A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शुक्रवार
आजची दिनांक : ०६ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
१९९७
अमेरिकेतील ‘नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक अमजद अली खाँ यांची ‘नॅशनल हेरिटेज फेलोशिप’साठी निवड
१९६८
स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.
१९६६
दक्षिण अफ्रिकेचे पंतप्रधान हेन्ड्रिक व्हरवोअर्ड यांची संसदीय बैठक चालू असतानाच भोसकुन हत्या.
१९६५
पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल अयुब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. ‘ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ ही त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची योजना होती. पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असलेल्या पाकिस्तानच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानवर हल्ला चढवला व पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरूवात झाली. या युद्धात भारताने पाकिस्तानला सपाटून मार दिला.
१९६८
सईद अन्वर – पाकिस्तानी डावखुरा फलंदाज व कप्तान. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात तो दोन्ही डावांत शून्य धावांवर बाद झाला होता. आपल्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातही त्याने केवळ ३ धावा केल्या होत्या. मात्र नंतर त्याची कामगिरी एकदमच बहारदार झाली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत सलग तीन शतके झळकावणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो.
(Image Credit: sportskeeda.com)
१९२९
यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता
(मृत्यू: २६ जून २००४)
(Image Credit: Cinestaan)
१९९०
सर लिओनार्ड तथा ‘लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू
(जन्म: २३ जून १९१६)
(Image Credit: Wikipedia)
१९८६
सुरेश हरिप्रसाद जोशी – आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक. त्यांनी काही भारतीय व परकीय साहित्यकृतींचे गुजराथीत अनुवादही केले.
(जन्म: ३० मे १९२१)
१९७२
उस्ताद अल्लाउद्दीन खाँ – सरोदवादक व संगीतकार. हिन्दुस्थानी शास्त्रीय संगीतातील महर्षितुल्य कलाकार व संगीतकार. सरोद, व्हायोलिन, बासरी व अन्य अनेक वाद्ये ते तयारीने वाजवत असत. मैहर राजघराण्याचे दरबारी वादक. संगीत नाटक अकादमी पारितोषिक (१९५४), पद्मभूषण (१९५८), पद्मविभूषण (१९७१) इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
(जन्म: ? ? १८६२)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
हे ही गेले, ते ही गेले
एक म्हातारी होती. एकटीच असली, तरी सुखवस्तू होती. ती काशीयात्रेला जायला निघाली. यात्रेला निघण्यापूर्वी ती आपलं दागिन्यांचं डबोलं घेऊन, गावाबाहेर कुटीत रहाणार्या एका गोसाव्याकडे गेली आणि त्याला म्हणाला, 'गोसावीबुवा ! मी काशीहून घरी परत येईपर्यंत हे दागिन्यांच गाठोडं तेवढं सांभाळून ठेवा.'गोसावी तिला म्हणाला, 'आजीबाई ! मी दुसर्याच्या घनदैलतीला स्पर्श करीत नसतो. तू या माझ्या कुटीसमोर एक खोल खड्डा खण आणि त्यात ते दागिन्यांच गाठोडं पुरुन, तो खड्डा बुजवून टाक.' गोसाव्याच्या त्या निरिच्छपणावर भुलून त्या म्हातारीनं त्याच्या समक्षच त्या कुटीसमोर एक खड्डा खणला व त्यात आपले दागिने पुरले.
तीनएक महिन्यानंतर जेव्हा ती म्हातारी घरी परतली व त्या कुटीसमोरील खड्डा उकरुन पाहू लागली, तेव्हा तिला ते दागिने नाहीसे झाले असल्याचं आढळून आलं. तिने प्रथम त्या गोसाव्याची मनधरणी केली, आणि नंतर बरीच कान उघाडणीही केली, पण तो गोसावी मख्खपणे तिला एकच उत्तर देई. 'मी तुझ्या दागिन्यांना स्पर्शही केला नाही.'नाइलाज होऊन ती म्हातारी चरफडत घरी गेली व दु:ख करु लागली, तिच्या दु:खाचे कारण कळताच, शेजारी तिला धीर देऊन म्हणाला, 'आजी ! तुम्ही या गोष्टीची कुठेही वाच्यता करु नका. तुमचे दागिने मी तुम्हाला परत मिळवून देतो.'
