)
१८७६
पिंगाली वेंकय्या – भारतीय तिरंग्याचा रचनाकार
(मृत्यू: ४ जुलै १९६३)
१९३४
पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २ आक्टोबर १८४७)
१९२२
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश-अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक
(जन्म: ३ मार्च १८४७)
१७८१
सखारामबापू बोकील – पेशवाईतील मुत्सद्दी, साडेनीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे
१५८९
हेन्री (तिसरा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: १९ सप्टेंबर १५५१)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
तेनालीराम आणि स्वप्न महाल
एके रात्री रात्री राजा कृष्णदेवराय याला स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये त्याने एक सुंदर महाल पाहिला. तो महाल खूप सुंदर होता, महाल अधांतरी तरंगत होता. महालाला सुंदर सुंदर दालने होती, दालनात रंगीबेरंगी रत्ने लावली होती. महालात विशेष प्रकाशयोजना केलेली नव्हती जेव्हा मनाला वाटेल तेव्हा आपोआप प्रकाश पडत असे व जेव्हा प्रकाश नको वाटे तेव्हा अंधार होत असे. सुखसंपन्नगतेने सजलेला तो महाल म्हणजे एक आश्चर्य होते. पृथ्वी वरच्या कोणत्याही माणसाला भुरळ पाडेल अशाच प्रकारची त्या महालाची रचना होती. हे स्वप्नात राजाने पाहिले आणि जागा होताच त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली की, जो कोणी मला अशा वर्णनाचा महाल बनवून देईल त्याला एक लाख सुवर्णमुद्रा बक्षीस देण्यात येतील. सर्व राज्यात राजाच्या या स्वप्नाची चर्चा होऊ लागली. जो तो हेच म्हणू लागला की अशा प्रकारचा महाल फक्त स्वप्नात बनू शकतो. राजाला बहुधा हे कळत नसावे अशाच आशयाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. राजाने आपल्या राज्यातील सर्व कारागिरांना बोलावले त्यांना सूचना दिल्या. अंगात विविध कौशल्ये असणारे कुशल कारागिर राजाला समजावू लागले,’’महाराज, अशा प्रकारचा महाल कधीच बनू शकत नाही. तुम्ही याचा नाद सोडून द्या’’ पण राजाच्या डोक्यात आता तो महाल बांधण्याचे ठरलेच होते. काही स्वार्थी लोकांनी मात्र याचा चांगलाच लाभ करून घेतला. त्यांनी महाल बांधण्यासाठी राजाकडून पैसे घेतले. राजाने महाल बांधून देण्याचे आश्वासन देऊन ती माणसे गायब झाली होती. मात्र मंत्री लोकांना याचे वाईट वाटत होते की राजाला माणसे फसवित आहेत. कोणीही मंत्री राजाला समजावून सांगायला पुढे जात नव्हता. यातून फक्त एकच माणूस राजाला समजावू शकत होता. तो म्हणजे तेनालीराम आणि तो काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. एक दिवस राजाचा दरबार सुरु झाला आणि एक म्हातारा माणूस रडत, मोठ्याने ओरडत दरबारात आला. राजाने त्याला न रडण्याची विनंती केली व म्हणाला,’’ वृद्धबुवा काय झाले, चिंता करू नका, मी काही तुमची मदत करू का. तुम्हाला न्याय मिळेल याची तुम्ही, खात्री बाळगा.’’ म्हातारा रडायचे थांबवून राजाला म्हणाला,’’महाराज, मला सर्वानी लुटले, माझ्या जीवनभराची कमाई कुणीतरी चोरी केली. महाराज, मला छोटी छोटी मुले आहेत आता तुम्हीच सांगा की मी त्यांना कसे जगवू.’’ राजाला हे ऐकून खूप राग आला व संतापाने राजा म्हणाला,’’ मला सांगा, कोणी तुम्हाला छळले, कोणी तुमची संपत्ती हडप केली. माझा कोणी कर्मचारी तुम्हाला जर त्रास देत असेल तर सांगा.’’ म्हातारा म्हणाला,’’ नाही महाराज तुमचा कोणीही कर्मचारी मला त्रास देत नाहीये’’ राजा म्हणाला,’’ मग तुमची संपत्ती कुणी हडप केली अशी तुमची तक्रार आहे’’ म्हातारा म्हणाला,’’ महाराज, क्षमा असावी पण काल रात्री मला एक स्वप्न पडले, त्या स्व्प्नात तुम्ही स्वत:, तुमचे मंत्री आणि दरबारातले सर्व कर्मचारी सगळे मिळून माझ्या घरी आलात आणि माझ्या घरातील तिजोरी तुम्ही सर्वानी मिळून उचलली आणि ती तुम्ही तुमच्या राजखजिन्यात जमा करून घेतली.’’ राजा अजूनच संतापला व म्हणाला,’’ मूर्खासारखे बोलू नको, अरे सत्यात तर काय मी स्वप्नातसुद्धा असा अत्याचार करणार नाही आणि मूर्ख माणसा स्वप्ने कधी सत्य होतात काय याची तुला जाणीव आहे की नाही.’’ हे वाक्य संपताक्षणी त्या म्हाता-याने आपली नकली दाढी व फेटा काढून टाकला व आपल्या मूळ अवतारात हजर झाला. तो तेनालीराम होता. तेनालीराम म्हणाला,’’महाराज अशक्य स्वप्ने सत्यात येऊ शकत नाही हेच मला तुम्हाला सांगायचे होते. माणसाने स्वप्ने सत्यात आणण्याचा प्रयत्न करावा हे योग्य आहे पण अशक्य असणा-या स्वप्नांच्या मागे कधीच पळू नये असे मला वाटते.’’ राजाला आपली चूक कळून आली. त्याने तेनालीरामला चांगला सल्ला दिल्याबद्दल बक्षीस दिले.
तात्पर्य:- योग्य माणसांचा सल्ला काही वेळेला उपयोगी ठरतो, अशाच माणसांची संगत ठेवणे चांगले ठरते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.