A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : सोमवार
आजची दिनांक : १९ / ०८ / २०२४
दिनविशेष
१९९९
बेलग्रेड, युगोस्लाव्हिया येथे हजारो सर्बियन लोकांनी राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिच यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.
१९४५
हो ची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
१९१९
अफगाणिस्तानला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९०९
इंडियानापॉलिस मोटर स्पीडवे येथे मोटारींची पहिली शर्यत झाली.
१८५६
गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.
१९४६
बिल क्लिंटन – अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष
१९१८
शंकरदयाळ शर्मा – भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती
(मृत्यू: २६ डिसेंबर १९९९)
१९०७
सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री
(मृत्यू: ३० आक्टोबर १९९४)
१९०३
गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले.
(मृत्यू: ३० सप्टेंबर १९९२)
१८८६
मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील
(मृत्यू: २ जानेवारी १९३५)
१९९४
लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते, नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते [१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता]
(जन्म: २८ फेब्रुवारी १९०१)
१९९३
य. द. लोकुरकर – निर्भिड पत्रकार
(जन्म: ? ? ????)
१९९३
उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार
(जन्म: २९ मार्च १९२९)
१९९०
रा. के. लेले – पत्रकार, संशोधक आणि मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखक
(जन्म: ? ? ????)
१९७५
डॉ. विनायक विश्वनाथ तथा ‘अप्पासाहेब’ पेंडसे – शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ‘ज्ञानप्रबोधिनी’चे संस्थापक
(जन्म: १७ ऑगस्ट १९१६)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
कोल्हा, रानमांजर आणि ससा
एक लहानसा भित्राससा एका बिळात राहात असे; त्याने एके दिवशी, कोल्हा आपणास धरून मारून खाण्यासाठी बिळाच्या तोंडावर टपून बसला आहे असे पाहिले. परंतु बिळाचे तोंड लहान असल्यामुळे त्यातून कोल्ह्यास आत येणार नाही, हे पाहून, सशाचे भय थोडेसे कमी झाले. पुढे एके दिवशी, कोल्हा एका रानमांजराबरोबर मोठया सलगीने बोलत बसला आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. हे चिन्ह काही बरे नाही, असे त्यास वाटले. थोडया वेळाने, ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्यास आपल्या पंजांनी असे ओरबाडू लागले की, सशास आपला जीव वांचविण्यासाठी बिळातून बाहेर पडावे लागले! तो तेथे कोल्हा बसलाच होता, त्याने त्याजवर झडप घालून त्यास पकडले व रानमांजरासह त्याच्या मांसावर ताव मारण्यास सुरवात केली. मरतेवेळी ससा म्हणाला, `तुम्हा दोघा लुच्चांची मैत्री झाली असे जेव्हा मी पाहिले, तेव्हाच आपली आता धडगत नाही, अशी माझी खात्री होऊन चुकली होती.’
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.