A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : बुधवार
आजची दिनांक : २८ / ०८ / २०२४
दिनविशेष
दिनविशेष
१९९०
इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.
१९३७
‘टोयोटा मोटर्स’ ही स्वतंत्र कंपनी बनली.
१९३१
फ्रान्स आणि सोविएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
१९१६
पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९१६
पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१८४५
‘सायंटिफिक अमेरिकन’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
१९६६
प्रिया दत्त – १४ व्या (वायव्य मुंबई) आणि १५ व्या (मुंबई उत्तर-मध्य) लोकसभेतील खासदार.
१९३४
सुजाता मनोहर – सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा
१९२८
उस्ताद विलायत खाँ – सतारवादक
(मृत्यू: १३ मार्च २००४)
१९१८
राम कदम – संगीतकार
(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
१९०८
विनायक माधव तथा ‘विमादी’ पटवर्धन दीक्षित – विनोदकार
(मृत्यू: ? ? ????)
१९०६
नटवर्य चिंतामणी गोविंद तथा ‘मामा’ पेंडसे
(मृत्यू: ? ? १९९१)
२००१
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर – लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी
(जन्म: ६ जुलै १९२७)
१६६७
मिर्झा राजे जयसिंग
(जन्म: १५ जुलै १६११)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
अख्खी म्हैस पाच रुपयात
एका माणसाची म्हैस चोरीस गेली. तो मनात म्हणाला, 'आपली म्हैस गावातल्याच दोन-तीन चोरट्या माणसांपैकीच कोणीतरी चोरली आहे. आता चार दोन दिवसात म्हैस-चोर म्हशीला घेऊन गावाबाहेर जाईल आणि तिला विकून पैसे घेऊन येईल. तत्पूर्वी ती म्हैस मिळविण्याची काहीतरी युक्ती काढली पाहिजे.'
मनात हा विचार येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याप्रमाणे त्याने गावात दवंडी पिटली, 'ऎका हो ऎका ! दररोज पंधरा शेर दूध देणारी माझी तरणीबांडी म्हैस नाहीशी झाली आहे. ती शोधून मला आणून देणार्यास मी ती म्हैस अवघ्या पाच रुपयात विकत देईन.'ज्याने ती म्हैस चोरली होती, त्याच्या कानी ती दवंडी गेली.
तो मनात म्हणाला, 'आपण केलेली चोरी उघडकीस आली तर म्हशीपरी म्हैस जाईल, आणि वर अब्रुही जाईल. त्यापेक्षा 'तुझी म्हैस मला रानात मिळाली,' असं त्या म्हशीच्या मालकाला सांगाव, आणि त्याला पाच रुपये देऊन, म्हशीला खरेदी करुन घरी घेऊन यावं.' असा विचार करुन त्या चोरट्या माणसाने त्या म्हशीला तिच्या मालकाकडे नेले आणि म्हैस रानात मिळाल्याचे सांगून, त्याला पाच रुपये देऊ केले व त्या किमतीत त्या म्हशीला विकत मागितले.
यावर म्हशीचा मालक त्या म्हैस चोराला म्हणाला, 'माझा शब्द म्हणजे शब्द. दवंडीत सांगितल्याप्रमाणे ही दुभती म्हैस मी तुला पाच रुपयात द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. तिच्याबरोबर तिच्या गळ्यातला हा लोखंडी साखळदंडही तू विकत घेतला पाहिजे.चोरटा म्हणाला, 'ठिक आहे. त्या साखळदंडाचीही किंमत मी मोजतो. फार तर पाच-सहा रुपये एवढीच किंमत आहे ना त्याची ?'म्हशीचा मालक म्हणाला, 'छे छे ! साखळदंडाची किंमत आहे नऊशे पंच्चाण्णव रुपये.'म्हशीचा मालक आपल्यापेक्षा सवाई निघाला हे पाहून, तो चोरटा हात चोळीत तिथून चूपचाप निघून गेला.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.