A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : २० / ०८ / २०२४
दिनविशेष
२००८
भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बिंजिंग ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
१९८८
इराण इराक युद्ध – सुमारे ८ वर्षांच्या युद्धानंतर युद्धबंदी करार झाला.
१९६०
सेनेगलने आपण (मालीपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९४१
दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली. यातल्या ज्यूंना छळ छावण्यात रवाना करण्यात आले.
१९२०
डेट्रॉइट, मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
१९४६
एन. आर. नारायण मूर्ती – ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक
१९४४
राजीव गांधी – भारताचे ६ वे पंतप्रधान, भारतरत्न
(१९९१) मरणोत्तर
(मृत्यू: २१ मे १९९१)
१९४४
बाल कलाकार म्हणून पुढे आलेल्या व नंतर सहाय्यक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सलमा बेग उर्फ ‘बेबी नाझ’ यांचे निधन.
(मृत्यू: १९ ऑक्टोबर १९९५)
(Image Credit: IMDb)
२०१३
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत व साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांची पुणे येथे गोळ्या घालुन हत्या
(जन्म: ? ? ????)
२०१३
जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक
(जन्म: १ फेब्रुवारी १९२९)
२००१
मधुकर रामराव तथा एम. आर. यार्दी – प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष
(जन्म: ? ? ????)
२०००
प्राणलाल मेहता – चित्रपट निर्माते (किनारा, किताब, बेजुबान, मरते दम तक, पुलिस पब्लिक)
(जन्म: ? ? ????)
१९९७
प्रागजी जमनादास डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
(जन्म: ७ आक्टोबर १९०७)
(Image Credit: IndiaNetzone)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
गृहपाठाची पाने आणि चिमणी
एका गावात रत्नेश नावाचा एक छोटा मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. गावात तो रत्नू या नावानेच ओळखला जायचा. गाव तसं छोटसच होतं. त्याचे घर म्हणजे छोटीशी बंगली. घराच्या मागे पुढे अंगण. अंगणात फूलवेली व फळांची झाडे होती. पानांनी भरली म्हणजे झाडांची हिरवी सावली घराला शांत प्रसन्न बनवायची. फुलांनी फुलारली की घराच्या आजुबाजूचे वातावरण सुगंधित व्हायचे. फळांनी लगडली म्हणजे झाडांवर अनेक प्रकारचे पक्षी यायचे.
पक्ष्यांची मजा बघण्यात रत्नूचा खेळ मजेत निघून जात असे. रोज ते पक्षी बघणे, त्यांना दाणे खाऊ घालणे याची रत्नूला फार मजा मौज वाटे. सर्व पक्ष्यांमध्ये त्याची आवडती म्हणजे चिमणी.
चिमणीला दाणे देण्याचा त्याला लहाणपणापासून छंदच जडला होता. तिला दाणे दिल्याशिवाय रत्नू जेवत नसे. एक दिवस चिमणी वेळेवर आलीच नाही. रत्नु बेचैन झाला. आईने त्याला जेवणाचा खूप आग्रह केला. पण, चिमणीला दाणा दिल्या शिवाय तो कधी जेवलाच नव्हता. तसे स्पष्टच त्याने आईला सांगितले व चिमणीची वाट बघत असला. मग आईला प्रश्न विचारत बसला, चिमणी का आली नसेल? कुठे गेली असेल? आईने सांगितले की पिलांसाठी दाणा आणायला गेली असेल. मी तिला रोज दाणे देतो. मग तिला कष्ट घ्यायची का जरूरत पडते? असे रत्नूने आईला विचारताच आई म्हणाली, ” सारखं सारखं कुणाकडून काही घेणं योग्य नव्हे. स्वकष्टाने एखादी गोष्ट मिळविण्यात जो आनंद असतो तो आयतं घेण्यात नसतो. शिवाय कष्टाचे महत्वही त्यामुळे कळते.” आईचे समाजवणे होत नाही तोच चिमणी पटकन उडत आली जणूकाही आपल्याला उशीर झाला, क्षमा कर, असेच भाव तिच्या चेहर्यावर होत. पण रत्नूच्या चेहर्यावरील आनंद पाहून चिमणीला बरे वाटले. तिने एक-दोन दाणे खाल्ले, त्याच्याशी खेळली अन् उडून गेली. असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता.
रत्नू हळूहळू मोठा झाला. शाळेत जाऊ लागला. चिमणीला खूप आनंद झाला. एक दिवस रत्नू शाळेतून घरी आला. व लगेचच अभ्यासाला बसला. रोज चिवचिव करून साद घालणारी चिमणी रत्नू अभ्यास करतो आहे, हे पाहुन बाहेरच शांततेने वाट बघत बसली. अभ्यास झाल्यावर रत्नू बाहेर आला. तेव्हा वाट पाहत थांबलेल्या चिमणीला पाहून त्याला कसेसेच झाले. खूप अभ्यास असल्याचे त्याने चिमणीला सांगितले. शाळेतल्या गमती-जमती, अभ्यास याबाबत तो चिमणीला रोजच सांगत असे. चिमणीला समजत होते की नाही माहीत नाही. पण तिरपी मान करून ती ते सर्व ऐकायची.
त्या दिवशी चिमणी थोडावेळ खेळली नि उडून गेली. चिमणी आज घरट्याकडे न जाता वेगळ्याच दिशेने उडून गेली हे रत्नूच्या बाल नजरेने हेरले. त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरू लागले. तेवढ्यात चोचीत काहीतरी घेऊन चिमणी परत आली. लांब आकाराची हिरवीगार पाने पाहून रत्नूला आनंद झाला. तो आनंद मनात साठवून चिमणी घरट्याकडे उडून गेली. ती पाने घेऊन रत्नू घरात आला. पुस्तकांचा पसारा आवरला. त्यात त्याने ती पाने ठेवून दिली.
दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रत्नू उठला, दात घासले, दूध प्यायले. शाळेसाठी तयार झाला. शाळेत गेला, वर्गात गेल्यावर थोड्यावेळात गुरुजी आले. गृहपाठ तपासण्यासाठी त्यांनी सर्वांच्या वह्या घेतल्या. त्यादिवशी नेमका रत्नूने गृहपाठ केला नव्हता, त्यामुळे मनातून तो घाबरला होता. गुरुजी मात्र रत्नूचे कौतुक करत होते. त्याला काही समजेना. गुरुजी सर्वांना रत्नूने आणलेली पाने दाखवत होते. आंब्याची पाने आणण्याचा गृहपाठ गुरुजींनी दिला होता. गुरुजींना खुलासा केला तेव्हा त्याच्या लक्षात आले. लगेच त्याला चिमणीची आठवण झाली. चिमणीने त्याला गृहपाठ करण्यात मदत केली होती. गुरुजींनी रत्नूला शाबासकी दिली. त्यावेळेस शाबासकीच्या आनंदापेक्षाही चिमणीच्या सहकार्याचा आनंद रत्नूला जास्त मोलाचा वाटला.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.