A राष्ट्रगीत
राष्ट्रगीत
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा।
जनगण मंगलदायक जय हे,
जय हे, जय हे, जय हे,
राष्ट्रगीत कराओके 02
राष्ट्रगीत कराओके 03
Aa राज्यगीत
राज्यगीत
B प्रतिज्ञा
प्रतिज्ञा
C संविधान
संविधान
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
D प्रार्थना
प्रार्थना
E श्लोक
श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवै नम: ।। १ ।।
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे
देव सर्वकार्येषु सर्वदा ।। २ ।।
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोsस्तुते ।। ३ ।।
शांताकारं भुजगशयनं
पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं
मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं
कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं
भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। ४ ।।
कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने ।
प्रणत्क्लेशनाशाय
गोविंदाय नमो नम: ।। ५ ।।
या
कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।
या
वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।
या
ब्रह्माच्युत्शंकरप्रभृतिभि: देवै सदा वन्दिता ।
सा मां पातु सरस्वती
भगवती नि:शेषजाडयापहा ।। ६ ।।
ब्रह्मानंदं
परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं
गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षम् ।
एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी: साक्षीभूतम् ।
भावातीतं
त्रिगुणरहितं सद्गुरूं तं नमामि ।। ७ ।।
पुण्यश्लोको नलो
राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर: ।
पुण्यश्लोको
विदेहश्च पुण्यशोको जनार्दन: ।। ८ ।।
अहिल्या द्रौपदी
सीता तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्या ना
स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।। ९ ।।
अश्वत्थामा
बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।
कृप: परशुरामश्च
सप्तैते चिरजीविन: ।। १० ।।
अयोध्या मथुरा माया
काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारावती चैव
सप्तैता मोक्षदायिका: ।। ११ ।।
F सुविचार
सुविचार
आजचा वार : शनिवार
आजची दिनांक : ०७ / ०९ / २०२४
G दिनविशेष
दिनविशेष
२००५
इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.
१९७९
दिवाळखोरी टाळण्यासाठी ‘ख्रायसलर कॉर्पोरेशन’ने अमेरिकन सरकारकडे १ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
१९७८
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
१९३१
दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९१९
महात्मा गांधींनी ‘नवजीवन’ हे गुजराथी साप्ताहिक सुरू केले.
(Image Credit: mkgandhi.org)
१९७१
प्रतीक चौधरी – सानिया घराण्याचे सतारिये, दिल्ली विद्यापीठातील संगीताचे प्राध्यापक
(मृत्यू: ७ मे २०२१ [कोविड-१९])
(Image Credit: @1anuradhapal)
१९४०
चंद्रकांत खोत – लेखक, कवी आणि संपादक. अतिशय मनस्वी आणि तरीही अलिप्त असे साहित्यिक म्हणून खोत यांची ओळख होती. विवेकानंद यांच्या आयुष्यावरची ‘बिंब-प्रतिबिंब’ ही त्यांची गाजलेली कादंबरी होती. तसंच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या नात्यावरची ‘दोन डोळे शेजारी’ ही त्यांची कादंबरीही खूप गाजली.
‘अबकडई’ या दिवाळी अंकाचं संपादनही त्यांनी केलं होतं. खोत यांनी धाडसी लिखाणही केलं होतं. मुंबईतल्या पुरूष वेश्यांच्या जीवनावरची ‘उभयान्वयी अव्यय’ ही त्यांची कादंबरी बरीच गाजली.
(मृत्यू: १० डिसेंबर २०१४ - मुंबई)
(Image Credit: News-18 लोकमत)
१९३४
सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार
(मृत्यू: २३ आक्टोबर २०१२)
१९३४
बाबू राम तथा बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक
(मृत्यू: २५ जुलै २०१२)
(Image Credit: Cinestaan)
१९३३
इला भट्ट – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका, वकील व ‘सेवा’ [Self Employed Women's Association] या संस्थेच्या संस्थापिका
इला भट यांचा परिचय करून देणारा व्हिडीओ पहा (१३:४०):
१९९७
मुकूल आनंद – तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: ११ आक्टोबर १९५१)
(Image Credit: IMDb)
१९९४
स्टुअर्ट टेरेन्स हर्बर्ट यंग – आयरिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथाकार. ‘डॉक्टर नो’, ‘फ्रॉम रशिया विथ लव्ह’ आणि ‘थंडरबॉल’ या बॉन्डपटांचे दिग्दर्शक
(जन्म: २० जून १९१५ - शांघाय, चीन)
(Image Credit: Wikipedia)
H पंचांग
पंचांग
I बोधकथा
बोधकथा
खरी नक्कल
भोजराकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला. त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.
भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखाने आला, तशाच तर्हेने निघून जाऊ लागला. दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही.
त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला. त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, 'अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजरा करण्याचं साधे सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.'
बहुरुपी म्हणाला, 'महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांच घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.' बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याला तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या.
J बातमीपत्र
बातमीपत्र
K स्पर्धाविश्व
स्पर्धाविश्व
L समूहगीते
समूहगीते
M पसायदान
पसायदान
आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला || ९ ||
पसायदान Mp3 ऐकापसायदान Mp3 - लता मंगेशकर
N मौन
मौन
पसायदान झाल्यानंतर सावकाश दीर्घ श्वास नाकातून आत घ्यावा व बाहेर सोडताना तोंडातून ओंकार उच्चार सावकाश करावा . ही कृती तीन वेळा करून शेवटी शांती हा शब्द तीन वेळा उच्चारून 2 मिनिटे मौन पाळा.