A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : १५ / ०८ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९८२
भारतात रंगीत दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरूवात झाली.
१९७५
बांगला देशात लष्करी उठाव होऊन बांगला देशाचे संस्थापक शेख मुजीबूर रहमान व त्यांच्या कुटुंबीयांची हत्या करण्यात आली.
१९७१
अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले.
१९४८
स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी, साने गुरुजींनी साधना हे साप्ताहिक सुरु केले.
१९४७
ब्रिटिश राजवट संपून भारत स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत व पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश सोडून संस्थाने वगळता राहिलेला प्रदेश स्वतंत्र भारत म्हणून अस्तित्त्वात आला.
१९४७
भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांनी सूत्रे हाती घेतली.
१९५८
सिंपल कपाडिया – अभिनेत्री आणि वेशभूषाकार
(मृत्यू: १० नोव्हेंबर २००९)
१९४७
राखी – चित्रपट अभिनेत्री
१९४५
बेगम खालेदा झिया – बांगला देशच्या पंतप्रधान
१९२९
उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा’ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार
(मृत्यू: ७ आक्टोबर १९९९)
१९२४
श्यामलालबाबू हरलाल राय ऊर्फ ‘इंदीवर’ – गीतकार. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांसाठी सुमारे १००० गाणी लिहिली. १९४९ मध्ये ‘मल्हार’ चित्रपटातील ‘बडे अरमान से रख्खा हैं बलम तेरी कसम’ या गाण्याने ते प्रकाशझोतात आले. ‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा’ (१९७६) या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. ‘छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए’, ‘कस्मे वादे प्यार वफा सब’, ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती’, ‘दुल्हन चली वो पहन चली’, ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे’, ‘चन्दन सा बदन, चंचल चितवन’, ‘मैं तो भूल चली बाबुल का देस’, ‘नदियां चले चले रे धारा’, ‘फूल तुम्हें भेजा है ख़त में‘, ‘जीवन से भरी तेरी आँखें’, ‘जिन्दगी का सफ़र, है ये कैसा सफ़र’, ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे‘, ‘हैं प्रीत जहाँ की रीत सदा’, ‘जो तुमको हो पसंद वही बात करेंगे’, ‘मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां’, ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा’, ‘होंठों से छू लो तुम’ अशी अनेक बहारदार गीते त्यांनी लिहिली आहेत.
(मृत्यू: २७ फेब्रुवारी १९९७)
१९२२
वामनदादा कर्डक – लोककवी
२०१८
अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज
(जन्म: १ एप्रिल १९४१)
२००४
अमरसिंग चौधरी – गुजरातचे मुख्यमंत्री
(जन्म: ३१ जुलै १९४१)
१९७५
शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष यांची लष्करातील सैनिकांनी त्यांच्या प्रासादावर हत्या केली.
(जन्म: १७ मार्च १९२०)
१९७४
स्वामी स्वरुपानंद यांनी समाधी घेतली
(जन्म: १५ डिसेंबर १९०३)
१९४२
महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक
(जन्म: १ जानेवारी १८९२)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
ज्योतिषी संस्कार कथा
ग्रीकमधील ही गोष्ट आहे. कदाचित दंतकथा असेल, पण त्यात सत्याचा अंश आहे. अंधविश्वा्सू लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. ग्रीकमध्ये खूप नावाजलेला एक मोठा ज्योतिषी होता. एके दिवशी सायंकाळी तो कुठेतरी जायला निघाला. तो चालत असतानाच सूर्य अस्ताला गेला. आकाशाकडे बघत चालू लागला. आकाशातील तारे बघता बघता तो एका खड्डय़ात पडला. आकाशातील तार्यां्कडे ज्याची नजर स्थिर झाली आहे त्याला जमिनीवर खड्डा कसा दिसणार? शक्यच नाही. दोन्ही एकाच वेळी शक्यच नाही. तो ज्योतिषी त्या खड्डय़ात पडला. त्याला खूप मुकामार लागला. अनवधानाने तो खड्डय़ात पडल्याने तो जबर ठेचला गेला होता. ओरडू लागला. कण्हू लागला. त्याच्याने उठवेना. जवळच एक झोपडी होती. एक म्हातारी तिथे राहत असे. तिला तो आवाज ऐकू आला. म्हातारी दिवा घेऊन आली. खड्डय़ात पडलेल्या त्या ज्योतिषाला तिने मोठय़ा मुश्किलीने मदत करीत बाहेर काढले.
खड्डय़ाच्या बाहेर येताच तो ज्योतिषी म्हातारीला म्हणाला, 'आजीबाई मी कोण आहे हे तुला कदाचित ठाऊक नसेल? मी एक फार मोठा ज्योतिषी आहे. आकाशातील तार्यांसंबंधी पृथ्वीवरील कोणाही व्यक्तीपेक्षा मला अधिक माहिती आहे. आकाशातील तार्यांविषयी तुला काही माहिती हवी असेल तर माझ्याकडे ये.
पुष्कळ लोक येतात. मला हजारो रुपये फी देतात. तुझ्याकडून मात्र मी काहीही घेणार नाही.' म्हातारी म्हणाली, 'मुला, तू काळजी करू नकोस. मी कधीही येणार नाही. अरे ज्याला अजून जमिनीवरील खड्डा दिसत नाही. त्याच्या आकाशातील तार्यांच्या ज्ञानाचा काय विश्वास ठेवायचा? अरे, तुला जवळचं दिसत नाही तर दूरवरचं कसं दिसेल? जवळच्या दिसण्यात जर तू इतका आंधळा आहेस.. तर दूरवरच्या तुझ्या ज्ञानाचा कसा बरे विश्वा्स ठेवावा?' निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी निरक्षर होत्या. पण ग्रीकमधल्या म्हातारीसारख्याच शहाण्या होत्या. अंधविश्वासू नव्हत्या. वयाच्या तिसाव्या वर्षीच त्या विधवा झाल्या. तेव्हा घरासमोर ज्योतिषी येऊन त्याचं अंध:कारमय भविष्य सांगू लागला. तेव्हा त्याला त्या म्हणाल्या होत्या -
'नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू
माझं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ!'
तात्पर्य : जे प्रत्यक्ष दिसते त्यावरच विश्वास ठेवावा.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.