अशा स्थितीत एक आठवडा निघून गेला, आणि तो शेजारी दागिन्यांनी भरलेले दोन डाबे घेऊन याच गोसाव्याकडे गेला. ते दोन्ही डबे त्या गोसाव्याच्या समोर उघडून, तो त्याला म्हणाला, 'साधूमहाराज ! दिल्लीला असलेला माझा धाकटा भाऊ एकाएकी अतिशय आजारी असल्याचं पत्र आलयं, तेव्हा घर बंद करुन, सर्व कुटुंबासह मी आज संध्याकाळी दिल्लीला चाललो आहे. म्हणून माझी आपल्याला एकच विनंती, की आपण हे सर्व दागिने आपल्याजवळ जपून ठेवावे.'
जवळजवळ शंभर सव्वाशे तोळ्यांचे ते दागिने पाहून, त्या गोसाव्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने मनाशी ठरवूनही टाकलं की, ' हे दागिने आपल्या ताब्यात देऊन हा माणूस गाव सोडून दिल्लीला गेला रे गेला, की हे दागिने व भरीस त्या म्हातारीचे दागिने घेऊन आपण कुठे तरी दूर पळून जायचं.'
याप्रमाणे विचार करुन तो भोंदू बैरागी त्या गृहस्थाला म्हणाला, ' मी बोलून चालून संन्यासी. मी तुमच्या दागिन्यांना कसा स्पर्श करु ? तुम्हीच या माझ्या कुटीसमोर खोल खड्डा खणा, आणि त्यात तुमचे हे दागिन्यांचे दोन डाबे पुरुन टाका.'त्या बैराग्याच्या म्हणण्याप्रमाणे तो गृहस्थ हळूहळू खड्डा खणू लागला. तेवढ्यात त्या गृहस्थानं अगोदरच सांगून ठेवल्याप्रमाणे कुठेतरी झाडाआड दडून राहिलेली म्हातारी तिथे आली.
‘आता या म्हातारीनं जर तिचे दागिने आपण बळकावल्याची माहिती याला सांगितली, तर हा गृहस्थ बिथरेल व शेसव्वाशे तोळे वजनाचे दागिने घेऊन परत जाईल. तेव्हा आता या म्हातारीच्या वीस-पंचवीस तोळे वजनाच्या दागिन्यांवर पाणी सोडणेच शहाणपणाचे आहे,’ असा विचार करुन तो लुच्चा बैरागी त्या म्हातारीला म्हणाला, 'अगं आजीबाई ! मला वाटतं तू दागिने पुरलेस एका ठिकाणी, आणि ते परत काढून घेण्यासाठी जमीन खोदलीस भलत्याच ठिकाणी. तू त्या ठिकाणी खड्डा खणून बघ पाहू ?' म्हातारीला त्या गोसाव्याची ही लबाडी कळून आली, पण काही एक न बोलता तिने त्या जागी जमिन खोदताच, तिला तिथे पुरलेले तिचे दागिने मिळाले.
हा सर्व प्रकार त्या म्हातारीच्या-आता आपल्या दागिन्यांचे दोन डबे पुरण्यासाठी खड्डा खोदत असलेल्या-शेजार्याचा दहा बारा-वर्षाचा मुलगा एका झुडपाआडून बघत होता. आजीबाईचे दागिने तिला परत मिळाल्याचे पाहून, तो बापाच्या पूर्वसुचनेनुसार तिथे आला हळूहळू खड्डा असलेल्या आपल्या वडिलांना म्हणाला, ' बाबा ! दिल्लीच्या काकांच पत्र आत्ताच डाकवाल्यानं आणून दिलयं. त्या पत्रात काकांनी लिहिलयं, 'माझी प्रकॄती आता चांगली सुधारणा असल्यानं, तुम्ही सर्वांनी दिल्लीस येण्याची आवश्यकता नाही.'मुलानं याप्रमाणे सांगताच, त्या गृहस्थानं खणलेला खड्डा बुजवला आणि आपल्या दागिन्यांच्या डब्यासंह त्याने घरचा रस्ता सुधारला.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.