A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : ०५ / ०८ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०१६
ब्राझिलमधे रिओ-डी-जानिरो येथे ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात
१९९७
रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन ‘सोयूझ-यू’ हे अंतराळयान ‘मीर’ अंतराळस्थानकाकडे रवाना
१९९७
फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर
१९९४
इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा ‘होमी जहांगीर भाभा पुरस्कार’ राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान
१९६५
पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
१९६२
नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर सुमारे २७ वर्षांनी म्हणजे ११ फेब्रुवारी १९९० या दिवशी त्यांची सुटका झाली.
१९७५
काजोल – अभिनेत्री
१९७२
अकिब जावेद – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज
१९६९
वेंकटेश प्रसाद – जलदगती गोलंदाज
१९३३
विजया राजाध्यक्ष – लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा
१९३०
नील आर्मस्ट्राँग – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव
(मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)
१८९०
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी
(मृत्यू: ६ आक्टोबर १९७९)
२००१
ज्योत्स्ना भोळे – संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), विष्णूदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र विशेष गौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
(जन्म: ११ मे १९१४)
२०००
नानिक अमरनाथ भारद्वाज तथा लाला अमरनाथ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर
(जन्म: ११ सप्टेंबर १९११ - कपूरथाला, पंजाब)
(Image Credit: ESPN CricInfo / WISDEN)
१९९७
के. पी. आर. गोपालन – स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते
(जन्म: ? ? ????)
१९९२
अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते
(जन्म: ५ फेब्रुवारी १९०५)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
राजाची महानता
भोजराजा महादानी धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्याच्यात उदारपणाच्या अनेक कथा त्याच्या राज्यापासून अन्य राजातही प्रसिद्ध होत्या . याच कारणांमुळे तो बहुसंख्य लोकांचे श्रद्धास्थान बनलेला होता. राजा भोज यांना एकदा अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा वैद्यांनी हात टेकले. राजा भोजने करा. ते दोन्ही हात सर्व लोकांना असे दाखवत घेऊन जा. भोज राजाची ही इच्छा दिवाणास मोठी विचित्र वाटली. त्याने विचारले, महाराज असे करण्यासाठी तुम्ही का सांगता आहात. राजा म्हणाला,’’माझे रिकामे हात पाहून सगळ्यांना माहित होईल की राजा असो वा भिकारी सर्वजण रिकाम्या हातानेच जातात. पांढरा आणि काळा रंगांचे वैशिष्ट्य म्हणजे की व्यक्तिसोबत जे जाते ते त्याचचे चांगले किंवा वाईट कर्म. मला यातून सर्वाना हेच सुचवायचे आहे की जन्मापासून मृत्यूंपर्यंत सत्कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.’’ तत्क्षणी आपल्याा दिवाणास निमंत्रित करून त्याला सांगितले, मी आता फार वेळ जगणार नाही. जेव्हा माझी अंत्ययात्रा स्मशानस्थाळी घेऊन जाल तेव्हा माझा एक हात पांढरा व दुसरा हात काळा.
तात्पर्य :- जन्मापासून मृत्यूंपर्यंत सत्कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.