A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : २२ / ०८ / २०२४
दिनविशेष
दिनविशेष
१९७२
वर्णद्वेषी धोरणाबद्दल र्होडेशिया (झिम्बाब्वे) ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीतुन हकालपट्टी करण्यात आली.
१९६२
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांची हत्या करण्याचा कट फसला.
१९४४
दुसरे महायुद्ध – सोविएत युनियनने रोमानिया जिंकले.
१९४२
दुसरे महायुद्ध – ब्राझिलने जर्मनी व इटालीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९०२
कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना
१९६४
मॅट्स विलँडर – स्वीडीश टेनिस खेळाडू
१९५५
चिरंजीवी – अभिनेते व केंद्रीय मंत्री
१९३५
पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. भरतनाट्यम, कथकली, मणिपुरी आदी नृत्यप्रकारांतही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. १९५७ मध्ये त्यांनी ८२ दिवसांत ८७ कार्यक्रम करुन विक्रम केला.
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९४)
१९२०
डॉ. डेंटन कूली – हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया घालणारे अमेरिकन शल्यविशारद
(मृत्यू: १८ नोव्हेंबर २०१६)
(Image Credit: Wikipedia)
१९९९
वामन तुकाराम तथा सूर्यकांत मांडरे – मराठी चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते, पद्मश्री (१९७३). त्यांच्या ‘धाकटी पाती’ या आत्मचरित्राला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
(जन्म: ? ? ????)
१९९५
पंडित रामप्रसाद शर्मा – संगीतकार, ट्रम्पेट व व्हायोलिनवादक. ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील प्यारेलाल यांचे ते वडील होत.
(जन्म: ? ? ????)
१९८९
पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ‘राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.
(जन्म: २६ जुलै १८९३)
१९८२
एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे.
(जन्म: १९ नोव्हेंबर १९१४)
१९८०
चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचे बँकॉक विमानतळावर विमानात चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन
(जन्म: २२ नोव्हेंबर १९१५)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
शासन
महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.
तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.
लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चकर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्यााचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'
स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.