माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
[माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
[माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली]
हे ओतीव बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची,
उदात्त गुणांची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची,
हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी,
सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची
नव्या नवतीची काडी दवन्याची,
रेखीव भुवया कमान जणू इन्द्रधनुची,
हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची
तशी ती माझी गरीबाची,
मैना रत्नाची खाण आSS आ.. हे..
मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण,
नसे सुखाला वाण,
तिच्या गुणांची छक्कड मी गायिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
हे माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
[माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली]
आहो या गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची,
आहो या गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची,
झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची,
वेळ होती त्या भल्या पहाटेची,
बांधाबांध झाली भाकर तुकड्याची,
घालवित निघाली माझी मैना चांदणी शुक्राची,
गावदरिला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची,
शिकस्त केलि मी तिला हसवण्याची,
खैरात केली पत्रांची वचनांची
दागिन्यानं मडवुन काढायची,
बोली केली शिंदेशाही तोड्याची,
अन साज कोल्हापुरी वज्रटिक गळ्यात माळ पुतळ्याची
ए..हे.. कानात गोखर पायात मासोळ्या
ए..हे.. कानात गोखर पायात मासोळ्या
दंडात इळा आणि नाकात नथ सर्जाची..
परी उमलली नाही कळी तिच्या आंतरिची
आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची
मैना खचली मनात आSS आ.. हे..
मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात
नाही हसली गालात
हात उंचावून उभी राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
हे माझी मैना गावाकडं राहिली
[माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली]
आहो या मुंबईत गर्दी बेकरांची,
अन त्यात भर ती झाली माझी एकाची,
मढ्या्वर पडावी मुठभर माती
तशी गत झाली आमची,
ही मुंबई यंत्रांंची, तंत्रांंची, जगणाऱ्यांंची, मरणाऱ्यांंची,
शेंडीची, दाढ़ीची, हडसनच्या गाडीची,
नायलाॅॅनच्या, जाॅॅर्जेटच्या, तलम साडीची,
बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची,
माडीवर माडी हिरव्या माडीची
माडीवर माडी हिरव्या माडीची
पैदास इथंं भलतीच चोरांची,
ऐतखाऊंंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदाराची,
अन पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची,
पर्वा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची,
पाण्यानं भरलं खीसंं माझंं वान मला एका छत्रीची,
अन त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची,
ऐतखाऊंंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदाराची,
अन पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची,
पर्वा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची,
पाण्यानं भरलं खीसंं माझंं वान मला एका छत्रीची,
अन त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची,
ए..हे.. बेळगाव, निपाणी, कारवार, गोव्यासह एकभाषिक राज्याची,
चकाकली संगीन अन्यायाची, फ़ौज उठली बिनिवारची
कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गियांची
उठला मराठी देश आSS आ.. हे..
उठला मराठी देश आला मैदानी त्वेष
वैरी करण्या नामशेष
गोळी डमडमची छातीवर साहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
हे माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
[माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली]
कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गियांची
उठला मराठी देश आSS आ.. हे..
उठला मराठी देश आला मैदानी त्वेष
वैरी करण्या नामशेष
गोळी डमडमची छातीवर साहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
हे माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
[माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली]
म्हणे अण्णाभाऊ साठे घरे बुडाली गर्वांची,
मी-तू पणाची, जुलमीची, जबरिची, तस्करांंची,
निकुंंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची,
चौदा चौकडाचंं राज्य रावणाचंं लंका जळाली त्याची
अन तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची,
अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची,
परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाऊन्टनच्या चढ़ाईची,
झालंं फाऊन्टनला जंग आSS आ.. हे..
झाल फाऊन्टनला जंग तिथंं बांधुन चंग
आला मर्दानी रंग
धार रक्ताची मर्दानी वाहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
हे माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
[माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली]
महाराष्ट्रानंं गुढी उभारली विजयाची,
हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची,
अन दाखवली रित पाठ भिंतीला लावून लढायाची,
परि तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची,
गावाकडंं मैना माझी भेट नाही तिची,
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची,
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची,
बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर मालकी दुजांची,
धोंड खंडणीची, कमाल दंडेलीची, चिड बेकीची, गरज एकीची,
म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची
आता वळू नका आSS आ.. हे..
आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका,
बिनी मारायची अजुन राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
[माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली]
अन तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची,
अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची,
परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाऊन्टनच्या चढ़ाईची,
झालंं फाऊन्टनला जंग आSS आ.. हे..
झाल फाऊन्टनला जंग तिथंं बांधुन चंग
आला मर्दानी रंग
धार रक्ताची मर्दानी वाहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
हे माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
[माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली]
महाराष्ट्रानंं गुढी उभारली विजयाची,
हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची,
अन दाखवली रित पाठ भिंतीला लावून लढायाची,
परि तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची,
गावाकडंं मैना माझी भेट नाही तिची,
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची,
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची,
बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर मालकी दुजांची,
धोंड खंडणीची, कमाल दंडेलीची, चिड बेकीची, गरज एकीची,
म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची
आता वळू नका आSS आ.. हे..
आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका,
बिनी मारायची अजुन राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
[माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली]
ओरिजिनल गीत
कराओके गीत
Tags
कराओके गीते