A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : २१ / ०८ / २०२४
दिनविशेष
१९९३
मंगळाच्या शोधमोहिमेसाठी पाठवण्यात आलेल्या ‘मार्स ऑब्झर्व्हर’ या यानाचा पृथ्वीशी (NASA) संपर्क तुटला.
१९९१
लाटव्हियाने स्वत:ला (सोविएत युनियनपासुन) स्वतंत्र घोषित केले.
१९११
पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे ‘मोनालिसा’ हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
१८८८
विल्यम बरोज याने बेरजा मारणार्या यंत्राचे पेटंट घेतले.
१९८६
उसेन बोल्ट – जमैकाचा धावपटू
१९६१
व्ही. बी. चन्द्रशेखर – भारताचा फिरकी गोलंदाज
१९२४
श्रीपाद अच्युत दाभोळकर – ‘प्रयोग परिवार’ या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि जमनालाल बजाज पुरस्काराने गौरवण्यात आलेले कृषीशास्त्रज्ञ
(मृत्यू: ३०एप्रिल २००१)
१९३४
सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री (कार्यकाल: २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३), हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
(मृत्यू: १० मे २००१)
१९१०
नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)
२००६
बिस्मिला खाँ – शहनाई नवाझ
(जन्म: २१ मार्च १९१६)
२००१
शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार
(जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
(Image Credit: SaReGaMa)
२००१
मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर
(जन्म: ? ? ????)
२०००
विनायकराव कुलकर्णी – स्वातंत्र्यलढ्यातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत
(जन्म: ? ? ????)
२०००
निर्मला गांधी – समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा, गांधीजींचा तिसरा मुलगा रामदास गांधी यांच्या पत्नी
(जन्म: ? ? ????)
१९९५
सुब्रमण्यम चंद्रशेखर – तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय-अमेरिकन खगोल वैज्ञानिक व गणिती. त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ कृष्णविवरांवरील (Black Holes) संशोधनासाठी खर्च केला. यांचे काका सी. व्ही. रामन यांनाही भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९३०) मिळाले आहे. भौतिकशास्त्रात नोबेल मिळवणारे हे दोघेच भारतीय वंशाचे आहेत.
(जन्म: १९ आक्टोबर १९१०)
(Image Credit: Physics in History)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
मुलगी आणि तिचे चार मित्र
एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.
त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.
त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.
दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग असतो.
तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.
तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.
एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.
ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, "मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''
""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.
त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.
त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''
त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.
आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस... यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''
""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''
त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.
... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''
ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''
वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.
आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.
आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.
दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.
आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा.
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.