A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : ०१ / १० / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००५
इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत १९ जण ठार झाले.
१९६०
नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
(Image Credit: Britannica)
१९५९
भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९५८
भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
१९४६
युनायटेड किंग्डममधे ‘मेन्सा इंटरनॅशनल’ या संस्थेची स्थापना झाली. जगातील १०० देशांत या संस्थेचे जाळे पसरले असून असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या लोकांसाठी ही संस्था कार्यरत आहे.
(Image Credit: Mensa International)
१९४३
दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेपल्स शहरावर ताबा मिळवला.
१९३०
जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ - ७ आक्टोबर १९९९)
(मृत्यू: १२ डिसेंबर २०००)
(Image Credit: Wikipedia)
१९२८
विझुपुरम चिन्नया मनरायार तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते
(मृत्यू: २१ जुलै २००१)
(Image Credit: Cinestaan)
१९२४
जेम्स अर्ल कार्टर (ज्युनिअर) तथा ‘जिमी’ कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष (कार्यकाल: २० जानेवारी १९७७ ते २० जानेवारी १९८१), नोबेल शांति पुरस्कार विजेते (२००२)
(Image Credit: Wikipedia)
१९१९
गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते आणि वक्ते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५७ पटकथा आणि २००० हुन अधिक गीते लिहिली आहेत. गीतरामायणामुळे त्यांना ‘महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९५१), पद्मश्री (१९६९)
(मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)
(Image Credit: Films Division)
१९९७
गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१")
(जन्म: ?? १९६१)
१९३१
शंकर काशिनाथ गर्गे तथा ‘दिवाकर’ – नाट्यछटाकार
(जन्म: १८ जानेवारी १८८९)
१८६८
मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा
(जन्म: १८ आक्टोबर १८०४)
(Image Credit: Wikipedia)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
अतिथी धर्म
कमलाकर एका चोराचा पाठलाग करीत होता. तो चोर गावातील लहान लहान गल्लीतून पळत होता आणि शेवटी पळता – पळता कमलाकर ची नजर चुकवून तो त्या गावातील एका घरात घुसला…!
त्या गावात अतिथी धर्म पाळण्याची सुंदर प्रथा होती…! तो चोर ज्या घरात घुसला त्या घरातील व्यक्ती ने त्या गावाच्या प्रथेप्रमाणे आपला अतिथी धर्म पाळला.
त्याच्या घरात घुसलेल्या चोराला आतील खोलीत लपविले…! इतक्यातच कमलाकर ही पाठलाग करता करता त्याच घरी आला…
कमलाकरने त्या व्यक्तीला चोराबद्दल सांगितले आणि विचारले की… असा कुणी व्यक्ती इकडे आला होता का….? तुम्ही त्याला इकडे पहिले का…? असे विचारले…
त्या गावच्या नियमा प्रमाणे अतिथी धर्म पाळण्याकरिता तो व्यक्ती खोटे बोलला आणि अश्या व्यक्तीला मी पाहिला नसल्याचे कमलाकर ला सांगितले.
परंतु… त्या व्यक्तीच्या मुलाने मात्र कमलाकरकडे बघून आतल्या खोलीकडे बोट दाखविले… कमलाकर काय ते समजला आणि त्याने आतल्या खोलीत जाऊन त्या चोराला पकडले आणि तो त्या चोराला घेऊन गेला.
त्या कुटुंबप्रमुखाला आपल्या मुलाचा खूप राग आला. कारण…. त्याच्या मुलाने त्या गावच्या नियमा प्रमाणे अतिथी धर्म पाळला नव्हता. त्या कथेपुरते त्या मुलाचे अगदी बरोबर होते.
तात्पर्य :-
परिस्थितीनुसार
सत्याचा अर्थ आणि महत्व बदलत राहते…!
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा. ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.