A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : गुरुवार
आजची दिनांक : ०५ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००५
इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ‘फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.
(Image Credit: reddit)
२०००
ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर
१९६७
ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.
१९४१
इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.
१९४०
रॅक्वेल वेल्श – अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका
(Image Credit: Criminal Element)
१९२८
दमयंती जोशी – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना
(मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)
१९२०
लीला पोतदार तथा लीलावती भागवत– बालसाहित्यिका. ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या ‘स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला.
(मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)
१९०७
जयंत पांडुरंग तथा ‘जे. पी.’ नाईक – शिक्षणतज्ञ, ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन’चे संस्थापक, ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’चे संस्थापक, भारतामध्ये प्रथमच स्थापन केल्या गेलेल्या शैक्षणिक आयोगाचे सभासद सचिव
(मृत्यू: ३० ऑगस्ट १९८१)
१८९५
अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक. त्यांनी संपादित केलेल्या विविध ग्रंथात रघुनाथपंडित कृत ‘दमयंती स्वयंवर’ व मुक्तेश्वरकृत ‘महाभारताचे आदिपर्व’ हे उल्लेखनीय आहेत.
(मृत्यू: १३ एप्रिल १९७३)
२०००
रॉय क्लिफ्टन फ्रेड्रिक्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
(जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)
(Image Credit: WISDEN)
१९९५
सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार
(जन्म: १९ नोव्हेंबर १९२५ - चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)
(Image Credit: IMDb)
१९९२
अतूर संगतानी – उद्योगपती व दानशूर व्यक्ति
(जन्म: ? ? ????)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही
भोजराजाकडे एक पोपट होता. तो फक्त ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही’ हे एकच वाक्य म्हणे. राजा एकदा त्या पोपटाला घेऊन राजसभेत आला. सवयीप्रमाणे तिथेही पोपटाने त्या वाक्याचा स्पष्टपणे उच्चार केला. त्याचं ते विधान ऎकून राजसभेतील प्रत्येकजण त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागला.
राजसभेतील विद्वान मंडळीना भोजराजानं विचारलं, ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही’ असं जे पोपट म्हणतो, ते कोणत्या गोष्टीला उद्देशून आहे?'यावर प्रत्येकान आपापल्या परीनं उत्तर दिलं, पण कुणाच्याच उत्तराने राजाचं समाधान झालं नाही. अखेर तो म्हणाला, 'हे पाहा, सहा महिन्यांच्या आत मला या विधानाचा पुराव्यासह समाधानकारक खुलासा हवा; अन्यथा मी तुम्हा सर्वांना नोकरीवरून काढून टाकीन. हे स्पष्टीकरण तुम्ही स्वत: द्या किंवा दुसर्या कुणाकडून द्या, त्या गोष्टीला माझी हरकत नाही.'
राजानं दिलेली ही तंबी ऎकून, दरबारी मंडळींच्या तोंडाचं पाणी पळालं. राजसभेतील ‘अभिलाषानंद’ या नावाचा पंडित गावात रहाणार्या 'चरवाह' या नावाच्या एका अतिशय हुशार पंडिताकडे गेला व त्याने त्याला आपल्यापुढे राजानं उभ्या केलेल्या समस्येची माहिती दिली.ती ऎकून पंडित चरवाह म्हणाले, 'पंडित अभिलाषानंद ! घाबरु नका, पोपटाच्या तोंडच्या त्या वाक्याचा पुराव्यासह अगदी समाधानकारक अर्थ मी राजाला सांगतो. फक्त तुम्ही मला तुमच्याबरोबर राजाकडे न्या. मात्र राजाकडे जाताना हा समोरच्या अंगणात बसलेला कुत्राही राजाकडे घेऊन जाण्याची ताकद मजमध्ये नाही. त्यामुळे त्या कुत्र्याला तुम्ही उचललं पाहिजे, आहे मान्य?'त्या कुत्र्याला पाहून पंडित अभिलाषानंदाला किळस वाटली.
लूत भरल्यामूळे तो कुत्रा नुसता गलिच्छ झालेला नव्हता, तर अंगात ठिकठिकाणी खरे पडल्यामुळे त्याच्या अंगाला दुर्गंधी येत होती. पण ‘राजसभेतील मोठया वेतनाची नोकरी टिकविण्यासाठी अभिलाषानंदाने पंडित चरवाहांची ती अट मान्य केली, आणि दुसर्याच दिवशी तो त्या गलिच्छ कुत्र्याला उचलून व पंडित चरवाहांना बरोबर घेऊन राजसभेत गेला.
त्याला तशा तर्हेने आलेला पाहून भोजराजानं विचारलं, ‘पंडित अभिलाषानंद ! चरवाहांना घेऊन येण्याचा हेतू काय?’पंडित अभिलाषानंद म्हणाला, ‘महाराज ! ‘एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही’, असं जे आपले पोपटराव म्हणतात, त्याचा समाधानकारक खुलासा पंडित चरवाह हे अगदी पुराव्यासह करायला तयार आहेत.'
राजानं प्रश्नार्थक नजरेनं पाहताच पंडित चरवाह त्याला म्हणाले, ‘महाराज ! लोभाएवढी वाईट गोष्ट या जगात दुसरी नाही.’आपल्याला हवं असलेलं उत्तर मिळाल्यामुळं अंतरी समाधान पावलेल्या राजानं विचारलं, ‘पण याला पुरावा काय ?’यावर पंडित चरवाह म्हणाले, 'वास्तविक या पंडित अभिलाषानंदाची घरची परिस्थिती फार चांगली आहे. राजसभेतील नोकरी सुटली, तरी त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही.
तरीसुध्दा मी घातलेल्या अटीप्रमाणे ते या लूत भरलेल्या व खरे पडलेल्या कुत्र्याला उचलून, त्याला आपल्यासमोर घेऊन येण्याचे जे लाजिरवाणे कृत्य करायला तयार झाले, ते नोकरी टिकवण्याच्या लोभापायीच ना?पंडित चरवाहांनी केलेल्या या खुलाशांनं राजाचे पूर्ण समाधान झाले. त्याने त्याला इनाम दिले व दिलेल्या शब्दाप्रमाणे पंडित अभिलाषानंदाला नोकरीवर राहू दिले.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.