A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : मंगळवार
आजची दिनांक : ०३ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९७१
कतारला स्वातंत्र्य मिळाले.
१९१६
श्रीमती अॅनी बेझंट यांनी ‘होमरुल लीग’ची स्थापना केली.
१७५२
अमेरिकेत ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
१९७६
विवेक ओबेरॉय – अभिनेता
(Image Credit: Wikipedia)
१९४०
प्यारेलाल रामप्रसाद शर्मा – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ‘लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
(Image Credit: @Bollywoodirect)
१९३१
दिगंबर त्र्यंबक तथा श्याम फडके – नाटककार (‘काका किशाचा’, ‘तीन चोक तेरा’, ‘राजा नावाचा गुलाम’ फेम)
१९२७
अरुण कुमार चटर्जी तथा ‘उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते
(मृत्यू: २४ जुलै १९८०)
(Image Credit: @Bollywoodirect)
१९२३
कृष्णराव गणपतराव साबळे तथा ‘शाहीर’ साबळे – महाराष्ट्र शाहीर. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या आपल्या कार्यकमातून लावणी, कोकेवाला (ग्रामीण भागात सारंगीसारखे वाद्य वाजवून देवादिकांची आख्याने गाणारा), बाल्यानृत्य (मुंबईत उपाहारगृहांत, धनिकांकडे, तसेच चाळींतील लोकांकडे कामाला असलेल्या कोकणी गड्यांचे–बाल्यांचे–नृत्य), कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन ते घडवत असत. या कार्यक्रमाला अफाट लोकप्रियता मिळाली होती
(मृत्यू: २० मार्च २०१५)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
२०००
पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती
१९६७
अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ. ‘मौज’ आणि ‘निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा (त्या काळातील धाडसी) उपक्रम चालवला.
(जन्म: १६ आक्टोबर १८९०)
१९५८
माधव केशव काटदरे – निसर्गकवी
(जन्म: ३ डिसेंबर १८९२)
१९५३
लक्ष्मण तथा ‘खाप्रुमामा’ पर्वतकर – तबला, घुमट व सारंगीवादक. गोव्यातील ‘घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवत. त्यांनी लयकारीमध्ये विविध, नावीन्यपूर्ण व आश्चर्यजनक प्रयोग केले आणि तालाच्या जाणकारांमध्ये लौकिक संपादन केला. दिलेल्या मूळच्या लयीत कोणतीही पट ते लीलया करीत असत. त्याचप्रमाणे ते एकाच वेळी एका पायाने त्रिताल, दुसऱ्या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्या हाताने चौताल धरून तोंडाने सवारीचा ठेका म्हणत असत. तोंडाने विशिष्ट बोलांची तीन आवर्तने करत असतानाच ते त्याच वेळी तबल्यावर पाच वेळा तोच बोल वाजवून दोन्हींची सम अचूक साधत असत आणि हे करताना लयीची यत्किंचितही ओढाताण झालेली दिसून येत नसे. एखादी परण तोंडातून उलटी म्हणत असतानाच तबल्यावर सुलटी वाजवून ते समेवर बरोबर येत. त्यांनी पावणेसोळा मात्रांचा ‘परब्रह्म’ ताल रचून त्यात पाव मात्रेचे १२५ ‘धा’ असलेली ‘महासुदर्शन‘ नामक परण बांधली. या त्यांच्या अद्भुत व अद्वितीय लयसिद्धीमुळेच त्यांना ख्यातनाम गायक अल्लादियाखाँ यांनी ‘लयब्रह्मभास्कर’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.
