A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : १२ / ०८ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००५
श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.
२००२
१२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
२०००
प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड
१९९८
सचिन तेंडुलकर याला ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कार जाहीर
१९९५
जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.
१९८९
कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ‘जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.
१९८२
परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
१९५९
प्रवीण ठिपसे – बुद्धीबळपटू, ग्रँडमास्टर नॉर्म मिळवणारा पहिला भारतीय, भारताचा तिसरा ग्रँडमास्टर (१. विश्वनाथन आनंद २. दिव्येंदू बारुआ), अर्जुन अवॉर्ड विजेता (१९८४), ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद (१९८२, १९८४, १९८५, १९८९, १९९२ १९९३ आणि १९९४), चेस ऑलीम्पियाडस मध्ये ७ वेळा भारताचे प्रतिनिधित्व (१९८२, १९८४, १९८८, १९९२, १९९४, १९९८ आणि २००२), सर्वोच्च फिडे रेटिंग २५१५ (१९९५)
(Image Credit: sportskeeda.com)
१९४८
फकिरा मुंजाजी तथा ‘फ. मुं.’ शिंदे – कवी, समीक्षक व अनुवादक
१९२६
बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार असा प्रवास करणारे कलाकार, राष्ट्रीय नेत्यांच्या शिल्पकृतींपासून अगदी ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाच्या सेटवरील शिल्पांपर्यंत त्यांनी कारकीर्द गाजवली, कलाकारांचे हुबेहूब मुखवटे तयार करुन ते डमी म्हणून वापरण्याचा प्रयोग त्यांनीच सुरू केला.
(मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६)
१९२४
मुहम्मद झिया उल हक – पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८)
१९१९
डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार
(मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१)
२००५
लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते
(जन्म: १२ एप्रिल १९३२)
१९८४
आनंदीबाई जयवंत – कवी, समीक्षक व अनुवादक
(जन्म: ? ? ????)
१९८२
हेन्री फोंडा – अमेरिकन अभिनेते
(जन्म: १६ मे १९०५)
१९७३
दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ‘भाऊसाहेब‘ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर
(जन्म: १२ मार्च १९११)
१९६८
बाळशास्त्री व्यंकटेश हरदास – नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य
(जन्म: ? ? ????)
१९६४
इयान फ्लेमिंग – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ‘जेम्स बाँड’चा जनक
(जन्म: २८ मे १९०८)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
आपण गाडी चोरली नाही
एकदा कापसाच्या वखारीत काम करीत असलेल्या सात-आठ नोकरांपैकी एकाने बरीच मोठी कापसाची एक गाडी चोरली आणि पैसे घेऊन कोणाला तरी विकली. ही गोष्ट मालकाला समजल्यावर त्याने सर्वांना दम देऊन विचारले, प्रत्येक जण 'आपण गाडी चोरली नाही,' असी शपथ घेऊन सांगू लागले. शेवटी वैतागून मालकाने हे प्रकरण बिरबलाकडे नेले.
बिरबलाने सर्व नोकरांना आपल्याकडे बोलवून एका रांगेत समोर उभे केले. त्या सर्वांना एकदा पाहून तो खो खो हसत सुटला. त्याच्या मालकाला खोटेच म्हणाला, ''मालक, ज्या नोकराने डोक्यावर ठेवून कापसाची गाडी पळविली, त्याच्या मुंडाशाला कापूस लागलेला आहे. त्याने तो झटकण्याची काळजी न घेतल्याने तो आयता आपल्या हाती लागला.
बिरबलाने असे म्हणताच ज्या नोकराने चोरी केली होती, तो आपले मुंडासे चाचपडू लागला. लागलीच 'हाच कापूसचोर असणार,' हे बिरबलाने ओळखले आणि त्या नोकराला फटक्यांची धमकी देताच त्या नोकराने कापसाची गाडी चोरून नेल्याचे कबूल केले.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.