A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : ०७ / ०८ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२०००
ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवलने संयुक्त विजेतेपद मिळवले.
१९९८
अतिरेक्यांनी दार-ए-सलाम, टांझानिया व नैरोबी, केनिया येथील अमेरिकन वकिलातींवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
१९९७
चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावाने दिला जाणारा ‘व्हिट्टोरिओ डी सिका’ हा सन्मान जाहीर
१९९१
जमिनीवरुन हवेत मारा करणार्या ‘पृथ्वी’ या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसर्यांदा यशस्वी चाचणी
१९८१
सलग १२८ वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार’ हे वृत्तपत्र बंद पडले.
१९४७
मुंबई महानगरपालिकेने ’बेस्ट’ (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
१९४८
ग्रेग चॅपेल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९२५
डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन – भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री, हरित क्रांतीद्वारे भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जगभरातील सुमारे ४२ विद्यापीठांनी त्यांना ‘डॉक्टरेट’ ही पदवी दिली आहे. याखेरीज पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या सन्मानांखेरीज, रॅमन मॅगसेसे, वर्ल्ड फूड प्राइझ व इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.
(Image Credit: @msswaminathan)
१९१२
केशवराव कृष्णराव दाते – हृदयरोगतज्ञ, MRCP (१९४९), FRCP (१९६७), पद्मभूषण (१९६९), १९६० च्या सुमारास भारतात मूळ धरू लागलेल्या हृदयरोगशास्त्राचे (Cardiology) आद्यप्रवर्तक. भारताचे राष्ट्रपती व भारतीय भूदल आणि नौदलाचे शल्यचिकित्सक, ब्रिटिश कार्डिओलॉजिकल सोसायटी आणि कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ बेल्जीयमचे सन्माननीय सदस्य, ऑल इंडिया हार्ट फौंडेशनचे संस्थापक संचालक
(मृत्यू: २२ एप्रिल १९८३)
(Image Credit: Royal College of Physicians)
२०१८
एम. करुणानिधी – तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
(जन्म: ३ जून १९२४)
१९७४
अंजनीबाई मालपेकर – भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(जन्म: २२ एप्रिल १८८३)
१९४१
रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ‘जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे.
(जन्म: ७ मे १८६१)
१८४८
जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: २० ऑगस्ट १७७९)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
खटला
दोघां भावात जमिनीवरून तंटा झाला. मामला कोर्टात पोहोचला. त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते. न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले. श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला. न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली. तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे. यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला.
तात्पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवणे हे फार अवघड काम आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.