(जन्म: ? ? १८८०)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
अ चा आ, उडवी शत्रुचा धुव्वा
भोजराजाच्या दरबारात असलेला महाकवी कालिदास याच्यापुढं आपलं तेज पडत नसल्यामुळे, त्याच्यावर आतून जळणारे बरेच विद्वान व कवी होते. त्यात शतंजय हाही एक कवी होता. एकदा त्यानं आपलं महत्त्व वाढविण्यासाठी व विशेषकरुन कालीदासाला बदनाम करण्यासाठी भूर्जपत्रावर एक श्लोक लिहिला व ते भूर्जपत्र आपल्या शिष्याला भोजराजाकडे पोहोचतं करायला सांगितलं.
गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्याचा शिष्य ते भूर्जपत्र हाती घेऊन राजाकडे चालला असता वाटेत त्याची व कालीदासाची भेट झाली, ‘हा शतंजय शिष्य राजाकडे चालला असावा’ असं वाटल्यावरुन कालिदासानं त्याला मुद्दाम विचारलं, काय रे वत्सा ? किती लांब चालला आहेस?
शतंजय कवीच्या शिष्याला श्लोक काय आहे, याची कल्पना नसल्यामुळं तो सहज बोलून गेला, 'माझ्या गुरुंनी या भूर्जपत्रावर लिहिलेला एक श्लोक, त्यांच्या आज्ञेवरुन मी भोजमहाराजांना द्यायला चाललो आहे.’
कालीदासाने ते भूर्जपत्र आपल्या हाती घेऊन तो श्लोक वाचला.
तो पुढीलप्रमाणे होता :
श्लोक
अपशब्दशतं माघे, भारते च शतत्रयम ।
कालिदासे न गण्यन्ते कविरेकी शतंजय: ॥
(भावार्थ : माघ कवीच्या काव्यात शंभर, 'भारता' त तिनशे तर कालिदासाच्या काव्यांत किती अपशब्द (शिव्या) आहेत, त्याला गणनाच नाही, शतंजय कवीला मात्र ( त्या कवीचे हे दोष दाखवून देण्यासाठी) एकदाच अपशब्द (शिवी) वापरावा लागलो.)
शतंजय कवीने हा श्लोक आपली बदनामी करण्यासाठी लिहिला असल्याचे पाहून कालिदास त्या शतंजय शिष्याला मुद्दाम म्हणाला, 'अरे वा: ! फारच छान लिहिलाय श्लोक तुझ्या गुरुंनी ! फक्त नजरचुकीनं एका शब्दाला काना द्यायचा राहून गेलाय, देऊ का मी तो काना ?'
शतंजय शिष्य म्हणाला, ‘वा: ! हे काय विचारणं झालं? ती चूक जरुर दुरुस्त करा. माझ्या गुरुंना कमीपणा येता कामा नये.’
कालीदासाने श्लोकातील 'अपशब्द' या शब्दातल्या 'अ' ला काना दिला, आणि त्याचा ‘आपशब्द’ असा शब्द बनवला. त्यामुळे तो श्लोक पुढीलप्रमाणे बनून, त्याचा अर्थही पार बदलून गेला.
श्लोक
आपशब्दशतं माघे, भारते च शतत्रयम ।
कालिदासे न गण्यन्ते कविरेकी शतंजय: ॥
(भावार्थ : माघ कवीच्या एका 'आप' म्हणजे पाणी या शब्दाला समानार्थी असे एकूण शंभर शब्द आहेत. भारतात त्यांची संख्या तिनशे आहे. कालिदासाच्या काव्यात तर एका पाण्याला समानार्थी असे किती शब्द आहेत, त्याला गणना नाही, फक्त (शब्दसंपत्तीच्या बाबतीत दरिद्री असलेल्या) शतंजय कवीच्या काव्यात आप म्हणजे पाणी हा एकच शब्द प्रत्येक ठिकाणी वापराला गेला आहे.)
शतंजय शिष्याने तो श्लोक भोज राजाकडे पोचता केला. राजाने भर दरबारात तो श्लोक वाचून दाखविताच कालिदासाची मान उंच झाली, तर शतंजय कवीची मान लज्जेने खाली गेली !
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.