A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : १० / ०८ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९९
औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.
१९९९
‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ‘डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर
१९९०
मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.
१९८८
दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
१८२१
मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.
१९६०
देवांग मेहता – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष
(मृत्यू: १२ जुलै २००१)
१९१३
डॉ. अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान
(मृत्यू: ८ मे २००३)
१९०२
नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री
(मृत्यू: १२ जून १९८३)
१८९४
व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री
(मृत्यू: २३ जून १९८०)
१८७४
हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: २० आक्टोबर १९६४)
१८६०
पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक
(मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६)
२०१२
सुरेश पुरुषोत्तमदास दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार (२००५) विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक, बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ११ आक्टोबर १९३२)
(Image Credit: Wikipedia)
१९९२
लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते.
(जन्म: १२ ऑगस्ट १९०६)
१९८६
जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. १९६५ आणि १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य गाजवल्याबद्दल त्यांना ‘महावीरचक्र’ मिळाले होते. त्यांच्या लष्करप्रमुखपदाच्या काळातच ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ची कारवाई झाली होती.
(जन्म: २७ जानेवारी १९२६)
१९८२
मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा – भारतीय खगोलशास्त्रज्ञ. तार्यांची प्रत आणि त्यांच्या वर्णपटातील परस्परसंबंधांची उकल केली.
(जन्म: १० एप्रिल १९२७)
१९८०
जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
म्हातारपणाची काठी
आई एकसारखी रडतच होती. बाबा अजून ड्युटीवरून परत आले नव्हते.
'सोनू बेटी, काय केलंस हे? मी भाजी आणायला बाजारात गेले होते आणि एका क्षणात कसं घडलं सगळं? आपल्या धाकट्या भावाला मोनूला वाचवण्याच्या नादात पोरी, तू स्वत:कडे लक्षच दिलं नाहीस. आम्ही तुला फुलासारखं वाढवलं. तुझी काळजी घेतली. तू तर आमच्या अंगणातली तुळस होतीस.. परमेश्वीरा, तू आम्हाला कन्यादानाचं पुण्यही लाभू दिलं नाहीस.. काय केलंस तू असं? आणि का..?'
'आई, मोनू झोपला होता. अचानक खोलीत कशी आग लागली, कुणास ठाऊक? मोनूची किंचाळी ऐकून मी जेव्हा पळत तिकडे गेले, तेव्हा आग सगळ्या खोलीत पसरली होती. मी झटकन आत जाऊन मोनूला बाहेर ढकललं, पण ज्वाळांनी तोपर्यंत मला घेरलं. मी बाहेर येऊ शकले नाही. माझा आरडाओरडा, किंचाळणं ऐकून शेजारी धावून आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.. आई, तू नेहमीच म्हणतेच ना, मोनू आमची म्हातारपणाची काठी आहे. आमचा आधार आहे. मी तर एक मुलगी आहे, परक्याचे धन. एक ना एक दिवस मला तुमचा निरोप घ्यायचाच होता, पण आई, मोनूला काही झालं असतं, तर आपली म्हातारपणाची काठी, आपला आधार कोण झालं असतं?'
बोलता बोलता ती शांत झाली आणि ते निस्तब्ध वातावरण आईच्या किंकाळीने चिरत गेलं.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.